रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

आशा आणि त्याग

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||

या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी  माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर  पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.

 जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी.

जगण्याची  लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.

           तुम्ही  असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती  आशा  असते.

 आशाचा समूळ नाश अशक्य आहे पण आशा कमी करू शकतो.इच्छा नष्टं नाही पण इच्छेची तीव्रता कमी करू शकतो. छाताडावर गोळया झेलतं मरणाला ही शरण आणणारे अतुलनीय शौर्य आपण पहातोच की.आशेचा त्यागाकडे प्रवास शक्य आहे.त्यागातून ही आनंद मिळतो. त्याग आनंदाचे साधन आहे.

मित्र हो,सोप्पं की मग आनंदाचा मार्ग.आपण योगी नाही पण  जरा त्यागी तर होऊया.बघूया ना आज जमतयं का?

 सुप्रभात...!!!

                परशुराम सोंडगे

          Youtuber|| Bloger||

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

सकारात्मक उर्जा

 || आपुलाच संवाद आपुल्याशी ||

 

माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत.

गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की. 

हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं  गोंधळून जात आहोत.

या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही  मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात.

विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते. 

 उलट नकरात्मक उर्जा माणसाला  काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.

  सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविचार पाठ करतो? चांगला विचार करणा-या सवयीचं गुलाम व्हावं लागतं.तीच गुलामी माणसाला या जगाचं सिंकदर करत असते.

सकारात्मक विचारच माणसाला आकाश कवेत घेण्याचं बळ देतो.नकारात्मकता माणसाच्या जीवनातील आनंद गोठून टाकते.पंखातले अवसान गिळुन टाकते.नकारात्मकताच माणसाला नैराश्यीच्या गर्तेत ढकलते.सकारात्मकता माणसाला यशाचं शिखरावर घेऊन जाते. सकारात्मकता व नकारात्मकता माणसाच्या विचार करण्याच्या  पध्दती आहेत.फक्त कोणती ही गोष्टं सहज आणि सकारात्मकतेनं घेणं जमलं पाहिजे. ते तेज विलोभनीय असतं.  या शिवाय सक्सेस पासवर्ड  दुसरा नाही.जादूची कांडी हीच तर असते.

 चला,आज सकारात्मकतेने ऊर भरून घेऊया. 

सुप्रभात 

                           परशुराम सोंडगे

                    || Youtuber||Bloger||

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

वीरचक्र विजेते माळी साहेब -अमर रहे


 वीरचक्र विजेते तालुक्याचे भूषण माळी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्टचं फार वेदनादायी आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये काम करत असताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी भेटली. वय झालं तरी कमालीची धडाडी व सकारात्मक विचारांची उर्जा त्यांच्या अंगी होती.त्यांच्या गावाच्या व  पाटोदा तालुक्याच्या स्वच्छता चळवळीला गती देण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे. 

  आजची सकाळ शुभ नाही. माळी साहेब आपल्या नाहीत.ही अतंत्य दुंखद घटना आहे.मृत्यू जरी अटळ असला तरी आपल्या तून आपल्याचं एका माणसाला घेऊन जातो ही बाब  जीवनाची क्षणभंगूरताच अधोरेखीत करते.मानवी जीवनाची ही पराधिनता सांगून जाते.

  माळी साहेब शरीराने आपल्यात नसतील पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील.तारूण्य ओसरलं तरी घडाघडी आणि जिद्द कशी उरात तेवत ठेवायची ,आपणच आपल्याशी प्रमाणिक कसं राहयच हे  त्यांच्याकडून शिकायच. मी एकदा त्यांना विचारलं होत," वीर चक्र भेटलं यासाठी तुम्ही अतुलनीय शौर्य दाखवलं असेलच ना?"

ते हासत हासत म्हणाले," सरजी असं काही नाही.मी माझं काम प्रमाणिकपणे केले.अतुलनीय वगैरे काही नाही.मी लढाईत खेळत नव्हतो.मी लढाई लढत होतो.माझ्या समोर माझे नाहीतर देशाचे शत्रू होते.माणसानं आपलं काम प्रमाणिकपणे करावं.लोक तुलना करत असतात.कुणाला पायाशी,कुणाला डोक्यावर,कुणाला ह्दयात जागा देत असतात.दुस-याच्या ह्रदयात  जागा मिळणे ही सात भारविकत घेण्या इतकी सोपी गोष्ट नक्कीच नाही.

त्यांच्या विचाराने आठवणीने ते कायम मानाच्या गाभा-यात तेवत राहतील.

माळी साहेब  अमर रहे

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

मरगळ


दिवा जळत राहतो.प्रकाश उधळत राहतो.निरतंर. जळता जळता दिवा काजळत जातो.नकळतं.त्याचं त्यालाच कळतं नाही.हळू हळू अंधूक होतो.काजळी त्याच्याच शरीराचा काही अंश असते.तोच अंश त्याचं तेज गिळतो. ती काजळी झाडली की तो पुन्हा नव्याने पेटतो.प्रकाशाने फुल्लारून येतो.पुन्हा जळत राहतो.अंधाराच्या उरावर प्रकाश रेषा अधिक गडद करत राहतो.माणसाचं भी तसचं आहे ना? माणसाला येणारी मरगळ म्हणजे काजळीच की.

अधिकचं प्रकाशमान होण्यासाठी,तेवण्यासाठी  अंग झटकावचं लागतं ना? ती जगण्याची अपरिहार्यताच असते.आपल अंग झटकून पुन्हा तेवत राहवचं लागतं. आपल्याला काजळीने वेढलं तर गेलं नाही ना? अंग तर झटकून पाहूया.कालच्या पेक्षा आज अधिक प्रखर तेवायचं आहे ना? आपलं असणं अधिकचं ठळक करूया.

             शुभ प्रभात.

                                 परशुराम सोंडगे

 भेट दया :prshuramsondge.blogspot.com

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

बापू..!!

 

तू

या देशाचा राष्ट्रपिता

पण

एखादया जातीच्या झुंडीला,

एखादया थर्माच्या टोळीला,

एखादया वर्णाच्या कळपाला,

एखादया मुलखाला

तूर्त तरी

त्यांचा

वाटत नाहीस.

म्हणून तर 

तू 

या देशाचा

आहेस.


छाताडं किती ही 

इंचाची असू दे.

ते फुटूस्तोवर 

फुगू दे.

पण

सदैव जगात हा देश

गांधीचा आहे

नि

गांधीचा राहणार आहे.गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

ह्रदय गुंतता ह्रदय हे.(भाग 4)

 


रात्रीचे दहा तरी वाजलं असतील. तृप्ती नि निलेश मार्केटमधून घरी परतत होते.आज निलेशचा मूड ही चांगला होता. बराच वेळ फिरल्यामुळे एक थकवा आला होता.एका हॉटेल जवळ त्यानं गाडी पार्क केली. ते हॉटेलात शिरले. जेवायचं की नुसतं कॉफी घ्यायचं हे त्यांनी काहीच ठरवलं नव्हतं. तसं बाहेर येण्याचं काही प्लॅन नवहता.दोघ ही गप्पात मग्न होते. समोरच्या टेबला वर एक कप्पल होतं. अर्थात त्यांच्याकडं याचं लक्ष नव्हतं.ती बाई सारखं तयांच्याकडं पहात होती. तृप्तीचं लक्ष ही गेलं पणतिनं ते इग्नोर केलं. ती दोघाकंड पहात आहे की एकटया निलेशकडं पहात आहे याचा अंदाजला घ्यावासा वाटला.तिच्या समोर जो माणसू बसला होता. तो नक्की कोण असावा तिचा? नवरा की वडील? समोर छान्‍ अक्क्ल पडलं होतं. देह कसा बसा खूर्चीत मावला होता. इतकं तंतोतंत तो कसा काय खूर्चीत बसू शकला असेल? तृप्तीला प्रश्न पडला.


             जास्त वेळ त्याच्या कडं पाहण्याचा प्रयत्न तृप्ती करणार नव्हती. ते बावळट पुन्हा पहात बसायचं आपल्याकडं. आपल्या बायका, पोरी बरोबर आसल्या तरी बरीचं थोराडं माणसं दुस-याच्य बायकाकउं पहात बसतात. तृप्तीचा अनुभवच होता तसा. आज ती सावध होती. निलेश त्या गर्दं लाल.. वहईटं कलरचा स्कर्टं घातलेल्या त्या पोरीकडं पाहत होता. रेड व व्हईट कलर कॉम्बीनेशन जबरदस्त वाटतं होतं. ती आकर्शक दिसतं होती. निलेशला ही चूक ती करू देणारचं होती. निलेश वर सूड नाही उगवू शकली तरी त्यावर तोंड सूख घेणं तरी शक्यं होतं.


“फक्त कॉफीच की काही खायला मागवू?” निलेश असं म्हणतं आसला जरी त्याचं लक्षं तृप्तीकडं नव्हतचं.


“नको नको.. फक्त कॉफीचं.”


“का?एवढी का घाई करतेस?”


“का म्हणजे घरी कामं पडलीत.माझी वाट बघत.”


“ ऐ जाऊ दे. उग मूड नको घालवू?”


“ आता कसला मूड तुझा?”


