शुक्रवार, ३० मार्च, २०१८

म्हतारीचं कॉन्फीडन्स


कथा आणि व्यथा
                                       म्हतारीचं कॉन्फीडन्स

दुपारची वेळ होती. मुलांची मधली सुट्रटी ची वेळ झाली होती. खिचडी तयार झाली होती.घंटी वाजली.तसा मुलांचा लोंढा बाहेर पडला.सारी किलबील सुरू झाली.भातावाली बाई तयार झाल्या होत्या.
मुलांची रांग केली. त्यांना काही सूचाना केल्या आणि तिच भींतीला टेकलो.मुलं येत होती .जात होती. तेवढयात एक आजीबाई आल्या.हातात एक डबा होता.त्या काठी टेकून तिथचं शांत बसल्या.त्या खाली जमीनीकडं बघत होत्या.त्यांच लक्ष तिथं नव्हतं.त्यांच्या हातातला डबा पण त्यांनी लपवला होता.बहुतेक मी तो पाहू नये म्हणून त्यांनी तसं केल असावं. मी उगच जरा अलीकडं सरकलो.आता त्या मला पाहू शकत नव्हत्या पण मी थोडं पुढं सरकलो की सारं पाहू शके.
                          सा-या मलांची खिचडी वाटून झाली.  आजी उठल्या. डबा पुढं केला.त्या आमच्या भातावाली बायीला भात मागू लागल्या. अापण फारचं प्रमाणीक व साव अहोत याचा आव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा.तसा प्रयत्न अनेक चोर पण करतच असतात.म्हतारी हळू अवाजात भात मागत असतानी.काकू त्यांना टाळत होत्या. त्या मोठयांंन बोभाटा करू पहात होत्या.मी ते सारं हळूच पहात होतो.अाजीनं डब्याचा स्पर्श तिच्या दंडाला करत विनवणी सुरू केली.
तशी काकू मोठयान तिच्यावर खेकसली,” म्हतारे पळ ग. हा भात पोरासांठी असतो. मोठया माणसाना नाही.”
तसं म्हतारीनं तोंडावर बोट ठेवता.तिला गप राहण्याची खूण केली. बराच वेळ मी गप राहीलो. त्या ही गपच बसल्या. मुलांनी खरकटं सांडू नये म्हणून ग्राऊंड मध्ये उग फिरवू लागलो.माझं लक्ष मात्र त्यांचकडच होतं.
“अग,रकमा आत्या तुला सगितलं ना ? जा. तू. सर मला खवळतेल. मोठाल्या माणसाला नाय हयो भात.”
“अग, दे थोडा. पोंराचं झाला की आता खाऊन.”
“जा, तू सरला इचार.”
“मी नाय बया. त्यांना कशाला इचारू?”
“मग मी इचारू का ?”
“नकू. त्यांना कशाला इचारतीस? ते जर म्हणले आजी, तू काय शाळेतस तर काय सांगू?^
हे ऐकल्या बरूबर. मी जवळ गेलो व म्हणालो,”काकू काय म्हणत्यात आजी?”
“काय नाय हो सर. म्या कशाला काय म्हणू ?”
“आजीला, मी मराठीत किती वेळा सांगते. हा भात पोरांसाठी असतो. तुला कसं देऊ.तिला मराठी कळनाचं.”
आमच्या शाळाची आर्ची म्हणून प्रसिद्धीस आलेली मीनी.सैराट पिक्चरमधील बरेच डाॅयलाॅग पाठ असल्यामुळे सारे तिला अार्चीच म्हणू लागले. तिला तसचं वाटतं.तर ती आर्ची मध्येच म्हणाली,”आजी ,मग काय इंगलीश मध्ये सांगू काय ?”
तशी म्हतारी चिडली. रागारागनं काठी उचलली.
"नका, देऊ. जाते माझी म्या. कशाला इंग्रजी नी बिग्रजीत सांगता मला”
“आत्या राग आला काय?”
“आता कशाचा राग बया मला. माझा सारा राग गेला.कुणावर रागू ?अशी पोरी सोरीनी भी राडोळी नाय करावी. जाते बया.” अशी म्हणाली. दोन पावलं पुढं गेली.
“आजी, पोरं काय करेतत?”
“एकचं होता. एकुलता एक. त्या ढोल्या मेल्यांनी नेलां बाबा. आता चार वर्ष होत आलं.”
“त्या वरच्यान. भरल्या रानात. फाशी घेतली. गेला सोडून.”
“मग सून आसणं की….?”
“सुन कुणाची कोण बाबा. लयं रीन झाल. रीन झाल.असं म्हणाली. गेली एके दिशी एका डारयवरचा हात धरून.इवडुशी इवडूशी पोरगी माझ्या अंगावं टाकनू.
 “अरे.. अरे.. तिला काय झालं ?” मी उत्तर हळहळ व्यक्त केेेली.
“तसल्या शिदळ रांडाचं काय आसत ? झोपीतल लेकरू. उठलं आयी आयी करत. आयीन केलं काळ त्वांङ.संभाळते मीच. भरल्या जगात कुणी नाय तिला. “ आजीच्या डोळयात पाणी दाटलं. त्या चेह-यावरील सुरूकत्याच्या ओघळरेषातून ते पाणी खाली ओघ्ळत आलं. आजीचा पदर ओला झाला. आता मला आजीचं पुढं काहीचं ऐकायचं नव्हतं. कुणाचं दु:ख टोकरण्यात काय  हशील? मनातलं ठसठसलेले थोडसं ढिवचलं. की कसा भळा भळा पू बाहेर यावा तसं तिच्या मनातलं भळभळत राहीलं.
“सरकार भी कसलं. त्या सटवेनं.कपाळाला लावायला माती नाय ठेवली.म्या पोटाला चिमटं घेऊन कमीलेले सारं शॅत त्याच्या घशात घातल.”
“कुणाच्या..”
“तुम्हाला सांगाया काय झालं बाबा. महया लेकारावाणीत तुम्ही.त्या मसनवाडीच्या ड्रायरला घेउन घरात बसायची. महया लेकाच्या खाटीवर… पोटात आग पडायची नुसती. आग. आग व्हायची देहाची.सारं घरं पेटून दयावा वाटायचं. त्यात उडी मारून जळून जाव वाटायचं.त्यांना भी जाळावं पण त्या पोरीकडं पहात जगते बाबा. माझं तरी काय राहीलं? गापकुणी डोळ झाकलं तर महया लेकराचं काय होईल? लयं घोर राहतो. झोप नाय लागतं रातच्याला.”
“असं नाय व्हायचं आजी. रडू नका. देवाला काळजी आसती. नाय तुमचं डोळ झाकायचे. त्या आजीला मी धीर देऊ लागलो होता.
"कुडीत प्राण हाय तव्हरं.मी नाय कमी पडू दयायचो." फाटका पदर पुन्हा एकदा ओला झाला. माझं काळीज आतुन चीरफाडत गेलं होतं.
                    गेल्या वर्षी आमच्या शाळेत असलेली.एक सडपातळ.. बुजरी.. पोर ही राणी…तिचंच चित्र डोळया समोर उभा राहीलं. राणी लयं हुशार नाही पण ती समजदार पोरगी आहे. इतकी समज तिला या वयात का आली असेल ! त्याचं उत्तर मला आज कळालं होतं.
“काकू ,दया त्यांना भात.”
“सर, आज देता येईल.आजी रोजच आल्यावर ?” संवेदना बोथट झालेल्या ऑफीसमधील अधिका-यासाखी व सरकारी बाबूसारखी काकू मनान बधीर झाल्या सारखी वाटली मला.
“येऊ दया की…. रोजच दयायचा त्यांना भात आता.”
“ही म्हतारी आली की दुस-या येतील.. तुम्हला माहीत नाय हे गाव सर.” काकूनं उगचं निर्थरक सल्ला दिला.
“येऊ दया. म्हतारंपण  ही निरागसच आसतं ना बालपणावाणी?”
“दे की सर म्हणेत तू का फाटं फोडीती?" मी दिलेल्या आधारानं तिचा कॉन्फीडन्सं वाढला होता.
भरला डबा घेऊन जातानी तिच्या चेह-यावर आंनदाच्या मंद लाटा उठल्या होत्या.
आणि माझ्या अंतरंगात कसल्या समाधानाचं अमृतथेंब पाझरत होते. ते माझ्या डोळयाच्या कडा ओलावून गेले. त्यालाच आंनद आश्रू म्हणतात,ना?
                                                 परशुराम. सोंडगे,पाटोदा
                                prshuramsondge.wordpress.com
sahitygandha.blogspot. com
बुधवार, २८ मार्च, २०१८

