मंगळवार, १५ मे, २०१८

जत्रातील प्रेमाची गाेष्टपाराकं आरगन वाजल.बॅन्डवाल आलं.ते आलं की सलामी देत्यात. आरगनाचा मोठा आवाज सा-या गावात घूमू लागला. तशी बारकाली पोरं...पोरी चींगाट पाराकं पळाली. मोठाली बरीचं माणसं तिथचं होती. कुणी रावश्याच्या दुकानाच्या दारात.. कुणीबुणी चावडीच्या दगडाला बूड टेकून बसलेलीआज गावची जत्रा.शेताभीतात कुठं जाता येतं?  तिथचं टायमपास करीत बसलेली.चार पाच टोळभैरी पोरं भी व्हती.सांवताच्या घराला पाठ देउन बसलेली. पोरं कुठं नुसते गप बसत आसतेत व्हयं? मोबाईल चिवडीत होती.बँन्डवाल्यानं सलामी दिली.आगोदर.. गणपतीची आरती.मग एक मस्तं गाणं.. वाजवल.त्यांच्या भोवती गर्दी जमा झाली आणि ते थांबले.सलामी झाली की ते पारावर टेकलं. आरगानाची गाडी तिथचं पारा म्होंरं सोडली होती.त्या गाडीभोवती पोरानी गराडा टाकला.तेवढयात आशुक्या व इलाश्या आलं.कुठं होतं नि कुठं नाय. गापकुणी बोळीतून आलं.डायरेक्ट बॅन्डवाल्या पाशीचं हजर झालं. दोन्ही हात वर करून लगेच आशुक्या म्हणाला,”बजावं…. बजावदोघ ही पंगाट झालेले.
आताच सलामी झालीय मालक.” बँन्डवाल्या आत्म्यानं जरा आदबीनं त्यांना सांगितलं. जत्राच्या कारभरात सारचं मालक आसत्यात. उगच कशाला कुणाला अंगावर घ्या. बँन्डवालं तसल्या कामाला लय चाप्टरं आसत्यात. पेताडाच्या कशाला नादी लागत्यालं.
काय सलामी झाली?कुणाला इचारून झाली? ते बाकी काय माहीत नाय.गाणं बजाव.झींग झींग झींगाट…” त्यानं त्वांडानचं गाणं सुरू केलं.हातानमांडीवर वाजवायला सुरू केलं.त्वांडानं आवाज काढी. झींग झंग.. झींगाटसारं पोरं भोवताली जमा झालेले.यांना रंग चढलेलागाणं म्हणता म्हणता नाचाया भी लागली.आता आरगाना भोवती चीगुरखाना गोळा झालाच होता.ते गाणं म्हणायला लागली की पोरं भी त्वांडनचं गाणं वाजाया लागली.असाच त्वांडातून बँन्डंबाजा सुरू झाल्यावर सारी लोकचं  बघया लागली.सूभना नानाचं पीत खवळलं.त्याचं नाय कुणाचं भी पीत खवळणचं ना? उग चाराण्याची प्यायची अन बारा आण्याची नशा आणायची.गावच्या जत्रात असा बीन पैशाचा तमाशा उभा केलेला बरा नव्हता.
आर,आशुक्याकाय लावलं रं ये.”
दिसतं नाय काय? आरं,बजाव.. बजाव…” त्याला बोललल्यावर ते जास्तचं चेकाळला.मग तर गडयानी ढोल हातात घेतल्यावाणी ॲक्शनचं घेतली.तसा साराचं चिगुरखाना चेकाळला.सुभानाला जास्तचं राग आला.सुभानाना उठूनचं त्यांच्या अंगावर गेला. त्याला सारे ते खिदाडून लावायचे होते.”मरा तिकडं देवापुढं काय लावलयं हे.”सुभानना त्यांच्याजवळ आला की सा-यांनीच गराडा टाकला.त्याच्या भोवती फेर धरून नाचायला लागली. लेकरं भोवती नाचाया लागली. तेव्हं जसा अंगावर धावून यायचातशी पोर माग पळायचीरागीट गडी पण पार विरघळला.”आयला हे नाय सुधरायचं.” बँन्डंवाल्याची भी पंचायत झाली. नाय वाजवावा तर आशुक्या चांगलाच फास्ट सुटला होता.पंग झालेलेसरपंचाला  भी काहीबाही म्हणयाचं.पाटला भीकाही बाही म्हणायचा. काहीबाहीम्हणजी आया माहीचं उजगारायला लागला.उगच जास्त काही पेटायचं.त्यापेक्षा एक दोन गाणी वाजू.असं बँन्डवाल्यानचं ठरवीलं. बँन्डंवाला आत्म्या म्हणला,”पोरावं फुका रे. झींगाट….!”