“मूड कसला? थोडसं रिलॅक्स…”


“ बरं.. ठीक.. “ तृप्ती उठली नि उभी राहीली.तिला जागा बदलायची होती. आपल्या नव-याकडं कुणी स्त्री बघत असेल तर? कोणतीच स्त्री ते फार वेळ सहन करू नाही शकत. तृप्नं निलेशला उठवलं. त्याच्या जाग्यावर ती बसली.


“ का?


“तुझ्याकडं कुणी अस पहात असेल तर मला नाही आवडतं.”


“असं का?” निलेशनं वेडयाचं सोंग घेऊन पेंडगावाला गेला.त्यानं ओठात थोडसं हासू फुलवलं.


“आता तू काही वेळ रिलॅक्स.. बसू शकतो.” तृप्ती आपली नजर तयाच्या डोळयात रोखत बोलली. निलेशनं काही बोलण्यापेक्षा  गप्प राहणचं पंसत केल.


“असं काय पहातेस? वेडीस काय? लोक बघतील ना?”


“बघू दे. बायको मी तुझी? कुणी परकी नाही?”


“असं. अश्या ठिकाणी?


“लायन्सनं माझ्याकडं?” गळयातलं मंगळ सुत्रं त्याला दाखवत तृप्ती बोलली. त्याच्या बघत त्या मुलीकडं ही ती पहात होती.


“लायन्सं आहे मग विचार काय तुझा?”


“जी चाहता है.कीस लू.तिनं फलाइंग कीस केला. कीस त्याच्याकडं नि नजर त्या मुलीकडं रोखत ती बोलली. ती मुलगी उठून तरा तरा चालत आली. फरशीवर सॅडलचा आवाज आला. सा-याच्य नजरा रोखल्या. निलेश ही तिच्या चेह-यावरली भाव वेचत राहीला. कंबरेवर हात देउन त्या दोघासमोर उभी राहीली.


“निलेश तू?” त्याच्या डोळयात डोळा मिसळत त्या मुलीनं विचारलं.


“रेवा.. तू?” निलेशचं तोंड आश्चर्यानं वासलं होतं. तृप्ती नुसती पहात राहीली होती. तिला बसा म्हणण्याऐवजी हाच उठून उभा राहीला. तृप्तीला कळत नव्हतं आपण उभा राहवं की बसावं?  ती गोंधळली पण तशीच बसून राहीली. ही नक्की कोण? निलेशला नावासह कशी बोलू शकते. ते पण ऐकेरी.


“अरे,ही कोण? लग्न तर केल नाहीस ना?”


“येस, यु आर राईट. ही माझी बायको.तृप्ती.” रेवा हासली.छान हासली.आता समोरचं हासलं की आपल्याला पण हसावंच लागतं. तृप्ती ही हासली.


“तृप्ती, ही रेवा. आम्ही एका कॉलेजात शिकत होतो.”


“एका वर्गात पण असालच ना?” तृप्तीनं अंदाज सांगितला.


“नाही, आम्ही एका वर्गात नव्हातो. हा बदमाश सिनिअर मला.” भाडया म्हणाली नी खळखळून हासली.


“हा बदमाश? मला नव्हतं माहीत.” तृप्ती नटवं बोलली.


“कळेल. तसा तो कळयाला वेळ लागतो. हा दिसतो गोरा गोमटा पण ॲक्चयूली ही इज शॅमेलॉन.”


“शॅमेलॉन?” ही आपल्या नव-याला शॅमेलॉन म्हणते नि आपण खूशाल ऐकतो. निलेश खुशाल दात काढतोय. तृप्तीनं तिला बसायला शेजारची खूर्ची दिली.


“ऐ, व्हॉट सेक्सी चॉईस? व्हेरी क्यूटं..!!”ती इतकं बोलंल तरी निलेश फक्त हासला.एका स्त्रीनं दुस-या स्त्रीचं असं सौंदर्यं मान्य करणं जगातील दुर्लभ योग.तृप्तीला ही नवलं वाटलं. एवढं सुखद का बोलतेय ही?


“लव्हं मॅरेज की ॲरेंज…?” तृप्ती कडं बघत ती म्हणाली.तृप्ती तिच्याकडं पहात होती.


“तुला काय वाटतं?” खूर्चीवर टेकत तो बोलला.


“तू गटवल असणार हिला?”


“राँग. हीनंच प्रपोज मारलं मला.” आपली कॉलर ताटं करत निलेश बोलला.


“काय म्हणू तूला?  नुसतं तृप्ती म्हणू?”


“दॅटस्‍ ओके.“ ती नुसती हासली.


“खरं बोलतोय हा? तू प्रपोज मारल त्याला?”


“नाही?ॲरेजं आमचं.” तृप्तीनं अर्धंवटच बोलणं पसंत केलं. थोडसं हासून पाहीलं.


“कॉलेजात भेटला असता तर केल असतं प्रपोज?”


“ ऑफकोर्सं…”


“रेवा काय हे? काय बोलतेस? बायको माझी ही.”


“असेल तुझी बायको पण माझी कुणीच नाही का?”


“तुझी पण आहे ना”


“कोण माझी?” त्याच्या चेह-यावर नजर स्थिरं करत ती बोलली.


“तुझी कोण?” निलेश थोडा कन्फयूज झाला. त्याला काहीचं कळतं नवहतं.


“ बुध्दू, मी कोण तुझी. फ्रेंङ..फ्रेंडच्य बायकोला काय म्हणायचं…”तिनं पण बराच वेळ डोकं चालवून पाहील. उत्तर नाही सापडलं.


“अशी काही नाती असतात त्यांना आपण नावं नाही देऊ शकत. नाव नाही देता आलं म्हणजे नातं नसतचं असं नाही?” तृप्तीनं त्यांची कोंडी फोडली. अजून जास्त त्यांची फजीती करायची नव्हती तिला.


“जाऊ दया ते. आम्ही दोघी फ्रेंङ” रेवानं तृप्तीचा हात हातात घेतला.तिचा हात गरम होता. ताप जाणवा इतका उष्णं होता. दोघानी ही आगह केला.  कॉफीची ऑडर पण झाली. इकडचंतिकडंच बराच वेळ ते बोलत राहीले. अर्थात.. त्या  दोघांच्या ही चेह-यावरील सूक्ष्म भाव तृप्ती टिपतच होती.


“अरे ,आपण इथं असं बसलोत. ते एकटेच…” तृप्तीनं रेवाच्य नव-याची काळजी केली. ही त्याला आपल्याज जॉइन का करत नाही? तृप्तीला प्रश्न पडला.


”रेवा,ओळख नाही करून देणार तुझ्या नव-याची?”


“नाही? ते नाही येणार.तो नवरा नाही माझा…”


“मग?”


“पुरूष फक्त कुणाचा तरी नवराच असतो, असं नाही?”


“बॉय फ्रेंड?”


“काही नात्यानं लेबल लावता येत नाहीत नि काहीनां आपण ते चिकटू शकत नाहीत.”.


“ तू स्पष्टं नाही बोलू शकत?


“निलेश… सा-याचं गोष्टी स्पष्टं नाही करता येत माणसाला.सॉरीं..!! मी तुम्हला डिस्टर्ब केला. भेटू पुन्हा .. बाय..” ती दोघाकडं पाहून  गोड हासली. अर्थात ते अस्स्लं नव्हतं. नटवं होतं.मन आतून चिरतं गेलं तर हासणं तरी कसं गोड  राहू शकत? तृप्ती व निलेश त्यांच्याकडं पहातच राहीले.आता  रेवा त्यांच्याकडं पाहणारचं नव्हती. तसं ठरवलचं होतं तिनं.  तृप्तीचं व निलेशेचं ही पाय जड झालं होतं. तृप्तीच्या मनात असंख्य प्रश्न उठले होते.


                      बाईकवर ते घरी आले. तृप्ती अबोल झाली होती. निलेशला अनेक प्रश्न तिला विचारायचं होतें. तो त्याची उत्तर देईल की नाही .काही माहीत नव्हत. आता घरात आल्यानंतर असे प्रश्न  विचारणं शक्यं नवहतं. सार्वजनीक ठिकाण जो एकांत भेटतो तो  घरात शोधवा लागतो. एकांतीची वाट पहावी लागते. रात्रच्या अकरा वाजत आल्या होत्या. निलेशच्या डोळयात झोप तरळली होती. तृप्ती जवळ आली तस तिच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न त्यांन केला.तिनं तो हाणून पाडला. गालाचा चंबू केला. बायकांचा हा नखरा लोभस आसला तरी अश्या एकांतात  फारसा सहन होत नाही. निलेश हताश झाला होता.तृप्तीनं सुरक्षीत अंतर घेऊन त्याला विचारलं,” कोण ती?”


“आम्ही कॉलेजाला होतो एकत्र. अर्थात.. ती आमच्या वर्गात नवहती.”


“वर्गात नसेल ही.. पण."


“मग पण काय?”


“कोण ती?”


“तू समजते आहे तसं काही ही नाही."


“मी काहीच समजत नाही. मला खरचं काही समजेनास झालं.”


“जाऊ दे ते.ती नको होती भेटायला.”


“तो तिचा नवरा पण नव्हता? मग कोण होता तिचा तो?”


“जाऊ दे ते. मी तिच्या बाबत एवढचं सांगू शकतो. ती अनेक दुदैवी मुली या जगगात आहेत. असतात तशीचं ती एक अभागी मुलगी आहे. बस्सं.”


“अभागी?"