तुझी ओढणी उठाली

ही एक प्रेम कविता आहे.अतोनात प्रेम असलेली प्रिया
असता हे गावच सोडून जात आहे.शेवटचं काही बोलता नाही आलं.दाटलेल्या अनेक भावनांना  सहज अाणि अप्रतिम शब्दांत पकडलं.कवी परशुराम सोंडगे यांनी.

मंगळवार, २७ मार्च, २०१८

देव नसलेले डाॅक्टर दवाखान्याचं कॅनटींग बंद झालं होतं. रात्रीच्या अकरा वाजल्या होत्या.त्यामुळे रोडवरच्या टपरीत चहा प्यायला गेलो होतोत.सकाळ पासून पोटात आन्नाचा कण नव्हता.थोडं चहा पाणी घेतलं.अाईची तब्येत वरचीवर बिघडतच चालली होती.टेन्शन तर भयंकरच होतंच.ज्या अंगावर खांदयावर पण खेळलेलो ,वाढलेलो. ते माणूस मरणाच्या दारात होत. बाबा गेल्यापासून अाईनं काय केलं नव्हतं मच्यासाठी? मरणाचा विळखा पडलेला असताना तो जीव तडफडत असताना आपण रिलॅक्स राहणं शक्यचं नव्हतं.  अशावेळी आपली हतबलता खायला उठती माणसाला. हातपाय गळून गेलें होते.जीवनाचीं क्षणभंगूरता व मृत्यची अटळता माणसाला कळू लागते. या विचारत मी गढून गेलो असतानाचं माझा मोबाईल वाजला .कॉल आय.सी.यु मधूनच होता.आताच तर मी सारं बघून आलो होतो. बाईचं कंडीशन ठीक होती. डॉक्टरच्या मताप्रमाणे तब्येतीत सुधारणा होती. आताच कुठं तिचं शरीर औषधानां साथ देत होतं.तो दिलासा होता. असं इतकं असपष्ट बोलणं ही पुरेस असतं.थोडसं रीलॅक्स व्हायला.
             पुन्हा तिथूनच फोन.जी बातमी पल्याला ऐकायचीच नसते. अशी बातमी असूच नाही असं वाटतं. तीचं बातमी ऐकावी लागते की काय  अशी भीती असल्यामुळे मी दचकलो.तुमचं पेंशट सीरिअस ..कम फास्.” आय सी यु मधील नर्सचा फोन होता.अर्थात तिचा स्वर कमालीचा शांत होता. भावनाशून्यं. आता आईचं मरण पहावं लागतं की काय असा प्रश्नं मला पटला.माझा पाय ओढत नव्हता. ऐ-हीवी मी पळत जात असे. आज पाय जड झाले होते.जाव तर मलाच लागणार होत कारण त्या आय सी यू मध्ये रूगणाच्या एकाच नातेवाईकाला जाऊ दिलं जातं होतं.ते डॉक्टर.. फक्त माझ्याशीच रूगणाच्या कंडीशनविषयी बोलत असतं. ते कुणा कुणाला सांगणार? मी पळत गेलो कारण मी खाली तिस-या मजल्यावर होतो.हॉस्पीटलं किती मोठं असो.तिथं जागजागी लिप्टचा वापर करू नये.चांगल्या आरोग्यासाठी जिन्याचा वापर करा असा फुकटचा सल्ला दिलेला असतो.मी पळत पळत वर गेलो.पळणं आणि प्रचंड भिती मुळे माझाच बीपी हाय झाला होता. मला प्रचंड घाम आला होता.तेवढयात पुन्हा कॉल आला . कम फास्टं.
मला हे कळत नव्हतं. ती सीरीअसं असली तरी मी ती जाऊन काय करू शकत होतो. अनेकदा हात जोडून डॉक्टरला फक्त विनवणीचं करू शकत होतो. जास्तीत जास्तं केवीलवाणा अवाज काढून.जे काय करायच होतं.ते सारं त्यांनाचं करायचं होतं.शेवटी मरण तर अटळचं आसतं.
मी वार्डमध्ये शिरलो.सारे नर्स, दोन डॉक्टरं.. दोन त्यांचे अस्टिंट.सारे तिथ जमा झाले होते. सा-यानी गराडा घातला होता. आमची आयी तडफडत होती. तिच्या एंकदंरीत हालचालीवरून तिला श्वास घ्यायला कमालीचा त्रास होत होता. ती पुढचा श्वास घेईल की नाही अशी भीती वाटतं होती.मी गेलो.ती माझ्याकडं पाहू शकली.त्या डोळयात  कमालीची असाह्ययता होती. हे जग सोडून जावाचं लागतं. असं तिला बहुतेक वाटतं असावं. तीनं माझ्या हाताला स्पर्श करण्याची अपेक्षा केली. माझा तर दगड झाला होता. अगदी निर्जीव…..
काय झालं?” माझा गहीवरल्या स्वरात प्रश्नं. हे बरं होतं तिथं माझ्या जवळचं कुणीच नव्हतं. नाहीतर मी माझा हुंदका थोपवू शकलो नसतो.असावांचा बांध फुटायला आपलं आणि आपलं कुणी तरी जवळ असावं लागतं.