                                  आरगानावर गाण सुरू झालं. गाणं सुरू झालं की ते बेवडे आत मध्ये शिरले.एक एक म्हणता सारीचं पोरं आत रिंगणात शिरली.सारेच झीगाट झाले. सारीच पोरं सुरू झाली.पोरं चांगली रंगात ली.एका चढ एक गाणी सुरू झाली.पेताडं बँन्डवाल्याला पैसं सोडायला लागली.पैसं दिसल्यावर त्यांना भी चांगलाच चेव आला.गाण्यावर गाणी वाजू लागली.आता नुसती गाणीच वाजत नव्हती तर डान्सं ही सुरू झाला. असा भारी डान्सं सुरू झाल्यावर त्यांना गराडाचं पडला. कुणी पैसंच काय उधाळीत…. कुणी उपारणीच काय वर फकीतहे दोघचं.. शहाणे बाकी सारेचीगुरखनाच. नाचायलाचं लागलेत म्हणल्यावर पोरीसोरी भी भीताडाच्या आड दडून बघाया लागल्या.देवाला नीवद घे चालल्या आयाबाया थांबून पहाया लागल्या. काही बेणी.त्याची भी शुटींग करायला लागली.आता आपली शुटींग करायला लागलेत म्हणल्यावर त्यांना भी चेव आला.जास्तचं आंग हलायला लागली.काही नाचता नाचता पडायला लागली. फुपाटारेंदा काहीचं कळतं नव्हता. कुणाला सुध्दीचं राहिल्या व्हत्या.
                           पाराकं लय्य्च मज्जा सुरू झाली हे काय झाकतय व्हयं? संत्याचा तर जीवाची उलाघाल व्हायला लागली. या वर्षी….साळाच्या गॅदरींगमध्ये त्यानं लय भारी डान्सं केला होता.टॉपचएकचं नंबरपैसं भी लयं भेटलं होतं त्याला. आता सारं पोरं त्याला डान्सरच म्हणायची. त्याच्या बरूबरसातवीची सीमी नाचली होती. पोरं तिला तर आर्चीच म्हणायला लागले होते. सीमी तर घराच्या बाहेरच निघत नव्हती. कशी निणं. बाहेर आली कीच पोरं.. आर्ची आली.. आर्ची आली.. म्हणून चिडवायचे. संत्यानं शेळया तश्याच ठेवल्या.चावी काळयाच्या म्हतारीकं ठेवली नि गडी चिंगाट पळाला.ते नुसतं कशाचं पळतं. अंग हालवीतचं पळायचं. लोकाला वाटायचं हे नाचतचं चाललं की काय. संत्या डावापाशी आला. त्याचा पार हीरमुडचं झाला. त्याचा बाप आशुक्या डावातच होता. त्याचा तर आता नागीन डान्सचं सुरू झाला होता. पडला की त्याला उठताचं येत नव्हतं.ल्या जाग्यावरचं गडी नाचायचा.संत्याचा हीरमुड तर झालाच पण त्याला राग ही लयं आला. आपल्या बापाचा असा अवतार पाहून कुणाला बरं वाटणं.सारी पॅन्टं रेध्यांन भरलेली…. सारं शर्ट भरलेल..भरकं उपारणं….तसचं वर उडवी. सारी पोरं हासतं. सुताराचा दीप्या त्याच्याकडं पाहून म्हणाला,”संत्या, तुझा बापाचा लय्य्चं भारी डान्सं गडया.लय्य्चं झीगाट नाचतोय.” त्याला लयचं राग आला.दोनचार त्याच्या थोबाडात माराव्यात असं वाटलं पण ते सोप नव्हतं. ते सुताराचे दोनचार जण होतं. चांगलचं पिसलं आसतं त्याला. तिथून पळून जावसं वाटलं पण त्याचं ही आंग हालतं होतं.कवा डावात शिरतो कवा नाय आसं त्याला झालं होतं. आत डावात ही शिरता येत नव्हतं. तिथून जाऊ ही वाटतं नव्हतं.