“तो तिचा नवरा नव्हता.”


“बॉय फ्रेंड सोबत फिरण्या इतकी ती लहान पण नाही.”


“तो तिचा बाय फ्रेंड पण नव्हता.”


“मग कोण होता?"


“तो कसटमर असेल तिचा.”


“क्काय? तसली थर्डं क्लास ती? तसल्या बाया बरोबर  ओळखीत तुझ्या?”


“आमच्या कॉलेजीची हुशार पोरगी होती ती.”


“निलेश कळत का तुला? कसल्या बाई बरोबर ओळाख तुझी? म्हणे हुशार पोरगी होती."


“आपण आपला भुतकाळ  नाही पुसू शकत.बिच्चरी रेवा…” निलेशचा स्वरं गहिरा झाला होता. नुसतं एक पुरूषाकडं पाहीलं म्हणून आपलं थोबाडं रंगवणारा निलेश इतका इमोशनल होऊ शकतो?


“खरचं ना तुझं प्रेम नाही ना तिच्यावर..?”


“ तृप्ती, काळजाचा पार चेंदामेंदा झालाय तिच्या.ती कधी कुणावर प्रेम तरी करू शकेल का?”


“ मग का बघत होतास तिच्याकडं…”


“नजरेत फक्त प्रेम नि वासनाच नसते..कारूण्याचा पाझर ही डोळयातूनच झरू शकतो.”


“ असलं कारूण्यं ही तुझ्या डोळयातून नाही पहावत मला.”


“ का?”


“का म्हणजे मी बायको तुझी? फक्त माझा तू.. फक्त माझा.” हे बोलताना ती त्याच्या छातीशी बिलगली. अजून त्याला तिचं करण्यासाठी त्याच्या हवाली झाली. दोन शरीर एक झाले तरी मन मनाचं मिश्रण होतचं असं नाही.तिनं शरीर निलेशच्या हवाली केलं पण मनात अनेक गोष्टींच्या लहरी उठत राहील्या. रेवा,तिचा ढेरीवाला कस्टमर…  निलिश नि  रेवाचं नेमके संबंध कसें असतील? या संशयाचं प्रंचड वेगाने धावणारे विषाणू..  तिचं डोकं  खाऊन टाकतील की काय? असं वाटलं.खिडकीतून डोकवणारा अकाशतील चंद्र.. चांदण्या…  आदित्य.. त्याची मृत्यीशी चालू असलेली  झुंज.आदित्यचा चेहरा तिच्या डोळया समोर आला. आदित्य असा.. यावेळी तरी नको आठवायला.. मनातलं कुणाला कळत? आपल्या डोळया समोर जसा आदीचा चेहरा हालत नाही तसाच रेवाचा चेहरा… निलेशच्य मनात असेल का? का दुस-या कुणाचा?निलेशची मिठी अजून ही सैल नव्हती झाली.


 (पुढील भाग लवकरचं )

सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२

ह्रदय गुंतता हे (भाग 3)

 तृप्ती हॉस्पीटलला पोहचली. रक्तदान ही केलं. खर तर तिला लगेच परत फिरायचं होतं पण थोडसं थकल्यासारखं वाटतं होतं. डॉक्टरंनी तिला अराम करायाला सांगितलं.तृप्तीला बराच वेळ तिथे बसावं लागणारं होतं. घर काही हाकेच्या जवळ असले तरी लगेच जाता येणार नव्हतं.श्रेया होतीच तिच्या सोबत. चहा, बिस्कीटं ही घेतले.शांत थोडी बेडवर पडली होती. बेडवर पडून भिरभिरणा-या फॅनकडं ती एक टक पहात होती.भीतीचं सावटं होतंच चेह-यावर. श्रेया आली.तिचंत हात हातात घेत बोलली,“तृप्ती, थँक्सं.तू आलीस.नाहीतर केवढं टेन्शन आलं होतं मला.” तृप्तीनं बोलण्यापेक्षा हासणं पंसत केलं.ती छानसं हासली

“नाही म्हणालीसं नि परत आली?” श्रेयाला  स्वत:चं झालेलं कन्फूजन दूर करायचं होतं. अजून एक वर्षं ही झालं नव्हतं तृप्तीच्या लन्नाला. एवढं का घाबरते ती निलेशला. आपल्याला लग्नाला दोन वर्ष झालं तरी विवेकची अशी भिती नाही वाटतं.

“आलेयं मी. न येणं मला आवडलं नसतं नि आलेलं निलेशला आवडणार नाही.”

“निलेशला बोलू का मी? तू चांगलचं काम केलं आहे. एका माणसाला जीवंत राहण्यासाठी मदत केलीस.”

“शपथ.  हे तू असं काही करणार नाहीस.” तृप्तीनं तिच्या तोंडाला हात लावला.


“एवढं काय घाबरतेस? नवरा तुझा तो.बागूलबुवा थोडा?”


“बागूल बुवा.. ?” ती उदास हासली. लहानपणी मम्मीची. मम्मी बागूल बुवाच्या गोष्टी सांगायची. बागुल बुवा आला. बागूलबुवा आला. बागुल बुवा आला म्हणून तिला भीती दाखवायची.पण तिनं कधी बागूल बुवा पाहिला नव्हता. कधी तिला बागुलबवा दिसला ही नाही.बागुलवुवाला ती फार घाबरायवी. बागूलबुवाचं कसलं अस्पष्टं चित्रं तिच्या डोळयासमोर तरळलं.

“नवरा आणि बागुल बुवा. श्रेया, असली कसली तुलना करतेस ग?” तृप्ती बोलली. श्रेया काही बोलणार तेवढयात. विवेक आला. श्रेयाला त्यानं बोलावलं. खूणेनच तृप्तीला आराम करायाला सांगितलं. तृप्ती शांत पडली होती. ज्यासाठी आपण रक्तदान केलंय त्याला हे माहीत तरी होऊ शकत का? आपण त्याच्यासाठी आलोत. त्याला कुणी सांगेल का ? आपण त्याच्यासाठी रक्त दान केलं. आपण त्याच्यासाठी आलेत की श्रेयासाठी? तृप्तीला हा प्रश्नं पडला. अश्या अनेक प्रश्नांची वलय तिच्या मनात उमटतं राहिली.

     आता इथं उठून जाऊन त्याला पाहून यावं का? तो शुध्दीवर असेल ना? आपण पहायाला गेल्यावर त्याची नरानजर तर होणार नाही ना? बावळटासारखं पहात नसता बसला तर आपल्याकडं तर कदाचित त्याचा हा ॲक्सीडंट झाला नसता.बिच्चारा… तो जगू शकला हे कमी नव्हतं.अर्थात तो कोण होता तिचा तरी त्यानं जगावं अशी तीव्र अपेक्षा केली.तिच्या समोरचं धन्वंतरीची मूर्ती होती. त्याला आत जोडले. खर तर तिला प्रार्थंना करायची होती.त्यानं जगावं.मरून नाही जावं म्हणून…. लवकर बरं करावं म्हणून.प्रार्थना कशी करायची हे मात्रं तिला सुचत नव्हते.

   त्याला जाऊन पहावां का?नुसतं पहायला काय हरकत? तो आपल्याकडं पाहू शकेल का? ती उठली. ज्या वार्डंमध्ये तो होता. त्या वार्डंजवळ ती गेली. काचातून पाहू लागली.अर्थात तो शुध्दीत नव्हता.मृत्युशी झुंज चालू होती त्याची. लाईफ सपोर्ट स्टीअमवर त्याचं ह्रदय धडधडत होतं. सहानुभूतीच्या लाटा मनात उसळून आल्या.ती नुसती एक टक पहात राहिली.तिचं डोळं पाणवलं.ती ओक्सी बोक्सी रडली नाही हे काही कमी नव्हतं. तेवढयात निलेशचा फोन आला. ती घाबरली.तिचं हात थरथरतं होते.

“हॅलो तृप्ती,बरीयस ना?”

“बरी? पण तू आता का फोन केलास?”

“का? तू कामात आहेस?”

“नाही .. नाही. मी कसली कामात आहे. लगेच फोन केलास म्हणून विचारलं?”

“तृप्ती,मला सॉरी म्हणायचं तुला?”

“असं का बोलतोस?मी कुणी परकीय का?”

“मला आज फार गिल्टी होतं. रात्री तुझ्या सोबत तसं नव्हतं वागयाला पाहिजे मी.”

“शेवटी बायको मी तुझी. तू नवराय माझा. नव-यानं असंचं वागायचं असतं बायकांशी.”

“तुझा राग अजून नाही गेला? सॉरी..मला माफ करं.मला वाटतं कान पकडून माफी मागयाची तुझी.” निलेश लापटासारख बोलत होता.

“आता हे काय काढलस नवीनच? काम कर. नाही तर तुझी ती खडूस बॉस.. झापेल तुला.मी घरीचं ना? कुठं जाणार का?”

“नाही. घरी येतोय.”

“ कान पकडून माफीच मागायची ना?  तू तू संध्याकाळी पण करू शकतोस ना? आताच घरी का यायला हवं?”

“आपण पिक्चर ला जाऊयात. मी तीनच्या शोची तिकटं बूक करतोय.”

“असं काय वेडयारखं करतोस? ममा नि पपा येतील ना? तू संडेला प्लॅन कर.”