बी पी हाय.”
काय करावं लागलं? डॉ.काय म्हणतायेत.”
तिथचं एक ऑपरेटर एका मशीन मधून आलेली वाकडी तिकडी नळी घेऊन उभा होता.
त्यांना  ऑक्सीजन दयावा लागेल.
मग दयांना?  उशिर का करताय?”
नक्की दयायचा का?”
दयाना प्लीज.तुम्ही  का उशिर करताय ? आई सीरीअसं.”
येस. क्रीटीकलं.” असं ते म्हणतं होते पण तो मशिनची नळी मात्र तिच्या तोंडाला लावत नव्हता. माझा मात्र पारा चढत होता.
"मग दयांना प्लीज…. "मी अक्षरश: ओरडलो.
याचा एका तासाला पाच हजार रूपये चा्र्ज....
असू दया. तुम्ही कधी लावणारेत. लावा लवकर….”
त्यानं पुन्हा माझ्याकडं पाहीलं.त्याला अजून माझ्याकडून कन्फर्म करायचं होतं. मी हातानं इशारा करून त्याला ते लवकर लावण्यास सांगितलं.ती नळी आईच्या नाकाला तोंडाला लावण्यात आली.त्यामुळे तीची होणारी तगमग शांत झाली.पाच मिनीटे सारेच निशब्द होते. तिला आराम वाटू लागला असावा. सारेच आम्ही त्या मशीनच्या स्कीनवरील निळया,पिवळया रेषा पहात राहीलोत.
मी विचारलं,”कसं वाटतं.
ती फक्त मान हलवू शकली. त्यात होकार होता.मला हायसं वाटलं. भीतीच्या जाळानं झालेली काळजाची आग आग थंडावत गेली.
मरणास तूर्त तरी आम्ही थोपवलं होत.
मी वार्डमधून बाहेर पडलो.तितक्यात ती नर्स जवळ येऊन म्हणाली,”हे औषध आणा अणि इतका अॅवान्स भरा.
तिचा भंयकर राग आला.मी आय सी यू मध्येच आरडा ओरडा करायच्या बेतात होतो. मला मीच आवरू शकलो.
"आम्ही पेंशटं तुमच्या जीवावर आय सी यू मध्ये ठेवतो. तुम्ही ऑक्सीजन दयाला आम्हला बोलवतात.तुम्ही तो देउ शकला असता.फक्त पैशासाठी माझी वाट पहात बसलात."
"तसं नाही सर,आम्हला सक्त सूचनाच तशा आहेत."
आसल्या कसल्या सूचना आहेत ?”
पेंनश्टच्या नातेवाईकाना विचारूनच सारं दया.पुन्हा प्राबलेम होतात.”
मी जर उपलब्ध नसतो झालोतर ....तुम्ही मरू दिल असत आईला तर ?”
तस नाही सर,या हॉस्पीटलचे पण काही रूलूस हेत.”
पेशंट तडफडत असताना त्याची तडफड नातेवाईकांना दाखवायची."
तसं नाही सर....असा राग अाणि नका."
"मग तुम्ही  रेट का सांगत होता.
सर सांगावा लागतात.बिलींगच्या वेळेस कीत्येक जणाचे अनेक प्रश्न असतात.
तुम्ही पेंशटच्या नातेवाईकाना ब्लॅकमेल तर करत नाहीत ना?
मुद्दाम असे सच्यूएशन तयार करत नाहीत ना?”
"छे! सर असं काही नाही. हे सरकारी ऑफीस नाही. हे  हॉस्पीटलं आहे."
असं वेठीस नाही धरायला पायजे." मला जरी राग असला तरी मी तो व्यक्त करू शकत नव्हतो..माझ्या मनात आईची तडफड्‍ व त्या माणसाचा तो प्रश्न घोळतचं होता. तो प्रसंग व ती चीडं लगेच विसरणं शक्यं नव्हतं.
तुम्ही अॅडव्हनस भरा.पेंशटची काळजी  नका करू. आमच्या सरांनी अनेकानां मृत्यूच्या दारातून परत आणलं सर.तुम्हीचं तर ते जाणातच अहात. एवढया मोठया हॉस्पीटलंमध्ये नियमांचा अग्रह तर राहणारचं ना सर "
तिचं ते बोलणं. टि.व्ही वरील बातम्या देणा-या ‍ निवीदेकसारखं वाटू लागलं. अगदी बलात्कार ,खूनाच्या बातम्याही कीती ही भावशून्यं चेह-यांनी व स्वरानी देऊ शकतात त्या मी ती चीट्टी घेऊन कॅश कांउटवर गेलो.
              डॉक्टरला आपण लुटारू नाही म्हणू शकत. त्याला देव तरी कसं म्हणता येईल ?  मरण तर अटळचं असत ना ? माणूस जरी डॉक्टर असला तरी ही…….त्याला ही मराव लागतच की.
डाॅक्टर काय करू शकतो? फक्त मरणाच्या वाटा लांबू शकतो.
                                                                  परशुराम सोंडगे
sahitygandha.blogspot. com