                                  बराचं वेळाने आशुक्या पडला. संत्या पुढं आला. त्याला बाजूला ओढलं.पाराच्या बाजूला बसवीला.त्यानं बसवीला पण तेव्हं चक्क झोपला.पार गळाटला होता.सुध्द नव्हती उरली.सकाळपासून नुसता पेतचं सुटला होता. पोटात अन्नचा कण नाय. नुसतचं दारू प्याल्यावर ती आतडयाला तटातटा तोडीत आसल ना? त्याच्याकडं एकदा पाहील.डावाच्या कोप-यात येऊन उभा राहिला.त्याच्या बाजूची पोरं त्याला डावात ढकलीत.त्याचं मात्र सारं लक्ष बापाकडंच होतं.पोरायचं काय चुकत नव्हतं.गाणं लागलं कीच गडी जाग्यावरचं हालायचा.पोचं ती कसली दम खात्यात. दोनचार जणानी आत ढकलला. बाकीचं पोरं मोठयानं ओराडली,”आरं आलाआला.. हीरो आला.
संत्या सुरूच झाला. सुरूवातीला एक दोनदात्यानं बापाकडं पाहीलं. ते गप होता. संत्याच्या अंग अंग हालू लागलं. गडी चांगलाच रंगात आला. नाचणरा चांगला आसला की वाजवणराला भी चेव येतो.वाजवाणरं चांगलं आसलं की नाचणारचं भान हरपत.अजून दोन चार पेताड जमा झाली. संत्याच्या अंगावरून नोटा फेकाया लागली. पोरं चेकाळली. गाणं वाजतं होतं. जे पैसं दयायचं बँन्डवाल्याला दयायाचं ते संत्यालाच दयायाला लागले. पैसं बँन्डवाल्यावर ओवाळायचे.शेवटी संत्यालाच दयाला लागले.असा इन्सल्ट बँन्डवाल्याला भी सहन होत नव्हता.संत्या ते त्वांडात धरून नाचाया लागला.बँन्डवाल्याचा गाणं वाजवण्यातला इंटरेस्ट कमी झाला.ते बंद पडले की पोरं नुसत ओरडायची. चार पाच पेताङ तर पारच अंगावर जायची.
उग तीरीमीरी होऊ लागली. दोनचार गाण्यावर नाचल्यावर संत्या भी जरा गळाटलाचं होता. पैसं पाहीलं की पुन्हा त्याला हुरूप यायचा.
              तेवढयात एक जीपड आलं.सारीचं त्या जीपडयाकं पळाली.. नाचणारे पळालेबघणारे तर सारेच पुढं पळाले. जीपडयाला गराडाचं पडला.  थोडा अंधार पडला होता. जीप मधून एक नाय. दोन नाय.. तब्बलं चार बाया उतरल्या... त्या पण हासतं हासतं….सा-यानी केसं मोकळे सोललेपदर खांदयावरचंदोन तीनं माणसं भी उतारली.त्यांच्या पिश्या वागायला आसतेल ते. बाया उतरल्या की त्यांच्या अत्तराचा वास.सारीकडचे पसरला.तेव्हं सेंट भी लय भरी होता. पलीकडं पारावर बसलेले टोळक लगीच इकडं आलं.बाया उतरल्या -या पण त्यांना कुठं बसवायचं? हा प्रश्न सच्याला पडला.सच्या गेला होता सुपारी दयायला.त्या कुठं भी उभाराहिल्या की उग पाच पन्नासं पोरंग जमा व्हायचं. त्यात शेंबडी भी पोरं आसायची.चांगली तरणीताठी,म्हतारी-कोतारी भी असायची.त्या चार बायात.. एक पोरगी  होती. ती ड्रेसवर होती.साळातचं जात आसलं. निळा ड्रेसतसलीच ओढणी अंगावर टाकलेलीतीचं भी केस मोकळचं सोडलेले. पिक्चरमध्यल्या हिरोनीवाणी…. बाकीच्या साडीत होत्या
आयला, ॲटम भारी आणेत लका.”