“म्ममा नि पप्पा आज नाही येत. ते उदया बसतेत मुंबईवरून.तू आवरं? मी आलो.”


“असं कसं आवरू.?” तृप्तीला काहीचं कळतं नव्हतं. याचा आपल्यावर संशय तर नाही ना? आज हा असा कसा येऊ शकतो डायरेक्टं घरी. पण का? ती पुरती गोंधळून गेली होती. आता लवकर घरी पोहचायला हवं. निलेश ?घर पोहचायच्याअगोदर आपण पोहचू शकू ना? त्याला हे  कळायाला नको आपण इथ आलोत म्हणून.


“ निलेश ऐक ना?”


“काही ऐकत नाही मी आता. तू रेडी हो.” निलेशतिचं काहीच ऐकून घेत नव्हता. ती काही बोलणार होती पण त्यानं कॉल कट केला होता. काही वेळ ती नुसती हॅन्डसेट कडच पहात राहीली. जेव्हा ती चालु लागली. तेव्हातिच्याकडें एक माणूस नुसता टक लावून पहात होता. तो बराच वेळ तसचं पहात असावा. ती सावरली. साडी नीट केली. आपण जे फोनवर बोललोत  ते यानं ऐकलं तर नसेल ना? त्याच्याकडं पाहीलं तर ते बावळटं गालातल्या गालात हासतं होतं. ती वरमली. असाचं हॅन्डसेट त्याच्या नाकावर फेकून मारावा असं ही वाटलं. असं फक्त वाटलचं तिला तसं काही केल नाही. ती पदर अंगाला लपेटून तिथून हालली. त्या आंबट नजरेपासून वाचण्यासाठी ती दुसरं काय करू शकत होती? श्रेया धावत आली.


“तृप्ती थांब ना?” श्रेया बोलली. श्रेया झरा झरा चालतं तिच्याजवळ आली.


“प्लीज.. श्रेया नको. मला घरी जायला हवं.निलेश घरी येतोय.” श्रेया तिच्याकडं चालतं येत आसली तरी तृप्ती थांबली नाही. ती चालतच होती. श्रेयानचं शेवटी गाठलं तिला.


“एवढं काय घाबरतेस? जाशील ना? का मी बोलू त्याला इकडं?”


“ नको नको.. प्लीज असं काही करू नकोस.” तृप्तीच्या चेह-यावर उमटलेली भीती झाकली नाही.


“तो ऑफीसला गेलाय ना? मग दुपारींच कसा घरी येतोय?”


“आम्ही पिक्चरला जातोय.”


“क्काय? इतकं अचानक?”


“तो निलेश बाई. काही ऐकल तर?”


“ऐकावचं लागतं. नवरा कसा मुठीत ठेवायचा आसतों. माझ बघ. कसा शांत आहे. एक शब्दं मोडत नाही माझा. त्याला सांगून टाक माझा मूड नाही म्हणून.”


“नको.. नको.. त्यानं एकदा ठरवलेलं नाही रदद केलेलं त्याला नाही आवडणारं… निघते मी.” तृप्तीचं चित्तचं था-यावर नव्हतं.


“बरं विवेकला सोडायाला सांगू का?”“नको नको. कशाला? जाते मी. रिक्षा भेटतील की मला लगेच” ती फास्टं चालत होती. चालणं नव्हतचं ते.. पळणं होतं.तिला धाप लागली होती. श्रेया नुसती पहातचं राहीली.तृप्तीचं काय चाललं हे तिला कुठं काय कळतं होतं? ती नाही म्हणून पुन्हा रक्तदाने करायाला आली. आता लगेच चालली. निलेशला इतकी का घाबरतेय. लग्नाच्य सुरूवातीच्या काही ‍ वर्षं नवरा कसा मुठीत राहतो. एकमेका विषयीचं प्रेम नि विश्वास या दिवसात वाढतो. तृप्तीच्य बाबतीत काही तरी वेगळं होतं. ती फारसं बोलत नाही.तिनं बोलायाला हवं. तिची घुसमटं होतोय एवढं नक्की. श्रेया विचारत करत बसली तो पर्यंत तृप्ती निघून ही गेली होती.


 


तृप्ती घरी पोहचली.तिचा जीव भांडयात पडला.अजून तरी निलेश घरी पोहचला नव्हता. घरात शिरली. तिच्या हातातला दम नव्हता. बरचसचं तिनं आवरलं. फ्रशे झाली. थकल्यासारखं वाटतं आसलं तरीमिला फ्रेश दिसायचं होतं. ती ड्रेसींग रूम मध्ये होती. आता काय घालाव? साडी का ड्रेस.. का जीन्सं व शर्टं घालावा? आजा आपण बाहेर जातोय. अधिकचं सुंदर नको दिसायला. अगदी तिला न आवडणारी  साडीनि  घातली.तिला फ्रेयादिसायचं आसलं जरी आस सुंदर दिसायचं नव्हतं. कशी बशी तयार होउन ती बसली. तेवढयात निलेश आला.


ती कृत्रीम हासली. नवरा घरात आल्यानंतर बायकोनं जेवढं हसावं अगदी तेवढचं हासली ती.तिच्या प्रत्योक हालचालीत कृत्रीमता होती. निलेशनं बॅग ठेवली. तिच्याकडं थोडा वेळ बघत बसला. अर्थात नखशिखान्तं. त्यानं थोडसं हासू ओठात उमटवलं.


“हे काय घातलेस?”


“साडी?”


“आता आसली साडी घालून तू बाहेर येणारेस?”


“हो.माझं संपूर्णं अग झाकू शकले मी.”


“बायको माझी तू. कामवाली नाहीस.”त्याच्या स्वरात त्रागा होता. असं वागून तृप्ती त्यचावर सूड घेत होती.


“कामवाली वाटतेय मी?”


“ तर ओरीजनलं कामवाली. तृप्ती, तुझा राग  नाही गेला अजून?”


“यात माझ्या रागाचा काय संबंध? तू तयार हो म्हणालास? मी तयार झाले?”


“असचं बाहेर येणारेस? आपण पिक्चरला जातोय.. भाजीमंडीत नाही.”


“ही साडी बरी नाही वाटतं?”


“असं का करतेस?”


“कुठं काय करते? जाऊयात की मी? आय ॲम रेडी.”त्याच्या गळयात लाडानं मीठी मारत ती बोलली.


“तृप्ती, आता माझा मूड घालवणारेस का तू? चेंज कर प्लीज.”


“नाही. आता बाहेर जाताना असचं जायचं.मी बाहेर जाताना कशाला अधिक सुंदर दिसायाला हवी? जास्तं नटून गेले. कुणी माझ्याकडं पाहीलं की तुला…..”


“तृप्ती,सॉरी. सॉरी… !” त्यानं लगेच कान पकडलं. उठबश्या काढू लागला.


“निलेश काय हे?माझ्याकडं कुणी पाहीलं की तुला राग येतो.”


“आता तरी माफ करशील ना?” तृप्तीनं त्याचं हात पकडले. त्याला तशीचं बिलगली. त्यानं तिला मीठीत घेतलं.


“बायको तुझी मी.बाहेर जाताना कशाला सुंदर दिसायाला हवी.हवी तर बेड रूम मध्ये नटत जाईल.”


त्यांन तिचं तोंड हातानं बंद केलं.


“बेडरूम मध्ये कुठं कपडयाची गरज असते?”


“गप चावट कुठला?”तिनं त्याच्या दंडावर लाडानं दोन चापटा मारल्या.


“फक्त बायको नाही माझी तू.. मेरी जान .. मेरा प्यार…” हे शब्द वापरतानी त्यानीं ओठांची वापर केला.तिला कपाटाकडे घेऊन गेला. जीन्सं..नि शर्टं तिच्या हातात दिला.


“आता हे घालू? तुझं डोकं तर फिरलं नाही ना? आता मी काय कॉलेजला थोडीचं.लग्न झालं माझं. नव-याची बायको मी.”


“ बायको नाही. गर्लंफ्रेंड माझी तू.गर्लंफ्रेंड थोडयाचं साडीत असतात?”


“असं कपडे घालून गेल्यावर.. लोक नुसतं पहात बसतात..”


“पाहू दे. आहेसचं तशी…”


“कशी?” तिचा हा प्रश्नं  फार स्फोटक होता. शब्दापेक्षातिची अदा भयानक होती.निलेशला थोपवणं तिला ही शक्यं झालं नाही. तृप्ती तरी कुठं स्वत:ला कंट्रोलं करू शकली. ते कपडे घालून ती तयार झाली होती.निलेश पहातचं राहीला. तृप्ती आता बायको नव्हती तर त्याची गर्लफ्रेंड झाली होती.


गाडी चालू करून ते निघाले.


“असं सारखं सारखं माझ्याकडं पाहू नकोस बावळटासारखं?”


“का?


“आता माझी मम्मी नाही इथे. मग माझी दृष्टं कोण काढेल?”


“मी आहे ना?”


“आता बायकोची दृष्टं काढणार?”


“बायकोची नाही.माझ्या गर्लफ्रेंडची…. “ गाडी चालवत असल्यामुळे तो फक्त बोलू शकला. ती फक्त मधाळ हसु शकली.


 (पुढील भाग लवकरचं)


शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

राजकारणं घाला चुलीत पहिले आरक्षण दया


 राजकारण तुमचं  चुलीत घाला. 

मराठा संघटना आरक्षणाच्या मुददयावर आक्रमक.