            
1हिह
1266गुरुवार, २२ मार्च, २०१८

गुडमाॅनींग पथक


झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर झाला.तिथचं खिळपाटाला पार चिटकून फटफटी उभी केली.उपरण्याने जॅम आळपलेले थोबाडं मोकळ केल. कावरं बावऱ होऊन इकडं तिकडं पाहिलं.कुणाचाच पत्ता नव्हता.कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता.ते पथक तालुक्याहून येणार व्हतं. ते जिपड नाय नि कुणी मेंबर भी नाय .अपुनच आगुदर आलोत याचं त्यांची त्यांनाच बर वाटलं.बाकीची पथकातली मेंबर कमून आलं नसतील ?त्यांनी उगचं मोबाईलचं डबडं तपासून पाहिल.कुणाचा काल बिल आल्ता का काय ?मिस काल बिस काल काय नव्हता .
आयला सीयोची आडरी तरी कुणीचं कसं नसण आलं .ते ग्रामसेंक पण नाय आलांअसल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून...
आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू...
  आता हे बसले तंबाखू  मळीत पण पंचायत बायांची झाली. बायाच्या हागणदारीच रस्ताचं ग्रमपंचायती म्होरून जातो.तिथंचं हे मास्तरं उभं टाकलं.बरं लयं उशीर झाला की मग पंचाईतच व्हती बायांची. झावळात उरकून यावं लागतं.नाहीतर सकाळ सकाळ झॅक होऊन बरीचं गडी ग्रमपंचायती म्होरं थांबत्यात. खंडाची खंडाच असतो.उग उग चकाटया पिटीत बसलेला.  तसल्या ख॓डयातून जमतं असतं व्हयं कुठं बायाला पोरीला टरमेल घेऊन जायला ? पाच सहा महिने झालं असलं. काळयाची सून अशीचं परसाकडं चालली व्हती.ते पवाराचं येडकोंढूळ माग माग गेलं. हासलं. पवारचं घर तसलं डेंजर..
दहा बारा जणांनी मरणाचं चेचलं.केसी  भानगडी झाल्यात.बसलेतं खेटं देत कोर्टात...बाया तरी काय करत्याल ?
जागाच नाही दुसरी. खालतून पाटलाचा अख्खा नंबर आला. तिकडं कुणाला पाय ठेऊन देत नाही . तेवढयात एक दोनजणी आल्या झराझरा पण मास्तरला पाहिलं की रिव्हस गेअरच टाकला. लगेचं पारू आत्याच्या पवळीवर चढून  उडी टाकून पांदीत गेल्या. बायाची पंचाईत झालेली मास्तराच्या  काय लक्षात आलं नाही. बरं असं उघडयावर जाणारचं सारे आज आडवायचं काम व्हतं त्यांचं पण एकटयानं कशाला झंझटीत पडायचं. बाकीचं पथकातले मेंबर आल्यावर बघू... मास्तरं बसलं मोबाईल चिवडीतं. बायाची पंचाईत झाली पण  गडी माणसं कुठं लाजत असतेत व्हयं ? ते आपलं ऐटीत डुलत डुलतं जातं. कुणी टरमेल फिरीत..कुणी बाटली हल्लीत.कुणी सिगारेटीचं धुराडं फुकीत. काही पट्टे मोबाईलचं तुटाणं वाजवीत जातं. काही पट्टे....बॅटरीकी चमकीतच जाईत. इच्चू काटाच्या उजेड भी पाहयजीचं ना ?
कुणी पळतं पळतं जाईत. अर्जंट काॅल असल्यावर...काय करतेल ?   बरं माणूस पाहिलं की मास्तराला रामराम शाम शाम करावचं लागतं. रावू नाना चाला व्हता. ते होता गरबडीत..मास्तरं ...ने ठोकला राम राम...तसाचं गडी वसकला.
मास्तरं...हे टायमं का ? राम राम घालायचा ?" 
मास्तरं नुसतं हासलं. आता काय बोललं ? दोन चार  म्हतारी कोतारी तिथंचं पलीकडं गेली नि तिथंचं जवळचं बसली. आता यांना कसं सांगणार ? बरं ते एकून घेतेत व्हयं ? मास्तरला प्रश्न पडला. तेवढयात एक जण बुटाटं वाजीतचं आलं होतं. टाक ..टाक...काठी हातात. डायरेक्ट बॅटरीक त्याने मास्तराच्या डोळयावरचं चमकीली .मास्तरंने मस्स हात आडवे धरलं पण ते काय खाली घेईना . बरं ते कोण आसणं याचा अंदाज ही काढता येईना... बघता येईना .
"आर, कोणं ? "
"मीचं...?"
"मीचं...? तोहया आयबापानं तोव्हं  नाव नाय ठेवलं का ?"
" मीचं कावळे सर ...?"
" कावळे मास्तरं व्हयं ? इथं कशाला थडपडताय ?
"डियुटीचं तसली आज ?"
"आरं आसली कसली डियुट?"
आता मास्तरांन बळबळचं थोडं हासून घेतलं.
" आज गुडमाॅर्नींग पथक हाय ?"
" आता हे कसलं गुडमार्नींग  ...फिडमारनिंग ...?"
" जे असं हागणदारीला  संडासाला जातेत.  टरमेल...घेऊन येतेल...त्यांना गुलाबाचं फुलं देऊन स्वागत करायचं."
"कुठतं फुलं ?"
" आता येत्याल ना मॅडम फुलं घेऊन..
अंगणवाडीच्या "
" ती आणणारे फुलं.... सुशी आणणारं का फुलं...? तिलात केसात खोसायलाचं पुरायचे नाहीतं."
" तसं नाही तात्या कालचं शाळेतल्या पोरीनी व मॅडम नी पाटी बरं फुलं तोडून ठेवलीत . यात्यालं घेऊन.."
"  येईल तवा येईल. इथं काय करता. जरा बाजूला जावं की .