मग सच्च्याची चॉईस….” कुणी तरी उगचं कालर टाईट करत म्हटलं.
आयला ते बारकुसं घूंगरू कशाला आणलं कायनु.”
आता हयो.. चीगुरखना नाय का. त्यांनी भी टायेम पास पायजे. त्यांची नाय काय जत्रा.”एक चावट म्हतारं म्हणालं.तशी पुढची सारीचं बारकाली पोरं लाजली. लाजली पण चांगलीचं चेकाळली.आता त्यांना कुणाच्या घरी थोडचं नेता येतं? चावडी पुढचं टेकल्या. त्या टेकल्या तरी सारा गराडाच पडला त्यांच्या भोवती.
आर, नुसतं बघत काय बसता. पाणी बीणी तर पाजा.” नंदी म्हणाली.त्यातली सा-यात मोठी नाची होतीतिचं नाव नंदी होतं.
या गावचं पाणी लागलं काय ग्वाड.” मोठं धाडसं करून मिचमिच डोळयाचा शिव्यानं इचारलं.
या गावचं काय…. बारा गावचं पाणी पीतो आम्ही.आणतोय का पाणी चीकण्या…”नंदी म्हणाली.तेव्हं होता कोठूळयाचा नील्या. चिकण्या म्हणलं की जाग्यावरचं लाजून लाजून चूर झाला.त्याला पुढं काय बोलावं तेच कळेना.ते मागचं ळालं.सारी पोरं….लाजलं लाजलं.. म्हणून आरडायला लागली.सारा चिगुरखना.. मोठाली टोंगळी पोरं ही होती तिथ पण पाण्याला कुठं कोण जात.सा-यानाचं मज्जा घ्यायची.कुणाचा पाय तिथून हालत नव्हता.
तेवढयात गावचा कोतवाल. धाम्यागेला नी चरवी भरून आणली. बायाच्या पुढं ठेवली.त्या बायांनी नुसतं त्या पाण्याकउं पाहीलं.
आसलं पाणी नाय पीत आम्ही.बिसलरीचं आणा.” कुरूळया केसाची संगी म्हणाली.
पुन्हा सारी गप झाले.कोण पैसं खर्चीत.कोतवाल बिसलरी कुठून आणीन?
                  तेवढयात तुषार भैय्या….आला. तुषारं भैय्याच्या माग त्याचं पोरं होतीच.तुषार भैय्या म्हणजी संरपचाचा नातूटार्च केलेलेकापडंनुकतचं मीसरूड फुटलेलेगळयात सोन्याचा साखळी.हातात मोबाईल.त्वंडात मावा.चांगलच त्वांड फुगलेले होते.केसात गॉगल लावलेलाभारी स्टायलेश गडी.तुषार भैय्या आला की सारीचं पोरं माग सरली.त्याला सरळ वाट करून दिली. तुषार भैय्याच्या काही बाया ओळखीच्या आसत्याल. कलाकेंद्रावर. कधीबधी जात आसलं. असा काहीनी अंदाज काढला.अंधार झालेला होता.बायाची तोंड पहता यावेत म्हणून त्यांन डायरेक्ट तोंडावरचं बॅटरीक चमकीली.”मीना आत्या काय? सोनी दिसती नि स्वीटी?”