राज्यातील मराठा समाजाला देण्याल आलेले आरक्षण सर्वच्च न्यायलायनं तात्पुरतं स्थगित केलेले आहे. दोन वर्षापासून मराठा समाजातील विदयार्थ्याना त्याचा फायदा झाला होता सर्वेच्च न्यायलयाने दिलेली स्थगिती राज्यातील मराठा समाजातील विदयार्थ्याना हवालदिल करणारी आहे व संताप आणणरी आहे.मराठा आरक्षण कायम राजकरणात ऐरणीवर राहीलेले आहे.आरक्षणाचं घोंगड भिजत ठेवण्यातचं सर्वच राजकीय पक्षांच कल राहिलेला आहे.सर्वेच्च न्यायलयच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती नंतर ही मोठया प्रमाणात राजकराण करण्यात येत आहे.मराठा आरक्षणाच्या दिले त्या वेळेस श्रेयवादासाठी झुंबड उडाली होती.आता या सदर्भात आलेल्या अपयाशाचे खापर दुस-याच्या डोक्यावर फोडण्याची स्पर्धा लागली आहे.

  सर्वच पक्ष व राजकीय व्यक्ती आपलं राजकीय हीत लक्षात घेऊन मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीवर बोलत आहेत. काही सरकार बाजू मांडण्यात कमी पडले आहे असं सांगून महाविकास आघडीवर त्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर काही पक्ष सर्वच्च न्यायलयचा निकालवरचं  प्रश्न चिन्हं उपस्थित करत आहेत. हे राजकरण रंगल आहे पंरतु या क्षुद्र राजकणात भरडला गेला आहे तो मराठा समाजातील तरूण.अनेंक विदयर्थ्याचे आयुष्य बरबाद करणारी ही स्थगिती आहे. आज  ही समाजातील गरीब मुलांना शिक्षणासाठी पैसा नाही.हाताला काम नाही.मराठा तरूण हतबल झाला आहे.अनेक जण मरणाला कवटाळतं आहेत.पुढारी मात्र  मराठा तरूणांना आधार देण्यापेक्षा त्याचं राजकारण करतं बसतात.  योग्य उपाय करून मराठा समाजातील विदयार्थ्यांना दिलासा देणं महत्वाण्चं आहे.

           आशावेळी मराठा समाजातील दियार्थ्याचे हित लक्षात घेउन प्रत्येक पक्षाने आपआपल्या भूमीका मांढल्या पाहिजेत. मराठा समाजातील  लोक प्रतिनिधी आपल्या पक्षीय  भूमिका व हीत सोडून एकत्र आलं पाहीजे. मराठा समाताजील मुलांना येणा-या अडचणी बाबत दिआलसा दायक तरी बोलं पाहीजे. अशी अपेक्षा समाजातून करण्यात येत आहे.

                      मराठा आरक्षण न्यायालयात टकणार नव्हतं तर ते ले कशाला? घटनेची पायल्ली होईल् असं आरक्षण् देता काशाला?सर्वच नियमाचं पालन करून आरक्षण दयायाला पाहीजे.असं तुष्टीकरण व लालचांगूण करणार आरक्षण आम्हला हवे आहे. मराठा समाजात मोठया प्रमणात रोष पसरला आहे. मोठया प्रमणात अंदोलन उभ राहण्याच्या शक्याता आहेत. राजकारण गेलं चुलीत आमच्या मुलांच्या भवितव्याच विचार करा  असा ही इशारा मराठा संघटनाकडून देण्यात येत आहे.

                  नवरात्रोत्सव-शक्तीचा जागर 


 
वरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा शक्तीचा उत्सव.समाजात तो इतक्या विविध प्रकारे साजरा केला जातो तो पाहून थक्क व्हायला होतं. प्राकृतीक उपल्बधतेनुसार व सामाजिक गरजेनुसार त्यात विविधता व स्वरूप देण्यात आलेले आहे. अलीकड काही त्याचं वाढतं सार्वजनिक स्वरूप राजकीय प्रेरीत ही झालेले आहे.गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे.जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते.  घराघरामध्ये  होणारा हा उत्सवं  आता  सार्वजनिक उत्सवात रुपांतरीत झाला आहे. देवीला शक्तीचं रूप मानलं जातं.वेंदात तत्वज्ञानात ब्रम्हं-माया च्या रुपात विश्वाचं रूप गृहीत धरलं आहे.अनेकदा  देवांनाही राक्षसाचं संहारं करणं शक्य झालं नाही त्यावेळी देवीनी अवतार घेन राक्षसाचं संहार केल्याच्या अनेक पुराण कथा आहेत.

                   इतिहासात ही अनेकदा स्वारीवर जाताना देवीची,ग्रामदेवीची ,कुल देवीची अराधना केलेले संदर्भ आहेत. अनेक राजे महाराजे यांनी देवीचे मंदीरे बांधली आहेत.अनेक देवीच्या उत्सवात राजा महराजाच्या मानापानाने सहभाग असे. कुल देवी,ग्रामदेवी अश्या स्वरूपातलोक देवीला पुज आले आहेत.शिवाजी महाराजांच्या अनेक गडावर देवीची मंदीरे आहेत.स्वातंत्र लढयात ही स्वातंत्र वीर सावरकराचं जयोस्तु श्री महन्मंगले.. हे गीत प्रचंड प्रेरणा देणारे ठरलेले आहे.हे गीत आज ही  ऐकताना आपल्या नसानसात स्फुलींग उसळत राहतात.

          त्यामुळे आपल्या धर्मात व इतिहासात देवीला फारचं महत्त्वाचं स्थान आहे.देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. विजयदशमी दुष्टतेला संहार केल्याचा हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करण्यात ये लागला.देवीच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:असेच म्हटले जाते. एरवी, ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुतेअशी तिची प्रार्थना केली जाते.घरामध्ये नवरात्रीत घटस्थापना करण्यात येते.अखंड नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवण्यासाठी मोठा दिवा घेतला जातो. घरातील जेष्ठ लोक तो नंदादीप विझला जाणार नाही याची काळजी घेतात.

 नादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी,

मोह महिषासुर महिषासुर मर्दना लावूनी

त्रिविध तापाची करावया झाडणी,

भक्तालागी तू ऽऽऽ

भक्तालागी तू पावसी निर्वाणी,

ऐसा जोगवा जोगवा मागेन।

द्वैत सारूनी माळ मी घालीन,

हाती बोधाचा झेंडा मी घेईन,

भेदरहित वारिसी जाईन,

ऐसा जोगवा मागेन।

नवविध भक्तीच्या भक्तीच्या करिती

नवरात्री, ओटी मागेन मागेन ज्ञानपुत्रा,

धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा

असा सद्गुणांचा, नि:संग होण्याचा, विकल्प, काम, क्रोध सोडून देण्याचा आणि जन्ममरणाचा फेरा चुकविण्याचा जोगवा मगला जातो. या जोगव्यामध्ये फार मोठा आध्यात्मिक अर्थ भरलेला आहे. मात्र तो समजून घेऊन, जोगवा मागितल्यास मनशुद्धी होऊन मन:शांती नक्कीच मिळेल. निर्गूण स्वरूप असलेलं देवीचं रूप  सुगण रूपात नवरात्रीत पुजलं जाते.

                                  परशुरामाची जननी म्हणजे रेणुका माता अर्थात माहुरगडवासिनी. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक कोल्हापूरची अंबाबाई दुसरी तुळजाभवानी, तिसरी रेणुकामाता ही तीन पूर्ण पीठे आणि नाशिकजवळ वणीची सप्तशृंगी हे अर्धेपीठ मानले जाते.या सर्व ठिकाणी नवरात्र मोठय़ा प्रमाणात साजरे होतात. तेथे दर्शनाला जाण्याची भक्तांची धडपड असते. पण ते शक्य झाले नाही तर निदान ग्रामदेवीच्या दर्शनाला तर आवर्जून जातात.शेवटी दर्शनाला जाऊन, मनाची शांतीच मिळाली पाहिजे. हाच तर सा-यांचा प्रयत्न असतो.

                                 नवरात्रीत गुजराथी महिला गरबा नृत्य करतात. सजूनधजून त्या गरब्यासाठी उतरतात आणि रात्री उशिरापर्यंत त्यांचे नाचगाणे सुरू असते. रंगमा रंगमा, रानी बहुचरमा खेले रंगमा’, ‘नौरात्रीमा नौ नौ दिवसमा’, किंवा पंकिडा तू उड न जाना, पावा गडोरे महाकाली से मिलने चलो, गरबा खेलेंगेअशा पारंपरिक गीतांवर, मंदिरामध्ये गरबा खेळला जातो. पूजेचा एक भाग म्हणून केला जाणारा गरबा हळूहळू व्यावसायिक रूप घेऊ लागला आहे. हजारोंची तिकिटे लावून, विशेष सेलिब्रिटीज बोलावून गरबा खेळला, नाचला जातो. त्यामध्ये अलीकड बरेच गैरप्रकारही होतात. धार्मीक स्वरूप जान फक्त सोहळा उरतो तेव्हाचं सल्या विकृती निर्माण होत असातात.असेच गैरप्रकार दर्शनाच्या रांगांमध्येही होतात. उत्सवाचे पावित्र्य त्यामुळे संपत जाते.तरुणाईचा जोश मान्य, पण त्यातून निर्माण होणारे गैरप्रकार थांबले पाहिजेत. सण, उत्सवांमधील शुद्ध, पवित्र भावना जपली पाहिजे. अश्या उत्सवातून लोंकांच्या मनात सांघिक भावना निर्माण होन मानव कल्याणासाठी उर्जा निर्माण होणं आवश्यक आहे.तरणाईची उर्जा ही सकारात्कतेत रूपांतरीत झाली पाहिजे.देवीच्या विविध रूपांची आराधना करताना, मनामध्ये भक्तिभाव उभारून आला पाहिजे.मन भक्तीरसानं ओथंबून जायला हवं.