बायाची कसली पंच्यात झाली. आसं ऐन वाटावरचं थांबल्यावर त्यांनी काय करायचं ?एवढं कळू नाय का  मास्तरं ?.पोराला कसं शिकीता कायनू." आता पार अक्कलचं काढल्यावर...मास्तरचं डोकच सटाकलचं पण काय करता येत? गावात नोकरी करायची असती. काय बोलता येतं ?  मुरली तात्या... सरपंचाच बाप. गडी लयं पावरबाज. टर्रीबाज. आपलीचं टर्र कडीला नेणारं.
" आसलं करायचं कुणी सांगितलं तुम्हाला?"
" सरकारनं... ते आपलं गावं हागणदारी मुक्ती साठी  निवडलं. असं उघडयावरं संडासला बसायचं नाय."
" कुणी आणली रं ही स्कीम येडमाटांनी ?"
" सरपंचानीच निवडलं आसलं गावं.
आता इक्कास करायचा म्हजी ..हागणदारीमुक्ती होणं भी लयं गरजेचं "
" आमच्या शहाण्यानी आणली व्हयं  ही स्कीम ? सा-या स्कीमा  बंद झाल्या की काय  ? ती हागणदारीची स्कीम आणली  ?"
" नाही तात्या,..."
" काय नाय तात्यान काय ? बरं आणली तर आणली मग हागणदारीला काय ? बसावंन तिकड...उग रस्त्याला उभा राहिलावं.
राखणं केल्यावाणी. बायाची लयं पंच्यात होती.
" म्हणूनचं सरकार म्हणतयं संडास बांधा. बाया माणसाचं लयं आवघाड होतं."
" तुमच्या सरकारला लयचं टॅन्शान काय बायाचं. मग दया की म्हणावं बांधून...पाण्याचा हाय का पत्ता ?"
 आता मास्तरनी हेरलं. तात्याच्या तोंडी न लागलेचं बरं. तेवढयात अंगणवाडीच्या मॅडम आल्या. फुलाचं गठूडचं आणलं. बारकाल्या पोरी व्हत्या सोबतं.
" सर, उशीर झालावं का ? कोण सायब यायचे होतं ते आल्लेत का ?"
" नाय आजूक... येतेल ना ते. ते सायब..त्यांना कोण इचारणारं.."आपलं काम सुरू करा. त्या पवळी जवळ थांबा. लेडीजच्या हागणदारीच्या रस्त्यावर...मी इथं थांबतो. " मास्तरांनी  बरीचं फुलं घेतली.
" आवं सर...हे वरचे लोक काय भी काढतात्यात... मला तर लयंच लाज वाटते बया.." उगीचं कारणं नसतानी हासली.
"आता करावं तर लागणचं. " 
      दोघ कामाला लागली पण तवर उजाडत आलं होतं. मास्तरने शिव्या, भिम्या डुलतं डुलतं येत असलेलं पाहिलं. जवळ गेलं आणि हासत हासतच म्हणालं," गुडमाॅर्नींग....नेते." गुलाबचं फुलं शिव्याच्या हातात दिलं. आता शिव्याला काहीचं मेळ नाय .तेव्हं गेला आरबाळून. भिम्यानं मास्तरं बसले हासतं. 
" काय सर? हे काय नवीन?"
" असं उघडयावर जायचं नाय. रस्ते घाण करायचे नाहीत. संडास बांधून घ्यायचं.... " मास्तर पाठ केल्यासारख बडाबडा  करतं राहिलं.  इथं काय चाललयं म्हणून  बाकीचं गडी जमा झाले. कुणी काही भी  बोलतं.कुणी नुसतं हासतं. तेवढयात कुणी आलं की मास्तर....मास्तरं... नुसतं बोंबलतं. तसं मास्तरं फुलं घेऊन माग पळं. मास्तराला पळावं लागं व हसावं ही लागं. बेजारं झालं.
तेवढयात पप्या आला. ते पण गाडीवर 
तसं ते सारंचं ओरडले," मास्तरं...मास्तर...पप्या..पप्या.." मास्तर पळालं. गाडीच्या डिक्कीत  बाटली घेऊन तेवूहं चालला होता. मास्तर नी त्याला फुलं दिलं आणि  गुडमाॅर्नींग घातलं. तसा गडी इरमाटला  पलीकडं तांबा-याच्या वठयावर उषी, निशी नि पुष्पी होत्या.आता पोरी देखतं आपमान म्हणल्यावर... तेव्हं सटकलाचं. राग राग खाली उतरला नि डायरेक्ट मास्तराच्या अंगावर गेला.
" मास्तरं बंद करा नाटकं. काय लावलं."गडी डायरेक्ट  अंगावरच आल्यावर मास्तर तर हॅगच झालं.
"नाय पप्पू. तस नाय.. सरकारी काम.मला तरी काय करयचं?"
" मग नीट निघायचं.गपचिप पोरं शिकायची. जो पर्यंत हयो सरपंच तोवर मी संडास नाय बांधणार...बघू आमची सत्ता आल्यावर..." गडयांनी तावानीच गाडीला किक मारली. आता असं डायरेक्ट  राजकरणावरचं गडी घ सरल्यावर मास्तराची बोलतीचं बंद झाली. 
  आता तिकडं बायाच्या हागणदारीत गम्मच झाली. शब्बा काकूला फुल दिलं की तिन दुसरं मागितलं.
मॅडम अजून एक दया..."
आता ते कशाला ?"
" देते की स्वातीला.तिला लय आवडेत.
आता मॅडमलाच हसाव का रडावं तेच कळाना. शब्बा काकून घेतलं हातातलचं ओढून.
आता मॅडम फुल्लं देत्यात म्हणल्यावर.. सारा पोरीचा घोळकाचं तिथं उलथला. सा-या फुलं ओढू लागल्या. मॅडमला त्या पोरी मोजीत असत्यात व्हयं ?
 ग्रमपंचाईतीचा शिपाई  हळू हळू आला. मुरक्या मुरक्या हासला.
" मास्तरं, सारी गावं  सुधरतील पण हयो आमचा गाव नाय सुधरायचा."
" निल्या दादा असं लयं निगीटीव्हं नाही बोलावं. तुम्हीचं असं म्हणल्यावर..."
" मग सुधरा...बसा येना देत."
मास्तरं गपच झालं. काय करील ?
                       *****
             परशुराम  सोंडगे  पाटोदा  (बीड )
                       9673400928

