बुधवार, १८ डिसेंबर, २०१९

पाटोदयात वेध भविष्याचा कार्यशाळा संपन्नं


     अंतरराष्ट्रीय शिक्षणाचा विचार या विषयावर पाटोदयात  वेध   भविष्याचा कार्यशाळा संपन्नं पाटोदा तालुक्यात नुकतीच अंतरराष्ट्रीय शिक्षणाचा विचार या विषयावर वेध भविष्याचा ही कार्यशाळा संपन्नं झाली.तालुक्यातील सर्व जि.प.शाळेतील शिक्षकांनी त्यात सक्रीय सहभाग नोंदवला.दोन दिवसाच्या या कार्य शाळेत अनेक व्याख्यान, मुलाखती, शिक्षक संवाद,कवीसंमेलन, प्रश्नोत्तरे या सारख्या कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला होता.
                                          तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनजंय बोंदार्डे यांच्या संकल्पनेतून नंदकुमार सचिव सामान्य प्रशासन यांच्या मार्गदर्शनातून व संदीप पवार मुखयाधयापक प्रा.शाळा जरेवाडी यांचा सहकयरातून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.पहीलल्या दिवसी पचारि उदघाटना नंतर प्रसिध्द प्रेरक व्यख्याते वसंत हंकारे यांच व्याख्यानं संपन्नं झाले.आपल्या दोन तासाच्या व्याख्यानात त्यांनी सर्वांना खिळून ठेवलं. आपल्या ओघवती व  विनोदीशैलीत त्यांनी शिक्षणतील अनेक समस्यावर प्रश्नावर आपलं मत व्यक्त केलं. हासत हासत त्यांनी अनेक मानवी प्रवृत्तीवर व्यांगात्मक भाष्यं करत डोळयात जळजळीत अंजन घातले.सकारात्मक दृष्टीकोनामुळे आपलं ध्येय कसं हस्तगत करता येते हे अनेक उदहरणे,किस्से व प्रेरक कथामधून त्यांनी ‍ विश्द केले.
                              दुपारच्या सत्रात शिक्षकांनी ही व्यक्त होता यावं. व्यक्त होण्यात ही वेगळाचं आंनद असतो. कार्यशाळा मध्ये सक्रीय सहभाग वाढवावा म्हणून शिक्षकाचं छोटेखाणी कवीसंमेलन ही घेण्यत आलं. शीघ्र कवी अजय भराटे,अंकुश नागरगोजे व कल्प्ना ढाकणे या कवीच्या कवितेला चांगलीच दादमिळाली. दुपारच्या सत्रात बालाजी जाध यांनी उपलब्ध तंत्रज्ञानाचा व साहित्याचा आपल्या अध्ययन अध्यापनात कसा वापर करावा? तंत्रज्ञान वापरून आंनददायी अध्यापनांची-अध्ययनांची प्रक्रीया आंनदीदायी कशी होऊ शकते याचं प्रत्याक्षीकासह तंत्र नि मंत्र सांगितला. डीजीटल शाळा,-लर्नींग, एज्यूकेशनस् ॲप,व्हीडीओकॉन्फरन्सच्या मदतीने अध्ययन व अध्यापनाच्या विवीध पध्दती त्यांनी स्पष्ट केल्या.
                                            दुस-या दिवसाची सुरूवात झाली.एका अनोख्या अनुभव कथनाने. हंगामी स्थलांतरीत होणा-या पालकांच्या पाल्यांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड या समस्यावर जालन्या जिल्हयात मोठे योगदान दिलेले श्रीराम तांडा येथील प्रथम बालरक्षक जगदीश कुडे यांच्या मनोगताने.स्थ्लांतरीत होणा-या पालकांच्या पाल्यांची होणारी शैक्षणीक हेळसांड त्यावर एका तांडयावरील शिक्षकांनी केलेली मात याची कथाचं होती त्याच अनुभव कथन. अभावाच्या प्रतिकूल परीस्थ्तीमध्ये सकारात्मकतेने दिलेली झुंजीची जगदीश कुडे यांची ही यशोगाथा सर्वांनाचं भावली व प्रेरणेचं तरंग मनात निर्माण करून गेली.