पूर्ण बोधाची, बोधाची घेईन परडी,

आशा तृष्णेच्या, तृष्णेच्या पाडीन दरडी

मनोविकार करीन कुरवंडी

अद्भुत रसाची रसाची भरीन दुरडी

ऐसा जोगवा जोगवा मागीन

अशा प्रकारे मनोविकारांची कुरवंडी करण्याच्या भावनेतून, देवीच्या चरणी लीन व्हावे. केवळ नऊ दिवसांचे उपवास केले म्हणजे झाले असे नसून, उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून, मनोविकार, पापवासना, दुष्टबुद्धी या साऱ्यांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रात होणे अपेक्षित आहे. ज्या शक्तीचे, सामर्थ्यांचे दर्शन देवीने घडविले, तशी शक्ती, सामर्थ आपल्या ठायी निर्माण व्हावे, याचसाठी हा उत्सव आहे, तो त्याच पवित्र भावनेतून साजरा व्हावा.शक्तिरूपाचा जागर केल्यास, आपण शक्तिमान होऊ, हा विश्वास बाळगून, उत्सव साजरे केले जावेत. आपल्या आत असलेल्या शक्तीचा जागर नवरात्रोत्सवाच्या माध्यामातून होणे गरजेचं आहे.अनेक उत्सवाला आपल्या आपल्या स्वार्थनुरूप स्वरूप देणारे असतातचं.त्यातून ही माणसात दडलेल्या शक्तीचा जागर करण्यासाठी अश्या उत्सवातून प्रयत्नं होणं गरजेचं आहे.

 

                                                         परशुराम सोंडगे, पाटोदा

त्या मराठवाडायाला
      त्या मराठवाड्याला

फक्त

  मतदानाच्या दिवशी

झोपेतून उठवलं तरी पुरेसं आहे

तो ऊसाच्या बुंध्यापाशी

असा कोणी

 माणूस बांधला आहे ?

हातां-पायांतल्या साखळदंडांना

इथं चमकावित राहतात माणसं

वेठबिगारीचा वारसा

चालवित राहतात माणसं

हे इतकं सुस्त पडलेलं

कोणत्या परुडाने 

फूकलेलं गाव आहे....?

घोषणेवरच देतो ढेकर

विकासाचे स्वप्न न पडलेला

इथला माणूस...

मुंबई मनसोक्त चघळून

थूंकून टाकते पान- मराठवाड्यासारखे...

जातींच्या खूराड्यात सरपटणारी माणसं,

जगण्याचे सोपस्कार उरकून

मातीत कूजण्यास होतात मोकळी

पोटावरच्या टाक्यांवर हात ठेवून

घरी जाणाऱ्या बाईचे

गर्भाशय हरवले आहे..

एका रस्त्याच्या कडेला

सकाळ - संध्याकाळ

एक खरजूलं कूत्रं असतं 

निरर्थक

नख्यांनी स्वतःला रक्तबंबाळ

करीत बसलेलं...

असा उभा नांगूर धरला तर

इथं मूलींची कोवळी हाडं

येतील वर..

अनुशेषाच्या टपरीवर

मिळतो मावा, गायछाप,

कोंबडा कटेल, चारमिनार,

120........300

बेसुर, बेभान वारा,

माशा बसलेले तोडलेले

बोकडाचे मुंडके

उकांडा उधळून गेलेले बदगे..

सामूहिक बधिरपणाचे वारुळ


वाढत गेले आहे नेहमीच

मराठवाड्याच्या आत्म्यावर..

आणि त्यामुळेच,

अंगावर वाढत गेलेल्या बाभळी

आणि डोळ्यांत फूटलेली निवडूंगं

बोचत नाहीत आम्हाला..

माझे निरिक्षण आहे की,

ऋतू होतात बेइमान इथे

पण माणसांचे खून पाडण्यात

इथे कोणतीही

अनियमितता नाही...

मला तरी अजून

हे कळलेलं नाही

की,

मराठवाडा निघाला कोठून

आणि पोचला कुठे...?

मराठवाड्याची सावत्र आई

फेकते ताटात 

उरलेल्या

भाकरीचा टुकडा- मुकडा

पश्चिम महाराष्ट्राची साखर

शुभ्र पांढरी आहे,

अशी वंदता आहे..

पण मला ती नेहमीच

रक्तवर्णी दिसते...

जन्माला येणाऱ्याने    


असे विनातक्रार

बेगुमान

जगण्याचे लोढणे ओढणे

ही अवनतीची असीम अवस्था आहे..

तूम्ही जरुर म्हणा..

हे सुवर्णयुग आहे

पण,

दररोज तोंडावर थुंकणाऱ्या आरश्याला

कसं टाळायचं....?©️   *बाळासाहेब नागरगोजे*

      📱9403599807

रविवार, ११ सप्टेंबर, २०२२

गुंतता ह्रदय हे (भाग2)

 तृप्ती जरी निलेशच्या मिठीत आसली तरी तिच्या मनात मात्रं त्याचेचं विचार येत होते.खरतरं ती त्याला बोलली पण नव्हती.कोण होता तो?कुठं राहतो तो? त्याचं नाव काय? तिला काहीचं माहित नव्हतं. माहित असण्याचं कारण ही नव्हतं. ती त्याला पहील्यांदाचं पहात होती. त्याचं नाव काय असू शकेल? याचा अंदाज ती बांधू लागली. खरतर तसा अंदाज काढणं शक्य नसतं पण त्याचं काय नाव असावं अशी कल्पनाच ती करू लागली.अश्या आकर्षंक मुलांची काय नाव असतात? तिला अनेक नावं आठवू लागली.अर्थात अश्या आकर्षंक पोरांचीच.तिला इंम्प्रेस केलेल्या पोरांची. ती तिची आवडती नावं त्याला चिकटवून पाहू लागली.


         तो तिच्याकडं आकर्षीत झालाय.हे तिच्या ही लक्षात आलं होतं.ती पण त्याच्याकडं खेचली जात होती. हे सारं नकळतच होतं होतं. आपलं मन सारं बंधनं तोडून त्याच्या कडं ओढलं जातं हे तिला ही कळतं होतं.तिचं वागणं ही सादास प्रतिसाद देणं असचं होतं. शाळेत असतानी अश्या प्रकाराला मुलं मुली लाईन मारणे म्हणायचे.तो लाईन मारत होता नि ती त्याला लाईन देत होती.लाईन क्लेअर झाल्यावर तो बेफीकर वागणं साहजिकचं होतं.त्याचं धाडसं वाढलं होतं नि हिचं काळीज थरथरतं होतं. काळीज थरथरणारचं ना? निलेश तिच्या नवरा तिच्या सोबतचं होता.आपला नवरा सोबत असता अश्या परक्या पुरूषांकडे पहाणं सोपी गोष्टं नसते.कोणत्या ही क्षणी तिच्या संसाराच्या चिंधाडया होऊ शकतं होत्या.मन थरथरतं असलं तरी त्याच्याडं पहाणं रोखता येतं नव्हत.नजरेला पण चटक लागतं असेल? नुसतं रोखून पाहणं ही किती रोंमाटीक असतं,नाही?


         त्याचं लग्न झालं असेल का? आपल्याला जसा नवरा आहे तशी त्याला बायको असेल का? जर बायको असेल तर ती कशी असेल? तिचं मन त्याच्या बायकोची कल्पना चित्रं गोळा करू लागलं.कल्पनेत उमटलेली चित्रं नि स्वत:ची तुलना तिचं मन करू लागलं. त्याची बायको नेमकी कशी असेल? चैत्राली सारखी. प्रणाली सारखी..?अनेक सुंदर सुंदर मुलींची नावं तिला आठवू लागली. कदाचित आपल्या सारखी तर नसेल ना?मन आकाशासारख असतं.आकाशात नाही का? ढगांचे आकार कशाचे ही नि कसे ही होतात. तसचं झालं हे. आपण त्याची बायको असतो तर हा प्रश्नं मनात उमटला. तशी ती दचकली.


              असं मनात काही बाही नको यायला. असला अभद्रं विचार आपण कसा काय करू शकतो? हा पण एक प्रकारचा व्याभिचारच आहे ना? कायीक व्याभिचार.. वाचीक व्याभिचार.. मानसिक व्याभिचार… व्याभिचाराचे असे काही प्रकार असतील का? असतील का नाही तिला माहीत नव्हतं पण तिनं तसे प्रकार केले होते.पुराणातल्या अश्या व्याभिचाराच्या कथा तिला आठवू लागल्या.कर्णं आणि द्रौपदी…शाप, उ:शाप… कसले भंयकर शाप असत पूर्वी. निलेशनं असा काही शाप दिला तर? तो देऊ शकेल शाप…? पश्चातापचा तवंग मनाच्या पृष्ठभागावर पसरत गेला.तिनं निलेशच्या डोळयात पाहिलं. निलेश तिच्याच डोळयात पहातचं होता.भरकटलेलं मन डोळं नाही लपवू शकत.