पाहिलं रे फितूर चांदणे

तुझ चांदण पाऊल या  परशुराम सोंडगे यांच्या प्रेम कविता संग्रहातील काही चारोळया
मनातून पाझरणारा श्रंगार रस
खास अापल्या प्रिये/प्रियासाठी
शेअर करा
परशुराम सोंडगे यांच्याच आवाजात

रविवार, १८ मार्च, २०१८

शाळा ,पोलिस आणि काॅपी वगैरे


दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच ….पूर्वी परीक्षा ही
 एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्ययनं अध्यापनासारखीच साधी
 आणि निंरतर चालणारी प्रक्रीयाआता मात्र या परीक्षानां फार महत्व आले आहे. कारण या परीक्षाचे आधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागलेत्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्याअतिहुशारहूशारमध्यम हुशार,साधारण आणि`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले आहेत..मेरीट नावाची एक फुलपटी तयार करण्यात आली.त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागलेपरीक्षा साधन नाही तर साध्यं झाली.
                   मुलांच्या वर्गीकरणानंतर या व्यवस्थेने पालकाचं  वर्गीकरण करायला सुरू केले.मुलं हुशार ठरली की त्यांचे पालक ही हुशार,जागरूक पालकसभ्य पालक असे मानले जाऊ लागले मुलांच्या पालकाना ही समाज  व बेजबाबदार पालक म्हणूनच ओळखू लागला आहे.हुशार मुलांचे पालक छाती ताणून चालू लागले.यातूनच भंयकर चढाढी सुरू झाल्या.मुलांमुलांतपालकापालकांत कमालीच्या तुलना सुरू झाल्या.परीक्षा या परीक्षा नाहीतर त्या शर्यती झाल्या.मुलं शर्यतीचं घोडे झाले आहेत.शर्यत आली की सा-यानाचं पळण्याची सक्ती झाली.आता शर्यत म्हणलं की जिंकण आलं.शर्यत कोणती ही असो.त्यात जिंकण्यासाठीच्या सा-या मार्गचा अवलंब केला जातो.गैरमार्ग व योग्यंमार्गत्यात चिंटीग सुरू झालीतश्याचं चीटींग या परीक्षा नावच्या शर्यतीत सुरू झाल्यात्यातूनचं कॉपी करणं,पेपर फुटणं,मार्कस वाढवीणं व अनेक प्रकारचे घोटाळे होऊ लागले.त्यात अनेक प्रकारची विविधता आलीकॉपी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागला आहे.अनेक नवनवीन कल्पना आल्या.
                               परीक्षा केंद्रावर नुसती पळापळी सुरू झाली.परीक्षा सेंटरला बाजारचे स्वरूप आले.प्रशासनावर ताण आला आहे.कॉपी बहाद्दर मौत का खेल करू लागले.चीप ,उपचीप, प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक,शिपाई,पोलीस (अर्थात परीक्षा सेंटरवर डीयुटी असणारे ) यांना अनन्यसाधारण महत्व् आलं.या काळात  काही शिक्षक हिरो झालेले आपण सारे पहातच असतोकॉपीला सपोर्ट करणारे शिक्षक विदयार्थी प्रिय शिक्षक,लोकप्रिय शिक्षक झालेले आपण पहातचं आहोत.त्यातले अनेकजण  आदर्श पुरस्कार पटाकावून ही बसले आहेत.अशी सेंटर असणारी शाळानां एक वगेळचं वैभव प्राप्त झालेले याच देही याच डोळी पाहीले आहे.तुम्ही म्हणालं त्यात एवढं काय ?हे तर आम्ही सारखंच पहात आहोतनवीन काय.?कॉप्या तर सारेच करतात.
                        एका परीक्षा केंद्रावर चक्कर टाकण्याचं  योग   आला.आमचा एक परममित्र  त्या सेंटरवर गार्डींगसाठी नेमला होता.त्याच्याकडं माझं एक खाजगी  पण महत्त्वाचं काम होतं.त्या प्रागंणात मी शिरताचं आमच्या गल्लीतलं शामराव काका तिथे भेटले.त्या परिक्षा केंद्रावर लांब एका झूडूपा खाली स्वारी जरा खराब मूडमध्ये उभी होती.त्यांच्या बाजूला काकू पण होत्या.मला पाहिलं की ते पळतचं आले.मी जाग्यावरच उभा राहिलो.आता हे दोघ पण इथं आहेत म्हणाल्यावर माझ्या लक्षात आलं.त्यांच्या स्वीटीचा पेपर दिसतोय.तिचं खरं नावं तृप्ती.