                                   कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक व अंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या विचाराची एक चळवळ महाराष्ट्रात उभी राहावी म्हणून सदैव प्रयत्नरत असलेले नंदकुमारसाहेब यांनी आपल्या प्रस्ताविकात अंतर राष्ट्रीय शिक्षणाची आवश्यकता,त्याचं स्वरूप तसेच जगाच्या व देशाच्या शिक्षणप्रणाली पुढे असलेली आव्हाने याचा परामर्श घेतला. आपली तत्परता,नैपुण्याता व स्वयं अदयावत्ताच आपल्यासाठी मोठया संधी निर्माण करणार आहेत.असे अमोज विचार त्यांनी मांडले.
                      वाबळेवाडीचं शालेय व्यस्थापन समीतीचे अध्यक्ष तीश वाबळे यांनी कशी घडली बावळेवाडी? याचं  ब्दचित्रचं आपल्या अनुभव कथनातून उभ केलं. आपल्या वाबळेवाडीचं यश शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे सरांप्रती असलेला आदर व गर्व त्यांच्या बोलण्यातून झाकला नाही.गाव आणि शाळा एकत्र आल्यानंतरच वाबळेवाडी सारख यश प्राप्त होउ शकतें हे सांगायाला जे विसरले नाहीत.
                                        अंतरराष्ट्रीय शिक्षणाची थेअरी मांडली वाशिमचे निलेश घुगे यांनी. या युगात शिक्षणला असाधारण महत्तव आलं आहे. व्यक्तीला करीअरच्या रोजगाराच्या संधी अंरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध झाल्या आहेत.नवीन तंत्रज्ञान माहीतीचा वेगाने होणारा विस्फोट यामुळे नवीन कौशल्य व क्षमतांची गरज  वाढते आहे. अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या व करीअरच्या अनेक संधी उपलबध आसल्यातरी  त्यात जीवघेणी स्पर्धा ही आहे.त्यास्पर्धेत आपलं मुलं ठिकावीत.सक्षम व्यक्तीमत्वाची जडणघडण व्हावी या उद्श्याने अंतरराष्ट्रीय शिक्षण हा विचार पुढे आला आहे. त्यामुळे अनेक महागडया शाळा उच्चर्गीय लोकांसाठी निर्माण होत आहेत. आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळामधून ही अश्या स्वरूपाचं व दर्जाचं शिक्षण देता आलं पाहीजे. नाहीतर आपली मुलं या स्पर्धेत मागे राहतील. त्यांना ही असे शिक्षण देता यावे या उद्श्याने वाबळेवाडीत काम सुरू केले. आम्ही अजून ही प्रयत्नचं करतो आहोत.मुलांना  शिकण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो होत.आम्हला  ज्या गोष्टी येत नाहीत ती माझ मुलं शिकतात शिकवतात.मला शाळेत थांबायाला आवडते.तोच माझा छंद आहे. त्यातचं माझा आंनद आहे. असे विचार वाबळेवाडी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी आपल्या मनोगतातनू मांडले.
           तालुक्याच्या सभापती पुष्पाता सोनवणे,उपसाभापती सत्यसेन मिसाळ, सदस्य महेंद्रं नागरगोजे,देवीदास शेंडगे यांची उपस्थिती होती.कार्यक्रम सुत्रबध्द केला होता सुरेखा खेडकर वि.भा.साळूंके सर यांनी तर  सर्वांचे अभार मानले गटशिक्षणाधिकारी धनजंय बोंदार्डे यांनी.राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
                                            शबदांकन: परशुराम सोंडगे,पाटोदा
                                                    prshuramsondge@gmail.com

