सोमवार, ११ मार्च, २०१९

पळस-धगधगती अग्नी फुले


               पळस-धगधगती अग्नी फुले

                    

पळसं-धगधगती अग्नी फुले
वक्षावरती तुझ्या एकदा मी असा रंग पाहिला होता.
रानातल्या रान पळसाला तो कधीच सुचला नसता.
     कुसूमाग्रज

गावाकडं जाण्याचा योग आला.उन्हाळाचं दिवस होते.रानं रानं भकास झालेली.दुष्काळांचं सावटं  गाव शिवारी पसरलेलं होतं.वर आग ओकणारा सूर्य.अख्ख्या शिवारात कुठं पाण्याचा थेबं नाही.रान रान रणणत्या उन्हात भाजतं होतं.दूरवर क्षितीजावर मृगजळाचं तळं घुसमुसतं होतं.तापलेल्या मातीतून चटके बसते होते.आता गाव बदलली.गावाची शहरं होऊ लागलीत.रान -वन ही बदलेले.शिवारं बदलं. सारं सारं बदलं आसलं तरी  भर उन्हाळयात भेटणारा पळसं मात्र अगदी पहिल्यासारखचं दिमाखत भेटला.पळसं. भर उन्हाळयात लाल फुलांची उधळणं करत तो बांधा बांधावर बहरला होता. नदीच्या तरी, टेकडीच्या कुशीत, डोंगराच्या दरीत दिमाखात, रूबाबात दिसतं होतां.आपली लालजरीत फुलांच्या ज्योती तेवत तो उभा होता.
                    सा-या झांडाची पानगळ झाली असताना. आपलं एकन एक पान गळून गेलेल असताना. शिशीर ऋतू सा-याचं झाडोच वस्त्र हरण करतो.पळसं मात्र दिमाखात निष्पर्णपणे फुलतं राहतो.जळत्या रानात अग्नीफुलं फुल्लारीत तो दिमाखात उभा असतो. निखारे फुल्लारून यावेत तसे ही झाडं बहरून येतात. पळसं फक्त्फांदयाच्या बोटांनी वंसताच्या आगमनाला सज्ज होतो.सृष्टीचा हिरवागारं शालू गळून पडलेला असताना.सृष्टीच्या अंगावर नवीन केशरी रंगाची उधळणं करत राहतो.माती भाजून निघत असताना याला जगण्या पुरती तरी ओल कुठून मिळते असेल?लाल भडक फुलांचे पुजंके माथ्यावर मिरवत  ज्योती सारखा तेवतं राहतो.
                                          असा रानात बहरलेला पळसं कवी मनाला भूरळचं घालणारं यात नवलं ते काय? कवीच्या प्रतिमेतून तो शब्दाशब्दातून ही बहरलेला दिसतो. पुरानं कालापासून ते अधुनिक नवकवीच्या ही प्रतिभेला तो साद घालंत आला आहे. प्रेमीकांचं व पळसाचं खाअसं नातं राहीलं आहे.एक लोककथा.अदिवासी जमातीत अनेक टोळया आसतं. एका टोळीचा म्हरोक्या चेतू भगत. त्याच्या पोरीचं दुस-या टोळीतील एक तरूणाशी प्रेम जडतं.प्रेम आंधळच असतं. ते  ते प्रेम रंगत जातं.त्या म्होरक्याला ते प्रेम मान्य नसतं.अन्यं जातीशी आपल्या मुलीचा विवाह.त्याला मान्यचं नसतो.तो तिचं लग्न टोळीतीलतरूणाशी लावून देतो.लग्नानंतर ही त्यांच प्रेम चालूच राहतं. त्यांच्या प्रेमाचं गुटूर गू तिच्या नव-याला कळतं.तो सूडानं पेटतो.बहीणीच्य गावाला जात आहे असं सांगतो लपून बसतो.त्यांच्यावर पाळतं ठेवतो. ते वेडे प्रेमीक ! त्याच नेहमीच्या  रानात प्रणय क्रीडेत रममाण होतात. ते धूंदीत असतानीचं हा पहातो.संतापाच्या भरात तो दोंघांचा ही खून करतो. त्यांची शिरं व धड जंगलात फेकून देतो.त्यांच सांडलेले रक्तातून पळसाची झाडं उगवतात.रक्ता लाल म्हणून पळसं फलं लाल.शी पळसाची उत्पत्ती कथा आहे. पळसाचा व प्रेमीकांचं नातं असं जोडण्यात आलं आहे.