स्वीटी नाय आली. लयच याद येती काय तिची?” नंदी म्हणाली. याद येती काय म्हणलं की सारा चिगुरखाना मोठयानं ओरडला,”आयला लय भारी बोलती लका….तेरी याद आती है.” दोन चार जणानं तर गाणचं सुरू केलं.स्वीटी…. भी पोरीच नाव आसतं. हे त्यांना पहिल्यांदाच कळालं. त्यातलचं एक बेणं म्हणतयं, स्वीटी का सीटी….. असं म्हण-या पो-याकडं तुषार भैय्यानं रागानं पाहीलं.त्याच्या बरूबरचं पोरं पार त्याला हाणायालच धावले. ते चींगाट मागं पळालं.नाचायला आणलेल्या बाया आहेत तरी कश्या हेच पाहायला लोक गर्दी करीत. त्या म्हतारी कोतारी माणसं भी आसतं. संदीप बावण्याच्या म्हणयाप्रमाणे म्हता-यालाच लयं कंड आसतो. माणसं सारेच खूष होत होते..बाया भी चांगल्या होत्या.दोन वयस्कर वाटत आसल्यातरी भारी वाटतं होत्या.भारी म्हणजी चिकण्या होत्या.बारकी पोरगी मध्येच बसली होती. सारी माणसं तिथचं डोकायची.संत्या पुढं आला. संत्याचा भी आज वठच होता. मघाच्या डान्सातचं त्याला जवळ जवळ चारपाचशे रूपये भेटले होते.केसं मागे वर केलेले. वन साईड कट मारलेलात्याच्यावर रूमाल गुंडाळलेलायाडयानं अंधार पडला तरी गॉगलं डोळयाला लावला होता.ती त्याची स्टाईलच होती.कुणी तरी त्याची ओळख करून दिली.”हयो संत्या….. आमचा गावच डान्सरं.”
डान्सर…!!” त्याच्याकडं सा-याचं बायानं पाहीलं.पायापासून डोक्यापर्यंत.संत्या गेला इरमाटून.तेव्हं लाजला की बाया मुद्रदामचं त्याला लागल्या खिजवायला.नाच्याच त्या त्यांना कसल्या आल्यात लाजा.
काय रे छटाक्या? नाचतो काय माझ्या बरूबर.” छटाक्या… म्हणल्या बरूबर सारीचं पोर हासली. आता त्या नाच्या म्हणल्यावर एवढं तेवढं चावट बोलणारचं ना नवीत शिकत आसलेलं पोंरग ते.तिच्या बरूबर कस नाचणार? ती तर त्याच्या आयीवाणी होती.”नग बाबाम्या कशाचं डान्सरं?” संत्या….माग सरकला पण सारी गर्दीचं त्याला पुढं रेटी.आता त्याला काय पळून जाता येतं का ?
नग…” म्हणंन नी हातानी त्वांड झाकी. नुसतं हासं.
आर, या आमच्या रिंकी की बरूबर नाचतोस का?” त्या बारकुश्या पोरीकडं हात करत ती नाची म्हणल्या बरूबर सारीच पोर मोठयानं ओराडली,”लय्यी भारी जोडी गडया… आर्चीनं परश्या….” काही बारकाले पोर तर तिथचं जाग्यावरच नाचायला लागले.तसल्या बारकाल्यानां कशाचं सुंभार राहतं. सच्या तिथं आला.त्यानं सा-यालाच माग सरकी.
चला,पळा त्यांना जरा म्याकअप करू दया.” जी पोरं माग सरत नव्हती.त्यांना सरळ त्यांनी टोल दयाला सुरू केलं. मोठाली पोरं साईडला राकली.त्यांचा काय तिथून हालायचा इचार नव्हता.सच्या त्यांना कशाला काय बोलतोय. सा-याचं बाया चावडीत कोंबल्या. दाराला कडी लावून सच्च्या दारात बसला.पोंर लयी हुश्यारं… खिडकीतनं डोकायाला लागली.मगमात्र त्याचा पारा चांगलाच वर चढला.”बायाश्यनी कापड भी बदलून नाय दयायचं म्हणल्यावर काय करायचं. त्या तसल्या बायात का ? लोककलावंतत्या.कलाकाराची भी कदर कराया पायजे.” सच्च्यावर उगचं लेक्चर दयाची पाळी आली. सच्याची मोठी सर्कस उभी राहिली.बारकाल्याचं ठीक हो पण त्यांना दोन टोल तरी हाणता येतेत.आता दोन दोन लेकराचं बाप ही खिडकीतून डोकाया लागल्यावर काय करायचं.