सोमवार, १६ डिसेंबर, २०१९

तू
 माझ्यात खोल खोल
 रूतत गेलासं
पार तळाशी....
 मी
किती कष्टाने
नितळ केला होता.
 माझ्या मनाचा तळ...
मनातला साराचं गाळ
 उपसून काढायला
जमतं अस नाही.
मी
त्यावर अंथरली होती.
सजवली होती
सुंदर सुंदर....
अस्तर
 नि
 सा-या संवेदनाही
 सोलून,तासून,
रांधून केल्या होत्या
गुळगुळीत.
एकदम चकचकीत.
भावनां ही
 रंग दिले होते.
माझ शरीरच नाहीतर
मी अाख्खीच तुला अावडावी
म्हणून.... मी अधिकच स्वतः ला
पारदर्शक व सुंदर करत गेले.
उपटून काढाव्यात पापण्या रेखीव,
अाखीव दिसण्यासाठी
तशीच उपटली
मी
मनावर
 नुकतीच कोवळी कोवळी
अंकुरलेली
 नाती
नि
अगदी फ्रेश होऊन
तुझ्यासमोर
पेश केलं स्वतः ला.
तू नुसता ओरबडत
राहिलास माझं शरीर....
माझे अवयव.

माझ्या मनातले
 स्वप्न, भावना
 नि
साध्या संवेदना ही
 तुला का जाणवल्या
नसतील?
तू पुरूष आहेस
नि
मी एक स्त्री
नुसतं शरीरंच
स्त्री असत नाही
तर
ती अख्खीच असते ना?
स्त्रित्व तसच ठेऊन
सोलून काढता येईल का
माझं शरीर ?
नि तुला हवे हवे असलेले
माझे मादक अवयव?
असच कर
म्हणजे
तुझं ही सिध्द होईल
पुरूषत्व.
                 परशुराम  सोंडगे 'बीड 9527460358

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

साधेपणाचा सात्त्चिकतेचा वस्तुपाठरामदास भारती महाराज

    
                       परशुराम सोंडगे,पाटोदा


रामदासभारती महाराज यांच 6 सप्टेंबर 2019 रोजी देहवासन झालं. त्याचाशोडसं दिन सोहळा साजरा करण्यात आहे. त्या निमीत्त त्यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारा हा  लेख)
पाटोदया पासून अवघ्या पंधरा किमी अंतरावर मांजरा नदीचा उगम आहे.डोंगराच्या कुशीत  वसलेले एक छोटसं गाव गवळवाडी. मांजरेचा उगम या गावात होत आसला तरी नकाशात कुठेच गावाचा उल्ल्ख नाही. गवळवाडी येथूनच उगम पावून मांजरा नदी वाहत वाहत शेवटी मोठी मोठी होत जाते.ती महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे दिसतं असली तरी मांजरेचा उगम कायम उपेक्षीतचं राहिला. त्याविषयी कुणालाचं जास्त माहिती नाही. तसा फारसा प्रयत्न ही झाला नाही. हौसी संशोधक संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ...क्षीरसागर यांनी त्या संदर्भात जाणून घ्याण्याचा प्रयत्न केलेला आहे.
उगमाच्या ठिकाणी मांजरा कुंड आहे..तो कुंड कायम पाण्यानं भरलेला आसायचा..भीषण दुष्काळात ही त्यात पाणी असायचं. कुंडाचं पाणी कमी झालं की दुष्काळ भयंकर पडणार असा अंदाज लोक काढयाचे..त्याच कुंडाच्या जवळ एक भव्यं मठ उभा राहिला..रामदास म्हसके नावाचा एक  चौदा पंधरा वर्षाचा तरूण त्या ठिकाणी आला..त्यांनी त्या कुंडाजवळच उघडयावरच असलेल्या महादेवाच्या पींडीची पुजा अर्चा सुरू केली..आपल्याला साक्षात्कार झाला असून आपण आता  आपलं सारं जीवन या देवाची पुजाअर्चा करण्यातच घालणार आहोत असा संकल्प गावक-या पुढं त्यानं व्यक्त केला..गावक-यानी तितकसं ते गांभीर्यानं घेतलं नाही.आपलं सारं जीवन त्या संकल्पानुसारं व्यथीत केले..शिवाच्या उघडया पिंडाची ते पुजा करत राहिले..आपली प्रखर भक्ती ब्रम्हचार्य यांनी गावक-याचं लक्ष वेधून घेतलं..त्याचा दृढनिश्चय इतका कठोर होता की रामदास  म्हसके या तरूणांनी आपल्या पुजेत कधीचं खंड पडू दिला नाही. उन्हं वारा पाऊस पाणी सारं सोसत ती जागा सोडली नाही. गावात मधूकरी मागून ते  जगू लागले.गरीबी अज्ञानात खिचपत पडलेले लोक पाहून त्यांच मन व्याकूळ होऊ लागलं. ऐसी कळवळयाची जात.1 करी लाभावीण प्रीत 11  संताचं ह्रदय असंच जन हितासाठी कळवळत राहते.
                   