“तृप्ती लक्षं कुठं तुझं?” तिच्या चेह-याला अलगद स्पर्श करत निलेश बोलला.


“माझं लक्षं? तुझ्या डोळयात पण तुझं कुठं?” ती भानावर आली. मनातलं भलतं सलतं दाटलेलं तिनं झटकून दिलं.मनाचा तळ अगदीचं निथळं केला.ती स्वच्छं हासली.इतकं पुरेस नव्हतं म्हणून की काय तिनं ओठांनी  ही वापरलं.त्याच्या छातीवर ओठ ठेकवत त्याच्या डोळयात पहात राहिली. डोळयातून थोडचं मनात काय चाललं हे दिसू शकत? त्यासाठी शब्द तिनं मदतीला घेतले.घ्यावाच लागले.


“तुझ्याकडंचं.”तिचं केस विस्कटतं तो तिच्या नजरेत नजर घुसवत राहिला.काही क्षंणच.


“असं काय पहातोस? असं काय नवीन आहे माझ्यात?”


“सॉरी.ते नाही सांगता येणार मला.सारे रोजचेचं तरी नाव्याचा भास हा.”त्यानं मनातलं नि ओठातलं आलेलं बरचसं चोरलं. काही शब्द पण दुदैवीच असतात.ते असेचं मनातली मनात विरून जातात.


“खोटं.. सारं खोटं.”तिनं लटक्या रागाचं रंग  चेह-यावर पांगवला.


“खोटं नाही बोलू शकत मी,माहितीयं ना तुला?”


“मग असं का वागलास माझ्या बरूबर.संशय तुझा माझ्यावर?” त्याच्या डोळयात आरपार पहात ती बोलली.


“तसं नाही ग.तुझं वागणं सहजच होतं पण त्यानं कसा अर्थ काढला.वेडपट असतात पुरूष.असली थिल्लर पोरं तर फारचं विचित्र असतात."


"तू नाही विचित्र?"


"मी तुला विचित्र वाटतो?"


"तुझं पहाणं पण सभ्य नाही ,बरं"


"तुझ्याकडं सभ्यपणानं पाहू मी? मी नवरा तुझा...?"


"माझा नवरा होण्याच्या अगोदर...तुझं पहाणं..."


"तू आपल्या जाम आवडली होती.तुझ्या साठी काही पण.." तिला आपल्या अंगावर जोरात खेचतं तो बोलला.


"का?जाम आवडण्या सारखं काय आहे माझ्यात?"


"ते नाही सांगता येणार." तो तिला बिनधास्तपणे मनातलं सांगू शकला नाही.त्यानं मनातलं बरचसं चोरलं.


"खरं खर सांग.मी बायको तुझी.मला कसला संकोचतो."


"शट अप.तू फक्त माझीस...आणि माझीच आहे." आपल्या छातीशी  तिला अधिक कवटाळतं तो बोलला.


"मी दुस-याची बायको असते तर?"


"असं का बोलतेस?तू माझी बायकोस."


"समजा....असते तर तू काय केल असतं?" तृप्ती खर तर त्याला गुगली टाकली होती.तिचं बोलणं त्याला कळलं नाही.निले चं काय कोणत्याचं पुरूषाला रोंमाटिक मूड मध्ये भान उरतं नाही.


"काही ही....."


“बरोबर बोललास.कारण तू पण एक पुरूषचं आहेस ना?”


"मग"


"पुरूष मेले सारे सारखेचं...कुणी स्री दिसली लगेच....लाळघोटायला सुरू करतात."


“पण मी थोडा तसा.”


"निलेश, तुझ्या पण फार तक्रारीत माझ्या मैत्रिणीच्या.."


"कसल्या?"


"आवर बाई दाजीला...नुसतं थोबाडाकडं पहात असतात."


"कोण आहेत ग त्या...रांडा..?"


"निलेश, असं चिडू नको.त्या माझ्या मैत्रिणी आहेत. त्या रांडा नाहीत. त्या सालस..सोज्वळ आहेत  म्हणून तर मला सांगितलं ना त्यांनी."


"रांडा नाहीत ना?मग असा काही ही आरोप कश्या काय करू शकतात त्या? मी थोडाचं तसा?"


“कसा? आहेस मग?”


“त्या बावळटासारखा… कसलं पागलं होता तो. सारखं तुझा कडचं पहात होता.”


“तो पहात होता मग मी काय करू? अश्या बावळट पुरूषाची कमी नाही या जगात.” तृप्तीनं त्याच्या पोटावर चिमटा काढत बोलली.


“अश्या ठिकाणी आपण होऊनचं काही मर्यादा घालायला हव्यात.काही पथ्यं पाळायला हवेत.लोक फार विचित्रं असतात ग.”


“कसली पथ्यं?मला थोडाच डायबेस्टीक.?” तिनं उगीचं फालतू कोटी केली.थोडसं हासून त्याला रिलॅक्सं करायचं असावं तिला किंवा तो अधिकचा चिडू नाही म्हणून असेल कदाचित.


“डायबेस्टीक नाही ग पण?”

“पण काय?”

“तू सुंदरेस...तरूणेस... अधिकचं नटलीस की बिच्चारे...किती जण तरी पागल होऊ शकतात?"
"कुणी पागल झालं तरी....मी नाही ना पागल?खानदानी रक्त माझं." आपल्या चारित्र्याचा संबंध लोक खानदानाशी जुळतात. पवित्र असण्याचा तो एक पुरावा असतो.
"खानदानी...!! मग का ते पागल  झालं होतं?"

“असचं बोलणारेस का तू? कसला घाणरेडा आरोप करतोस माझ्यावर.शपथ. कसं सांगू तुला? या अगोदर नाही पाहिलं मी कधीचं त्याला.तो पहात होता माझ्याकडं, मी नाही?आपल्याकडं कुणी पहात असल्यावर.. आपण काय करू शकतो?कसलं प्रायचित्त घेऊ मी?”


“कसलं चिडतेस ग? मी कुठं काय म्हणालो आहे.”


“निलेश तू असं काही भी बोलू शकत नाहीस बंर.”

“इटस्‍ नॅचरल. जसा तुझा दोष नाही. तसाचं त्याचा तरी काय दोष? तो तरी काय करणार बिचारा… आहेसचं तशी तू.”

“कशी मी?”

“तू सुंदर नि व्हॉटं.सेक्सी.आज तर कमाल केली होतीस.एकदम जबरदस्तं दिसत होती. त्या बावळटाचं काय घेऊन बसलीस. सारेच तुझ्याकडं पहात होते.कुणी तुझ्याकडं तसं पाहिणलं की नाही सहन होत मला.”


“का?”


“का म्हणजे बायको तू माझी.”


“हो,मी तर विसरलेच होते.मी तुझी बायको आहे नि तु माझा नवरा.नव-यानं बायकोला मारायचचं असतं. शिव्या घालायच्या असतात. वेडीचं मी. बायको म्हणजे फक्त बायको असते. ती थोडीचं नव-याची प्रेयशी,गर्लफ्रेंड होऊ शकते. ती असते एक गुलाम.नवरा असतो तिचा मालक.मालक गुलामचं नातं असतं नवरा आणि बायकोचं.ङ मी वेडी प्रेम,मैत्री,प्यारं.. इश्कं असं काही नसतचं मुळी नवरा बायकोमध्ये.”


“असं का बोलतेस?^


“खरं तेच बोलतेय. लग्न झालयं आपलं. हे मगंळ सूत्रं घातलं माझ्या गळयात. तुझ्या नावाचं हे लायन्सं आहे ना? तू मला हवं तसं वापरू शकतो.वाटेलं ते बोलू शकतो.माणसाचं शरीर असतं बायकांना. त्यांना मन थोडचं असतं. उपभोग्य वस्तूना मन असून तरी काय उपयोग?”


“तृप्ती  काय लावलं हे?”


“सॉरी. पुन्हा नाही बोलणार मी.आता कळलं मला.फक्त बायको मी?” त्याच्या छातीवर एक करकचून चिमटा घेत व  राग चेह-यावर पांगवत ती बोलली.

“सॉरी…!! फक्त बायको नाही. तू तर जान है माझी… माय लव्हं.. पिसेंस ऑफ माय हर्टं..” असले शब्द माणूस कृती शिवाय थोडचं उच्चारू शकतो? श्वासात श्वास मिसळत गेले.


“तू फक्त माझी आणि माझीच आहेस. दुस-याची नाही होऊ शकत.”


“मी तुझीच आहे रे पण तू?”


“तू संशय घेतोस माझ्यावर.”


“मी नाही. तू ?” त्याचे उचकटलेलं ओठ हातानचं बंद केले.खोल डोळयात पहात ती बोलली.


“संशय नव-यानं बायकोवर घ्यायाच असतो.मी थोडीचं तुझा नवरा आहे?” ती गंभीर होती. त्यानं आपली मिठी अधिकचं घटं केली.


“माय लव्हं. ..माय हर्टं…” तृप्तीला पुढचं त्यानं बोलूच दिलं नाही.त्यानं ओठांनी तिचं ओठं बंद केलं होतं. पहाटेची चांदणी नुकतीचं उगवून आली होती. पारिजातक सांडत होता. गंध दरवळत होता.