                                    सारं गाव गोळा झालं. पाटलानं देवाला नैवैदय दावला. चावडीतून म्याकअप करून बाया बाहेर आल्या.पायात चाळ बांधल होतं.त्या चालायला लागल्या की ते वाजयचं.त्या बारकुश्य पोरीनं साडी नाय.पँन्टं शर्टच घातलं होतं.आता तर लयीचं भरी दीसत होती.साडीवर तीला नाचताच येत नसलं.कुणी म्हणालं तीला साडीचं नेसता येत नसलं.सा-याच्या नजरा त्यांच्यकडंच होत्या. गावातल्या बायानी भी गर्दी केली होती.पोरी सोरी  भी कडाकडान बसल्या होत्या. तेवढयात संत्या व विकाश्या पाण्याची बाटलीचं घेऊन आले.ते बाया जीथं उभा होत्या तीथचं गेले. आज संत्याकडं काय पैशाला कमी नव्हतं.त्यांच्या बाजूला बसल्याली पोर लगीचं म्हणाली,”आणलं गडया हिरोनं पाणी तुम्हाला.” संत्यानं भी त्यांच्या हातात बॉटलं दिली.त्या पाणी प्याल्या.संत्या त्या बारक्या नाचीकडं पाहतचं होता. आता नजरा नजर होणारचं.
, हीरो तुझं पाणी लयं ग्वाङ रिंकी तसं म्हणाली की पोरं नुसती मोठयानं आराडली.
संत्या….संत्यालयचं मज्ज लका तुझी…” तसं ते लाजून लाजून चूर झालं.
, हीरो नाचणार ना मझ्या बरूबर..” आता त्या रोज नाचणा-याच पोरी. एवढं तेवढं चावट बोलणारच.तसल्या अंधारात तिनं त्याला डोळा मारला.डोळाचं मारती म्हणल्यावर हे झालं पागलं.लहान आसलं म्हणून काय झालं.त्याला भी सारचं कळत होतच की.
                        आरगान वाजायाल लागलं.एक दोन गाणी झाले.लोकांना कशाचं दम.लागले पैसं सोडायला.कुणी कुणाच्या डोक्यावर नोट धरायचं.त्याला चापट मारायला लावायचं.त्या नाचीनं चापट मारली की बाकी नुसती खो खो हसायचे. जयाला मारायाचे त्याचे आय, बायको तिथचं असायचे.बाप असायचा.सारीचं मज्जा घ्यायचं. पुन्हा चिडून जाऊन दुसरा पैसं सोडायचा.चांगलाच रंग चढत गेला.गावातल्या पोरानं संत्या मध्येच ढकलीला.डान्सं सुरू झाला.संत्याचा डान्स एक नंबरच होता. तेव्ह नाचायचा.लोक पैसं दयायचे.कुणी रिंकीवर ओवाळून दयायचे. कुणी संत्याच्या त्वांडातले पैसं तिला तोंडानं घ्यायला लावायचं. बाकीच्या नाच्याच खाली बसल्या.रिंकीनं संत्याचं नाचायला लागले.
                    पँन्ट आणि शर्टवर ती नाचायची. पोरांना ते पिक्चर मधल्यासारखंच वाटाया लागलं. नटया नाय का पँन्टवरच नाचत. पोर चेकाळली.पोरच काय सारीचं माणसं चेकाळली होती. पोरं मात्र ओरडत होती.माणसांना आरडता येत नव्हतं. त्यात भी एखादं बेवडं आरडायचं.मध्ये जान नाचायला बघायाचं.दोघावर पैशाचा पाउस पडू लागला. त्यांचा तोल सुटतं चालला. ते दोघी भी हातात हात घेऊन नाचाया लागले. पिक्चर मध्यल्यावाणी ॲक्शन कराया लागले. सारं गावं ते रोमान्सं पहाण्यात यडं झालं होतं.त्यात संत्याची आय भी होती.तिला मात्र पोराचं हे कौतुक पाहुशी वाटतं नव्हतं.नाची बरं पोरग नाचत. ते पण भरल्या गावात. जत्राला शंभर गावचं माणसं आलेलें आसत्यात. गावगावचं पाव्हणं रावळं आलेलं आसत्यात.त्यात पोरांचा हा तमाशा. बापाच्या पुढं एक कांड पोर निघालं असं तिला वाटलं.इतक्या लहानपणी आसली थेरं कशाला? तिचा जीव उदास झाला. आसल्या पोरा पेक्षा मी वांझं का राहीली नाही.त्या पोरीनंच आपलं पोरग फितवील असं तिला वाटलं. तीला काही वाटलं तरी कायच उपेग नव्हता. ते बेणं बेभान होउन नाचत होतं.तिच्या तळपायची आग मस्तकाला गेली. बाप पिऊनचं उडया मारायचा.त्या रांडापुढं हिजाडयासारखा नाचायचा.पोरंग तसचं कराया लागलं.जत्रा गावची.दोघं बापलेकाचीच चर्चारोज लोकाच्या इथं कामाला जायचं. एक दिवस दम नाय तिच्या हाताला. बापलेकाचं असली थेरं…. पोराची तर पारचं सुध्द गेली होती.त्याला कशाचं काय कळतं होतं.ती उठली. तडा तडा माणसात शिरली.कंबरेला पदर खोचला.