ऊसतोडीसाठी स्थलांतर होणारी माणसं, त्यांच्या मुलांची होणारी हेळसांड, कमालीची व्यसनधिनता हे सार पाहून ते व्यथीत होतं. अनेक मुले आपल्या वृध्द आईवडीलांचा संभाळ करत नाहीत. वृध्दावर उपासमारीच वेळ येई. त्यांच्यासाठी काही तरी करावं असं त्यांना वाटू लागलं. त्यातनूच त्यांनी अखंड हरीनाम सप्ताह सरू केला.अखंड हा ज्ञानयज्ञच सुरू केला. कुठला ही अध्यात्माचा अभ्यास नसतानी त्यांनी हे सुरू केलं. पाखंडापणा मुळातचं त्यांच्या अंगात नव्हता. या अश्या निणर्यामुळे ही त्यांना अनोखा संघर्ष करावा लागला.हिंदू धर्मात शिव पंथ वैष्णव पंथ प्रमुख पंथ आहेत.पंथपंथतील संघर्ष हिंदू धर्माला नवीन नाही. मांजरा उगम शिव पंथाचा मानला जाई. रामदास महाराजांनी शिवपंथची दीक्षा चिंचपूरचं महाराज यांच्याकडून घेतलेली.त्यात त्यांनी अंखड हरीनाम सप्ताह सुरू केला. वैष्णव पंथाचे लोक येउन कीतग्न हरीजागर करू लागले. अर्थात हे शिवपंथीयांना रूचणारं काम नव्हतं. त्यावेळी त्यांना शिव पथींय लोक संस्थानाकडुन त्यांना  लक्ष्य करण्यात आलं. लोकांना सन्मार्गला लावण्यासाठी सुरू केलेला हा संघर्ष त्यांनी हासत स्वीकारला.‍ शिव वैष्णव एकच. आपण दोन मानू नयेत. लोंकाना भक्तीमार्गाला लावणं, त्यांची व्सधिनता पासून सुटका करणं हे महत्तवाचं आहे.  आपल्या करारी पण शांत संयमी आवाजात त्याना समजावून सांगितल नि तशीच  कठोर भूमीका घेतली.
           माजरा उगमावर 1980 पासून अखंडपण ज्ञान यज्ञ सुरू झाला.आपल्या खडतर साधनेने ब्रम्हचारी व्रर्ताने अध्यामाची ,परमार्थाची मूळ त्यांनी गवळवाडी नि पंचक्राशीत रूजवली. शिव पंथ नाथ पंथ वैष्णव पंथांचा मेळ त्यांनी आपल्या मठामध्ये घातला. प्रखर ब्रम्हचार्यव्रत व माणसाच्या कळवळयामुळे त्यांनी माणासांच्या मनामनात घर केलं. कुठल्याही राजकीय पक्षांच पाठबळ घेता ते आपल्या मठासाठी गावासाठी कार्य करत राहीले. व्यासधिनतेत बुडालेल्या अनेक लोंकांनी त्यांनी  वारकरी संपद्रायमध्ये  समाविष्टं  करून त्यांनी सन्मार्गला लावले. सतत बेचाळीस वर्ष अंखंड हरीनामा सप्ताह त्यांनी सुरू केला. कडक शिस्तीचे भोक्त असलेले प्रखर ब्रमहचार्य पाळणारे महाराजाचा  पंचक्रोशी वेगळाचं दरारा होता.स्वत: निरक्षर असून ही त्यांनी अनेक विदयार्थी  आपल्या मठाच्या माध्यमातून घडवीले.अनेक अनाथांना त्यांनी आपल्या मठात थारा दिला. अधार दिला,
                            चंगळवादाला अनेक महाराज ही बळी पडतात. अनेक महाराज लोककिर्तनातून ज्ञानाचे डोस पाजत असतात. अनेकाचं राहणीमान, डामडौल, पाहता हे लाके पांखडी असतात. सोने आम्हा र्तिके समान  म्हणून तुकोबाच्या अंभंगावर रसाळ किर्तन तास तास जोडणारे आपल्या हातात सोन्याच्या अंगठया, गळयात सोन्याची चैन घालणारे महाराज पाहीले की त्यांचा पांखंडी पण झाकत नाही. रामदास भारती महाराजानी  अश्या लोकांना थारा दिला नाही.अश्या महागडया नि पांखंडी  महाराजांच्या तारखा मिळवण्यासाठी त्यानीं कधी कुणाचे उंबर झिजवलं नाहीत.कायम त्यांनी नवीन उमदे तरूण महाराजांना, विदयार्थ्याना संघी दिली. गावकरी पैसं देतात म्हणून मी  ते पैसे अश्या लोंकावर खर्च नाही करू शकत. अनेक महाराजांनी पैश्याचा आग्रह केला म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना कधीच बोलावलं नाही.