लाडाचं नाव स्वीटी.सारी गल्ली तिला स्वीटीचं म्हणते.स्वीटी काका आणि काकूची एकुलती एक लाडाची लेक.ते जवळ आलेउन्हं किर्रं पडलं होतं.मीच आपलं झाडं जवळ करण्याचा प्रयत्न केला.चालत चालत आम्ही झुडूपाखाली गेलोत.तिथं ही अनेक पालक होते.त्यात माता पालकांची ही संख्या लक्षणीय होती.आता माता पालकांना ही आपली जबबादारीची जाणीव झाली आहे.मुलांच्या यशात आई आणि वडीलांचा वाटा मोठा असतो. (तो समान असावा असं माता पालकांना ही वाटणं साहजिकचं आहे.) आपण अनेक यशवंताच्या तोंडून ऐकतचं असतो.मी आपलं त्यांना सहज विचारलं,”कसं काय गेलेत स्वीटी दिदीला पेपर ?
पेपर चांगले गेलेत.कायम ती वर्गात टॉपवरच राहती पण.”
आता काय पण.”
सरळ ,स्भ्य माणसाची काम नाही राहिले आता.”
कसं काय ? तिला तर पेपर चांगले गेलेत ना?”
पेपर चांगले गेलत पण सारं वशिल्याचं खेळ.गरीबाचं कोण वाली.”(गरीब म्हणून त्यांची काही ख्याती नव्हती पण ते तस समजत असावेत.स्वत:ला काय समजावं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न असतो.)
आता यात काय वशिला ? गरीब श्रींमतीचा काय प्रश्नं ?”माझा एक भाबडा प्रश्नं.
असं कसंतुम्ही सारं जणता.कमून गरीबाची थटटा करता ?”
आज इंग्रजीचा पेपरनेमकं आजच झाडून काढलेतन सारी पोरंपोरी.”
रोज नाही.आजच का तपासलं?”
नेमकं तेवढया वेळातचं कसलं तरी जिल्हयाचा मोठा सायेब आला.लयचं कडक जणू तेव्हं.”
मग गेला असेल ना लगीच ?”
“ते थांबत आसतेत व्हयं.जायला काय लगेच गेला पण आता स्वीटी कडं काहीच राहिलं नाहीअपेक्षीत घेतलं.मायक्रो झेराॅक्स ही घेतल्यागेसच गाईड व्हतं ते भी घेतलं.”
असं इतकं कसून नाही तपासयाला पाहिजेसा-याच पोराची पंच्यात झाली आताते तपासायाला ते सर नी मॅडम होत्यानं त्यांनी काय लयंच अभ्यास करून परीक्षा दिली आसलं काय?”
 शेजारी एक नव तरूण उभा होता.त्यांन डायरेक्ट आक्षेप घेतला.मी त्याच्याकडं पाहिलं.त्याचा कॉन्फीडन्स जबरदस्तं होता.तो नेटका होता.रूबाब तर विचिरूच नका.
खरं काय राहिलयं ? पैसं घेतले आसतेल त्यांनीतोंड पाहून,तोंड पाहून  तपासीत होते.” 
तिथचं एक पौढ बसले होते. त्यांनी डायरेक्टं त्या दोघावर आरोपचं केले.
काकात्याचं काय एवढं टॅन्शान घेता?आत सर लोक मदत करतच आसतेत मुलांनाआपल्या सारखचं त्यांना पण मुलांचं टेन्शनं आसतचं की.” सामुहिक कॉपीचे महायज्ञ मी माझ्या डोळयानी पाहीलं होते. त्यामुळे मला अंदाज होतामला आमच्या काकाचं टेन्शनं कमी करायचं होतं.
कसलं कायसारं वशील्यानं चालतं आतां.आपल्या साळा असल्यासा-या पैसं घेऊनचं ॲडमीशन देतातपासींग सह गुत्तचं घेतेत.त्याचं सारं लक्ष त्याचं पोराकडं असतंंआपली पोरं तशीचं राहणारं.”
पासींग पुरत ते सा-यालाच सांगणारेत असं आमचं शेळके सर म्हणत होतेतिथचं एक सभ्यं व शांत पालकांनी त्याचं तोंड उचकटलं.
ते तर करतेलचं पण दयायचं थोडं मटरेल बाहेरून भी.” मी जास्तीचा सल्ला दिला.
कसं दया?”
खिडकीतून दयायचं नाय.. तर सरळ आत जाऊन दयायचं.”
आत…? आम्हला कोण जाऊन देतेतत्याला भी वशिला पायजे.तेव्हं परदश्या गेला की सरळ आत मोठया सायबावाणी  डुलत डुलत…. सारं देउन आला पोराला.त्या तिकडं बसलाय आता आईस्क्रीम खात.”
असं नाय करायला पायजे.जाऊ दयायचं तर सा-यालाच जाऊ दयालया पायजेहयो अन्याय  झाला.” मी आपलं सहज हळहळ व्यक्तं केली.दुसरं मी काय करू शकत होतो?
आता त्याचं दारूचं दुकानं… हप्तेबिप्ते चालू असतेत.ओळखी पाळखी आसत्याततुम्ही काय दोन नंबर करता का?"
इतका वेळ शांत बसलेल्या काकू बोलल्या.माझ्या समोरचं एका खिडकीवर झुंबड उडली होती.माकडासारखी माणसं गजाला लोंबकळत होती.