                 सा-याचं लोंकानी पाहीलं.आता पुढं काय होईल याचा अंदाज कुणालाच नव्हता तिनं दात ओठं करा करा खाल्ले.संत्याला व त्या पोरीला त्याचं भान नव्हत. ती गेली आसचं. सणासणादोनचार त्याच्या कानफाटात मारल्या.संत्याला काय करावं हेच कळेना.आता डान्सं करतानीपोरी समोर आपल्याला कानफाटयालं त्याला सहन झालं नाही.आपमान सहन करत माणूस पण असं पोरी देखत…. सा-या गावासमोर…. हाणायचं म्हणजे? हीला डान्समधलं काय कळतं.तेव्हं भी टसलीलाच पेटला.
मार मलामार मला…^ तिच्या अंगावरच हा धावून जाऊ लागला. बँन्डवालं तसली बेणं. ते भी लवकर बंद करिनात.तिला कुणाला धरायला भी यायना. कारभारी आंनदराव उठला. त्यानं शेलक्या दोनचार शिव्या हासाडल्या.मग बँन्ड वाजायचं बंद झालं. रिंकी धरायला गेली.” काकू,मारू नका….”ती होती रागात.दिलं तिला ढकलून.”गप ऐ इवश्ये…. माझ्या पोराला नादी लावती काय?” रिंकी जोरात खाली पडली.तशा सा-याचं नाचणा-या बाया पुढं झाल्या. संत्याच्या आयीच्या अंगावर धावून गेल्या.एकीनं तर तिची झिपरीच धरली. त्या भेत्यात व्हयं ?गावची पुढारी पुढं आलं.सा-यानी सोडवल. राधाअक्कानं ढकलीतचं संत्याच्या आयीला बाहेर काढलं.संत्याला एकजणानं ढकलीतचं बाहेर आणला.जत्राच्या कार्यक्रमात आसला चका नाय करायला पायजे.पुन्हा गाणं सुरू झालं. संत्याची आय तणा तणा करीत घरी गेली.
                 दोन तीन गाणी झाली की मुरली नानानी संत्याचं बाप. शूक्याचं पंग करून मध्ये आणून सोडला.संरपंचाच्या इरोधतल्या गडी.उग आठमुठा.एकदमचं संरपंचच्या क्रास मधला गडी.आता हे मुददामचं गावच्या जत्रेचा इचका करायला लागलेत. हे सरपंचानी ओळखलं.बरं आशुक्याला नीट उभा भी राहता येतं नव्हतं.तेव्ह जाग्यावरचं नागीन डान्सं करायला लागला.लोक पुन्हा चेकाळली. असं ओरीजनलं आयटम सांग पाहयला कुणाला आवडायचं नाय.तेव्हं उठायला गेला की आपटं. सारी माणसं हासतं.संरपंच, पाटील उठून गेले.गावातलं बरीचशीच मोठाली माणसं हळू हळू पांगाया लागली.रात भी बरीच झाली होती. तरूण पोंर पुढं सराकली.