          महाराजांनी साध राहवं. आपलं सात्वीकपण ,साधेपण समाजपुढं आदर्श असावा. तो साधू संत आहेत त्यांनी मांडवा. त्यांच हे कर्तव्यचं आहे. एकदम साधी राहणी मर्यादीत गरजात त्यांनी आपलं जीवन व्यथीतत केलं. महागडया गाडया तनू जेव्हा अनेक संत जण फिरताना आम्ही पाहतो तेव्हा आम्हा सा-या गावक-याचं ऊर भरून येतं. साधं कसं राहवं याचा वस्तुपाठचं त्यांनी घालून दिला होता. त्यांचं साध राहणं अनेक साधू जणाचं टिंगलीचा विष्ज्ञय झाला होता. ते दृढनिश्चयी होते. राजकरण्याची मर्जी हशील करून  आपल्या मठाला ,स्वत:ला बरच काही मिळवणारे महाराज ही कमी नाहीत पण त्यांनी मत कधीचं कोणत्या माणसाला, पक्षाला दिलं नाही. राजकरणातून पंचक्राशीतील विभागणारे गाव पाहून त्यांच मन विदीर्ण होतं. ते त्यामुळे उपेक्षीत ही राहीले. त्यानी ते उपेक्षीलेपण ही सहन केले. कधी खंत व्यक्त केली नाही. साधी राहणी, प्रखर स्वाभीमानी, मायळूआपलां स्वाभिमान कधी कुणाच्या दावणीला बांधला नाही. लोक सभा वकधन सभा सोडून त्यांनी आपल्,म्हणून त्याचा लौकीक होता. त्यामुळेच ते सर्वांचे श्रध्दास्थान झाले.त्यांच्या पायावर डोक टेकवताना आम्हा गावक-याना कधीच कमीपणा वाटला नाही. उलट कायम मान उंचावत राहील, सारं त्यांनी आपल्या स्वच्छ आचरणातून  हे दाखवून दिलं.
                 अनेक अपग, विकलांग,वंचितांना   ज्याची मुलं संभाळ करत नाहीत अशा वृध्दानी त्यांनी आपल्या मठावर आश्रय देत असत. कर्मकांडचं अवडंबर माजता, अभ्यासाचा पांखड पण जागता त्यानीं आपल्या मठाचा विस्तार करत राहीले.त्यांच्या जाण्याने पंचक्राशीत  अनेक गावे शोकाकूल झालेले आहेत. अनेकाचा अधार गेला आहे.त्यांच साधेपण नि सात्वीकपण कायम सर्वांना प्रेरणा देत राहील यात शंका नाही.
                         त्यांची इच्छे नुसार मठा मध्ये त्यांचा समधी सोहळा पार पाडण्यात आला. आता मठाधि पती म्हणून त्यांचे शिष्यं रामकृष्णं भारती महाराज यांना गादीवर बसवण्यात आले. आज नि उदया रामदास भारती महाराजांचा शोडसदिन साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक कार्यक्रम अयोजी केले आहेत.मंहत शांतगिरी महाराज किर्तेश्वर संस्थान चिंचपूर (ढगे) महंत महादेवानंद भारती महाराज अश्वलिंग संस्थान यांच किर्तन होणर असून रामदास भारती महाराज यांच्या समधीचं पूजन होणार आहे. त्यासाठी रामकृष्ण महाराज समस्त गावकरी यांनी उपस्थित राहण्याचे आवहान केले आहे.
 ( महाराष्ट्रातील प्रसिध्द मांजरा उगम संस्थानाचे मठाधिपती रामदास भारती महाराज यांचा शोडसं दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्त त्यांच्या व्यक्तीमत्त्वर प्रकाश टाकणारा हा संक्षिप्तं लेख.)
      

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...