जाऊ दया.आपलं असं खिडकीतून दयायाचं.”
कसं ? अहो आमच्या स्वीटीचा नंबर वरच्या मजल्यावर आलायनेमका मधल्या रांगेत.”
त्या प्राचार्याची नात परीक्षा देतीयंत्यामुळे खालीवरून नंबर दयायला सूरू केलं.सारं त्यांच्याचं हातात.” एक खरमरीत चेह-याचा पालक आपल्या टकलवरला घाम पुसतं म्हणाला.
एवढचं नाय.तिला अर्धा तास जादा वेळ देतेत असं ऐकल मी.काही खरं नाय. सारं मॅनेज रावआपल्यासाख्याचं फक्तं हालं.”
लयचं पर्सनॅलीटी चालली मग पत्रकार लोंकाना सांगायला पायजे.”
ते कशाचं काय करतेतच्या पाणी दिलं की झालंबर त्यांना कोण आडवीतते सरळ जातेत येतेतजवळच्या जवळच्याला देते कॉप्या.त्यांच भी कुणी तरी आसतचं की.”
जाउ दयालयं कॉप्या करून तरी काय ओरीजनल ते ओरीजनलच असत.”
असं नका म्हणून….. पोरांना मार्क कमी पडलं की त्यांच काॅन्फीडन्स कमी होतं.काहीचं येत नसून ही मार्क चांगली पडलं की त्यांचा उगचं पाऊर वाढतोत्यांची नुसती शायनींगच पाहत बसावं लागत.” कोणत्याचं उत्तरांन त्याचं समाधान होत नाही हे पाहून मी आपलं समजुतीच्या स्वरात म्हणलं,”आता काय करावं?दयायचं सोडूनआपलं अभ्यासावर लक्ष दयायच.” माणूस मदत नाही करू शकला की फुकटचा उपदेश करायला सुरू करतो.
ते तर हायचं हो.दोन दोन क्लास लावलेत मी तर.पण त्यांच भी फिक्सनचं आसतंफालतू पोरीचा लाड करतेत ते.मोठयाच्या लेकरांच्या पुढं पुढं करतेत ते.”
ज्याला जे जमतं ते करतकाय करावं?” मी खरतर हतबल झालो होतो.
पण अन्याय नाय करायला पायजे.समोर काय चाललं पगाहे पोरग वर चढून दोनचं प्रश्नं घेऊन गेलं होत.खालूनच काठीन मारलं.”
हयो वरच्या मजल्यावर कसा गेला?”
गेला खिडकीवर चढून.लय चपळ पण मरणाचे रेमाटलं.सारं अंग मऊ केलयं. म्हणालाय गेलं तर माझ्यावरच धावून आलं ते शेपूर्ड….” एक चुणचुणीत गोरं गोमटं पोरग माझ्या समोर उभा केलं.त्याचा चेहरा लाल झाला होता. चांगलं रेखाटलं  असावं त्याचा चेहराचं सांगत होता.
हा कोणयं ?”
दुसरं  कोणहीच्या भावाचं पोरगखास परीक्षेसाठी बोलावून घेतलाय.”मी पाहिलंअक्षरशत्याच्या पाठीवर्‍ आणि पिंढ-यावर जबरदसत मार  होता.वळ उठले होते.तो बिचारा सारं अंग दाखवत होता.मला त्या कूर पोलीस कर्मचा-याचा भंयकर राग आला.
असं कसं मारता गुरावाणी. त्याचं वय नव्हतं.हो ,एवढा मार खायचं.आत नाही जाऊ दयायचं तर नाही जाऊ दयायचं पण सा-यानाचं नाही जाऊ दिलं पायजे.असा भेदभाव काय कामाचा?" काकीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं.तो मासूम चेहरा ओशाळला.त्यांच्या समोर इतकं मारलं तरी आमचे काका काहीच करू शकत नव्हते.ज्याची चलायची त्याची चलती
          तेवढयात टोल वाजला."बघा, काही तरी कराआता एकचं तास राहिलायतुमच्या जरा ओळखी आसत्यात."
त्यांची उलाघाल वाढली होती.मी काही तरी करू शकतो असं त्यांना वाटत होतं.
"बघतो काही जमत का ?"असं म्हणून मी तिथून सटकालो.माझी मीच सुटका करून घेतली.सा-या खिडक्याला माणसं लोंबकळत होती.पोलिस मागे पळत होते. शिटया वाजत होत्याआत अनेक सर लोक विदयार्थ्याना मदत करण्यात गर्क होतेमी दोनचं मिनीटं चाललो असेल.तेवढययात चार पाच पोरानी एक पोलीस कर्मचा-यावरचं आक्रमण केलतसे सारेच धावले.सारी गर्दीच गर्दी झाली.त्या गर्दीतून जागा करीत मी रोड पकडला.
                आपण कॉपीमुक्तीसाठी काय करू शकतो ? या विचारतच मी गाडीला किक मारली.अशी ही व्यथाअशी ही कथा…!!
                                               परशुराम सोंडगेपाटोदा
                                                         

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...