                        महाकवी कालीदास आपल्या ऋतुसंहार या महाकाव्यात पळसाचं वर्णन करताना म्हणतो. पळसाची फुलं म्हणजे धगधगता अग्नीच असतो.केशरी रंगाची वस्त्र परिधान केलेल्या नववधूसारखीचं सृष्टी दिसते.सृष्टीचं सूर्याच्या असीम प्रेमाचा अविष्कार म्हणजे पळसाची फुलं होत. कुण्या कवीला पळसं फुलं म्हणजे सिंहाचे रक्त रंजीत पंजे वाटतात.कुणाला ती अग्नीची फुलं वाटतात.कुणला सीमेवर रक्तबंबाळ झालेला ताठ बाण्याचा सैनिक वाटतो. कवीवर्य कुसूमाग्रजांच्या ओळी पळसं पाहिला की माझ्या मनात घोळतं राहतात.
वक्षावरती तुझ्या एकदा असा रंग पाहिला होता.
रानातल्या पळसाला तो कधीच सुचला नसता.
                       एकदम आपल्या प्रियेच्या वक्षाच्या सोंदर्याचं वर्णन करण्यासाठी कवीवर्यनी पळसाची ही प्रतिमा वापरलेली आहे.विठठलं वाघ यांना पळसं फुले म्हणजे धरतीने हातात घातलेल्या लालजरीत बांगडया वाटतात.कुण्या बाल कवीला पळसाची लाल भडक फुलं म्हणजे बर्फाचा गोळा वाटतो.काळजाला तडे या माझ्या कवितेत मी पळसाचं रूप रेखाटण्याचा केलेला प्रयत्न.
वाळलेल्या झांडाचे मुके
हुंदके रानाला.
उरी पेटल्या जाळाचं
रंग सुचले पळसाला.
पळसं ही फुले सरस्वती कालीमाताच्या पुजेसाठी वापरली जातात.बळीराजाच्या हातात जो आसूड असायाचा तो खास पळासाच्या मुळापासून बनवलेल्या चवराचा असायचा.या उयोगामुळे  पळसाच्या झाडांची ही कत्तल ही फार मोठया प्रमाणात होते.पोळयाच्या सणाला त्याचा मानचं असे.
                             वंसताची चाहूल लागताचं  राना रानात पळसं फुललेले दिसतात चैत्रपालवी पल्लवीत व्हायच्या आधीच पळसं आपलं अंतरंग उधळून देतो. धूळवड असेल किंवां रंगपंची असेल पळसाच्या पानाचा रंग करून तो खेळला जायचा.होळीच्या दुस-यादिवशी झुजू मुंजू झालं की रानातून पळसाची रसरसीत फुलं तोडून आणायची.त्यात,कापूर,उदं मिसळाचा. ते फुलं वाटून त्याचा रंग खेळाचया.बाटलीत भरून खेळायचा. पिचकारीत भरायचा.लालजरीत रंग.त्याचा गंध.कापूराचा वास. मन सारं मस्तीत असायाचं.अग्नी सारख भंयकर दिसणा-या या फुलांत एक अनोख थंडावा सतो.तो रंग खेळाचयी अनोखी मज्जा आता नाही.रंग खेळण्यापेक्षा रंग बनवीतानाचं खरी मज्जा यायाची.र्पत्येक जणला आपल्या रंगात कुणाला तरी रंगवायचं असतं.आपल्या रंगात भिजवायचं असतं. मनात झुरणारे प्रेमाचे तुरे नि खोडकर, चावटं  गप्पा गोष्टीत मन रंगून जायचं.अस मन रंगलं की पळाच्या रंगाची बारी असे.
खेडया पाडयातून आता रासायनीक रंग आले. पळसं फुलांच्या रंगा ऐवजी घातकं रसायन वापरलेली रंग  खेळला जातोय.रंग तयार करण्याचा आंनद मावळला. पुडीत ,ड्रमात रंग आयते विकतमिळम लागले. आताच्य काळात तर डीजीटलं रंग खेळू जाऊ लागेले.रंग येतील, जातील. सणाचा ओलं आटंत चालली आहे.झालेल्या पानगळीची हूरहूर नाही. आपल्या निष्पर्णतेच भान नाही.आग ओकणारा सूर्य अंगावर झेलतं अंतरंगातील आगीची फुले करून अंतरंगातील रंग उधळम देणरा पळसं.संघर्ष योध्दाच आहे.तो मानव जातीसाठी सदैव प्रेरक राहीलं.

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...