 


कोवळं उन्हं आत आलं.निलेश अजून ही शांत झोपलेला होता.तृप्ती उठली होती. तिची अंघोळ पण झाली होती. त्याला उठावं का? त्याला उठावं तर लागेलचं. ऑफीसाला जायला उशीर होईल त्याला. उशीर झाला की पुन्हा चिडंचिड होईल.सांशयाचं विषाणू माणसाच्य मेंदूत शिरले की माणूस हैवान बनतो.रात्री त्यांन मारलं. निलेश इतकं क्रूरं वागू शकतो? आता त्याचा राग सारा निवळला. हे तिनं अनुभवलचं होतं.पण संशयाचं काय?


                    आता तिला विचार करत बसायाला वेळ नव्हता. सारं आवरायचं होतं. निलेशला उठवलं. ती अधिक प्रेमानं वागतं होती. त्याचं सारं आवरलं. त्याला ऑफीसला ही  पाठवलं. ते पण हासत हासतं.खर तर ते हसू नव्हतचं.तो हासण्याचा रंग फासून घेतला होता चेह-यावर. रात्री त्यानं मारलेलं तिला विसरता आलं नव्हतं. आज ऑफीसाला जाताना ही त्यानं एकांताचा पुरे पूर फायदा घेतला होता. अंघोळ करून ती खिडकीत उभी राहीली. ओले केसं… टॉवेलानं सुकवत उभी होती. ती रस्ता पाहू शकत होती. रस्ते वाहत होते. वाहनं धावत होती. शाळाकरी मुलं मुली हासतं हुंदडत जात होती.माणसं आपण होउनच गतीची सक्ती करून घेतात. हे सारं पहात असातना तिला तो आठवला. खरचं तो जगू शकला असेल?


तर्कं विर्तंकच्या चरख्यात तिचं मनं बराचं वेळं पिंळवटून निघालं होतं. तेवढयात तिचा फोन वाजला.


श्रेया होती. श्रोयानं इतक्या सकाळी का फोन केला असेल? फोन रिसीव्हं केला. श्रेया लगेच सुरू झाली.


“गुड मॉनिंग.. तृप्ती.”


“गुड मॉर्नींग सेम टू. इतक्या सकाळी फोन?”


“आवरलं तुझं सारं?”


“आवरलं. तूझं? आज ऑफीसाला नाही जात का?”


“नाही ग. आज रजा माझी. मी ॲपेक्स हॉस्पीटल मधून बोलतेय.”


“ हॉस्पीटल मधून? काय झाल तुला?”


“ मला काय धाडं भरलीय. अग तुला माहित का? काल लग्नात एक ॲक्सीडेंट झाला होता.”


“हो आम्ही घरी निघालो होतो तेव्हाचं झाला होता.आमच्या समोरचं झाला होता.”


“ज्याला धडक बसली तो माझा आते भाऊ. फारं सिरीअसं.”


“का? विवेकच्या जवळाचा का कुणी?”


“जवळचा म्हणून काय विचारतेस. माझ्या आत्याचा मुलगा तो.सख्खा आतेभाऊ तो.”


“मला नव्हत माहित तो तुझा आतेभाऊ म्हणूनं.”


“तू ओळखतेस त्याला.?”


“नाही ग.ओळखत नाही मी पण तो अपघात झाला तेंव्हा आम्ही तिथेच होतो.”


“येतेस हॉस्पीटला?”


“हॉस्पीटला?”


“तुझा ब्ल्डं ग्रुप AB आहे ना?”


“तुला कसं माहिगत?”


“अग ब्लडं बँकेत तुझं नाव. वाचलं मी. बल्डं बँकेत AB रक्तगटाचं रक्त शिल्ल्क नाही. येतेस?”


“अग एकटीचं मी घरी. निलेश ऑफीसला गेलाय.”


“विवेकला पाठवू का?”


“नको नको. त्याला कशाला पाठवतेस?”


“मग कशी येतेस?” श्रेयानं  तृप्तीला गृहीत धरलं होतं. श्रेयाचं काही चूक ही नव्हती. अश्या कामाज तृप्ती पुढेच असे.


“पेंशट शुध्दीवर आहे ना?” तृप्तीनं काळजीच्या स्वरात विचारलं.


“नाही ना? ब्लडीगं झालं. इर्मजन्सी ऑपरेशन करायचं. त्यच्या शरीरात पुरेसं रक्त नाही. ब्लडं बँकेत पण ते उपलब्ध नाही. प्लीज तू येना.तुला काही प्रॉब्लेम का?”


“मला कशाचा प्रॉब्लेम?”


“मग येना?


“निलेश घरी नाही. त्याला विचारावा लागेल.”


“मग विचार ना? का त्याला विचारयाला काय मुहूर्त पहातेस काय?” श्रेया घाबरली होती. तृप्तीचा रक्तगट हा AB+ तिला माहीत होतं. तृप्तीला ती आग्रह करण साहजिकचं होतं. त्या कॉलेजला एकत्रंच शिकत होत्या. राष्ट्रीय सेवा योजनेत ही त्या सहभागी असतं. रक्तदान शिबीरातून त्या रक्तदान ही करत असतं. तृप्ती  सामाजिक कार्यात कायम सहभागी असे. तत्परतेन ती मदत ही करत असते.


“दुसरं कुणीचं नाही का?


“दुसरे असतील ही पण तू नाही येऊ शकणार का? हे हॉस्पीटलं तुझ्या घरापासून जवळचं आहे ना?”


“जवळचं आहे पण? “ तृप्ती खरं तर श्रोयाला सांगू शकत नव्हती. कसं सांगणारं होती.  आपण असं रक्त दान केलं हे जर निलेशला कळलं तर? तो टोकाचा निणर्यं घेऊ शकतो.


“आता कशाला पण निबिणं… म्हणतेस. तृप्ती तो माझा सख्खा भाऊ.  निलेशला काय एवढं घाबरतेस? तो थोडाचं अश्या कामाला नाही म्हणार आहे.”


“तसं नाही ग.त्याला मी रक्तदान केलेलं आवडत नाही.”


“ असं कसं? त्याला आवडत नाही?”


“ का म्हणजे बायको त्याची मी. आजरी पडले बिडले तर?”


“ तृप्ती तू असं वेडयासारख काय बोलतेस? रक्तदान केल्यावर थोडचं असं काही होतं असात? तुझा दुसरा काही प्रॉब्लेम का?”


“खरचं निलेशला आवडत नाही. तुला माहीत तो कसा रागीटं. त्याच्या मनाविरूध एखादी गोष्टं झाली  तर नाही सहन होत त्याला.”श्रोयाला हे कळत नव्हतं. तृप्ती असं का बोलतेय.बायकोनं रक्तदानं केलं जर त्याला गर्व वाटावं असं कसं आवडत नाही. तृप्तीच्य मनात प्रंचड मोठ वादळ उठलं होतं.तो मृत्यूशी झुजतो आहे. आपण कदाचित रक्त दिलं तर तो जगू शकतो. कुणाचं मरण टाळण्या पेक्षा दुसरी गोष्टं कोणती असू शकते?


“तृप्ती,आदित्यं मृत्यूशी झुंजतो आहे. त्याला जींवत राहण्यासाठी तू मदत करू शकतेस.मी त्याची बहीण  असून ही करू शकत नाहीं. बघ निलेशला विचारून.”


“सॉरी, श्रेया… निलेशला नाही आवडणारं ते. त्याला तर नाहीचं प्लीज, तू दुसरं कुणी तरी शोध. मला माफ कर.” तृप्ती ठाम होती.


“त्याचा दुश्मन का तो?निलेशची नि त्याची ओळाख का?”


”अर्थात तसं काही नाही पण त्याला ते नाही आवडणारं हे नक्की.”


“ जशी तुझी मर्जी.. “ श्रेयानं रागा रागानचं फोन ठेवला.


               तृप्ती तशीच भिंतींला उभी राहिली काय करावं हेचं कळतं नव्हतं. रक्तदान केलं तर तो जगेल. दुसरं कुणाचं रक्त ही मिळेल पण आपण त्याला जीवंत राहण्यासाठी मदत करू शकत नाही. लग्नाची बंधनं स्वांतंत्रं हीरावून घेतात. असली सारी बंधनचं आपण तोडून टाकावीत का? आपल्याकडचं लक्ष होतं त्याचं म्हणूनचं तो पडलाय. त्याचं प्रेम खरं असेलं खोटं असेल.तो आपला कुणी नसला तरी माणूस म्हणून त्याला मदत करायला हवी.निलेशला जर हे कळलं तर? तो घरात नाही ठेवणारं.आपला संसार मोडणारं हे ही नक्की होतं.दहा मिनीटानंतर ती उठली.श्रेयाला कॉल लावला.


“ श्रेया,मी हॉस्पीटल येतेयं.”


“ निलेशनं परवानगी दिली तुला?” श्रेयाचा आंनद शब्दांत मावत नव्हता.


“ नाही. त्याला हे कळायाला ही नको.मी निघाले.” तृप्तीनं फोन ठेवला. श्रेया नुसती फोन कडचं पहात राहिली. तृप्ती अशी का वागते? नक्की ती आज नार्मल नाही.


(पुढील भाग लवकरचं)


 


बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...