       आता तुषार भैय्याची.गँगच तिथ आली. ते येऊन बसल्यावर लगेच आशुक्याला बाहेर काढलं. मोठाले दोनं पाचशेच्या नोटाचे बंडलं त्यांन बाहेर काढले. असं पुढं मांडले.एका एका गाण्याची फरमाइश करायला लागले.ते पैसं दाखवीत.नाचायला लावीत. ते सारं रिंकीलाचं बोलीत.कुणाच्या डोक्यात मारायला लावीत. ती पैसं न्याला आली की तिचा हात धरीत.रिंकीला त्यांनी ओढलं की संत्याची नुसती उलाघाल व्हायला लागली.संत्याचा जीव इकडं तीळ तीळ तुटं. त्यांचा नी तिचा काय संबंध होता पण उगचं याचा जीव तिच्यात गुंतला.संत्या जवळ जाई. तिला खुणी. जाऊ नकू म्हणं पण ती कुठं ऐकत आसती व्हयं.तिला तरी कसं ऐकून जमणं.पोटासाठीचं तर ती पण नाचत होती.ती त्याला खूणानच म्हणं नोटा सोङ.याचाकडं कशाचा नोटा आल्यात ? नाचून नाचून गोळा झालेले चारपाचशे रूपये होते.त्याला दमचं निघाना….बसला कोप-यात एका. लागला पेसं सोडायला.पैसं दावीलं की रींकी येई.यांनी बोलावलंकी तुषार भैय्या भी बोली. दोघाची मोठी टसलं लागली.
                         सा-या गावाला प्रश्न पडला. संत्याकडं कशाचं पैसं आलेत.ते कसं काय पैसं सोडीत.तुषार भैय्यला भी राग आला. एक मागसवर्गाचं पोरगं आपल्या बरूबर टसलं करतं.सार गाव संत्याच्या नोटा संपायच वाट पाहत होत पण त्याच्या नोटा काय संपत नव्हत्या.तुषार भैय्यानं नोट दाखवली की संत्या दाखवायचा.दोघांची चांगलीच जुंपली.गाण्यापेक्षा या दोघाची जुगलंबंदी चांगली रंगली होती.
तेवढयात मुरलीनाना म्हणाला,संत्या होऊ दे डान्सं.. आता मुरली नानी फर्मइश केल्यावर संत्याला चांगलाच चेव आला.गाणं लावलं  की संत्या बेभान होउन पुन्हा आत मध्ये शिरला. पुन्हा नाचायला लागला.लोक चेकाळली. पुन्हा पैशाचा पाउस पडू लागला. तुषार भैय्या इकडं दात ओठ खातचं होता.संत्या त्याच्याकडं पाहून नाचायचा.रींकीला मीठीत घ्यायचा….
तुषार भैय्यासमोर आसले थेरं केल्यामुळे त्याचा पारा चढला.  चार पाच पोर आतमध्ये घुसले आणी संत्याचं धरला. नुसत्या लाथा बुक्क्यांचा मारा केला.संत्या मोठयानं ओरडं पण त्याला कोण सोडीत.सारी माणसं पांगली. बाया ही घाबरून गेल्या. रींकी त्यांना धरायला गेली पण नंदीन मागं ओढली. सा-या बाया घाबरून गेलया.ते चार जण त्याला नुसते बदडत होते. चार दोन म्हतारे सोउयला गेले तर तुषार भ्सैय्यानं सा-यालाच दम टाकला. मध्ये कुणी पडायचं नाय.
टोला टाकला की संत्या मोठयानं आरडायचा. “आयी ग मेलो ग….” त्याची आय तर कधीच घरी गेली होती. बाप तिथचं पिउन पडला होता.
त्याच्या उलटया पायावरच दोनचार ठोके ठेऊन दिले.संत्या मोठयानं बेकला.त्याचा पायचं मोडून काढला.?“आय घाल्या लयचं डान्सं करतोय काय ?” शेवटची लाथ मारली.त्याच्या अंगावर थूंकला. गाडी चालू करून निघून गेला.आरगानं बंद झालं होतं.बायाची जीप चालू झाली.सच्या गप गाडीत बसला.संत्या मात्र पाणी.. पाणी करत होता. जत्रा पांगली. अंधारात जीप धावू लागली.रिंकी फक्त त्याला पाहू शकली. ती थांबू शकली नाही.ना काही बोलू शकली.संत्या मात्र ढणाढणा जळणा-या बल्बच्या उजेडात बेकत पडला होता. 
                                             परशुराम सोंडगे,पाटोदा
                                                                                                                                 9527463058
                                                             prshuramsondge.blogspot.com
sahitygandha.blogspot.com  


1 टिप्पणी:

तुका आकाशा एवढा म्हणाले...

मार्मीक
जिंवत शब्द चित्र

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...