सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

सावर रे..!


ती उठली.खिडकी जवळ आली.पडदा मागे सारला.हळूच बाहेर ‍ डोकावली.बाहेर सारं सारं कसं शांत शांत होत.घरासमोरचा रस्ता.निपचीत पडलेल्या अजगरासारखा वाटला तिला.अकाशाचा विशाल कलश कलंडून चांदण जिथं तिथं विखूरल होतं. झांडाच्यापानापानांत.फुलाफुलांत.सृष्टीच्याकणाकणात.गच्चीवच्या रातराणीकडं तिचं लक्ष गेलं.ती तर चांदण्यात न्हाहूनच गेली होती.हलकसं वारं आलं. ते पहाटं वारचं.गारा अगांस झोंबला. तसं थोडसं तीनं अंग चोरलं.तिचं मोकळे केसं नकळतचं भुरं भूरले.भुरभूरते केस तिनं सावरले. तशी इतकीसी गरज नव्हती पण तिची ती स्टाईलच होती. हटकेच स्टाईल.तिची हीच तर स्टाईल तर अनेकांना पागल करून गेली होती. पागलच करत होती. झोंबत्या गा-यामुळे तिनं नकळत अंग चोरलं.शहारलेलं तिचंच अंग न्याहळणाचा मोह तिला आवरता आला नाही.आठवणीच असंख्यं फुलं तिला लगडून गेली.

आज ती झोपूच शकली नव्हती. दुपारचा प्रसंग तिला जसाच तसाच आठवत गेला.आठवला कसला? ते चलचित्र नुसतं डोळया समोरून सरकत होतं. पश्चतापाच्या सूक्ष्मं सुईनं काळीज नुसतं टोकरलं जातं होत.समीरची तरी काय चूक होती? मुळात तसा नाहीच तो. पण आज नको तेच झालं.त्यानं ओढलं की तिचं त्याच्या मिठठीत गेली हेच तिला ठरवता आलं नव्हतं. मुळात दोघांत अंतरच कीती होतं?

खचाखच भरलेल्या लिप्टंमध्ये नको तेवढं स्वत:ला अंकुचित करावं लागलं होतं.अनेक पुरूषी नजरा तिच्या अंगभर रेंगाळतच होत्या.कीती प्रयत्न केले तरी स्पर्श टाळता येत नव्हते.काही मुददाम.काही नकळत.स्प्रेचे उग्र दर्प.घाणरेडे श्वास.. सार सार किळसंवाण होतं.अखेर समीरच पुढं आला. त्यानं त्याच्या हाताचं कडं ‍ तीच्याभेवती केलं.सुरक्षीत अंतर ठेऊन… आपण सुरक्षीत अंरावरच अहोत ना अशी त्यानं खात्री ही केली. त्यानं ओझरतंतिच्या डोळयात पाहीलं.त्याला त्यानं केलेली ही कृतीतिला आवडली की नाही हे पाहयचं असेल. नजरानजर. तीनं सूक्ष्म असून त्याला ओके रीपोर्ट ही दीला.तो ही हासला नि शेजारीचं उभा असलेल्या एका टकल्या काककडे घृणास्पद पाहीलं.

तिस-याच मजल्यावर अख्खी लिप्टं रिकामी झाली.एकांत असा दुश्मन झाला.ते क्षणचं दुदैवी.श्री गेलेला दोन वर्ष झाली असतील तेव्हा पासून पुरूषस्पर्शच नाही तिच्या देहाला. समीरनं तर चक्क मिठीत ओढलं. भानच नाही उरलं.समीर उधणून आला होता. नुसता समीरचनाही तीपण बेभान झाली होती.त्या दोन्ही शरीराच्या व मनाच्या उसळणा-या लाटांना ते दोन्हीचं देह किनारे झाले होते.

ते लिप्टच्या बाहेर आले तर शामलं हासत हासत समोर उभी होती.ते हासणं कीती निरागसं होतं. शाळकरी मुलीसारखं.तिचं अंग थरथरतं होतं.घामेजून गेलं होत. चुरगाळेलेला कुर्ता… ओढणी सावरत सावरत ती बाहेर आली.शामलनं हातातल्या बॅग्जस घेतल्या. केसं तसेच विस्कटलेले… ते ही सावरले. ओठ..? रूमालानं तिनं ओठ पुन्हा पुसून घेतले.पोटात मोठा भीतीचा गोळा उठला होता. जे झालं होतं ते शामल कळणं श्क्य नवहतं पण त्या घटनेच्या खुणा…देहावरल्या.. मनावरल्या थोडयाचं लपवून ठेवता येतात? तिला तितकसं जमलं ही नाही. आपण सारं हे सावरू असं तिला ही वाटतच नव्हतं. कॉन्फीडन्सं….? ती सारा गमावून बसली होती.

“अग,प्राजू काय झालयं तुला? हा काय अवतार करून बसलीस?”

“काय ना ग गर्दी. जीव कसा गुदमरून गेला सारा.” नजरेला नजर देऊन बोलू नाही शकली.ते शक्यं तरी होत का तिला?

“काय खूपच चेपरा झाल होता का?”

“ हो ना ग. आता कसं सांगू तुला?”

“आता काय सांगतेस. मला काय नवीन हे. पुरूष सारे सारखेच.

“ तस काही नाही ग.”

“काय तसं नाही. ते बघ.” प्राजूच्या टॉपच्या तुटलेल्या बटनाकडं लक्ष वेधत ती बोलली. हा प्राजक्तला शॉक होता. ती उडालीच. खरच… टॉपच बटन तुटलं होतं.ती फार ओशाळून गेली.

“ तुझ्याशी कुणी..? समीर कुठं होता? समीर…!” शामलने आवाज दिला. प्राजक्तानं तिचं तोंडच आवळलं. समीर कुठं लांब नव्हता. तो शूजचे लेस नीटं बांधत होता.

“शू…!! “ त्याला हे नकोस सांगूस.असा इशारा केला.

“अग पण? समीर होताना तुझ्या बरोबर..”

“होता की… अंतर होतं दोघात.त्याला नाही सांगू शकले मी.आता पण त्याला नाही माहीत करायचं हे. शामलं प्लीज..”

“अग,समीर कुणी परका का?” शामलला आता कसं समजावं हेचं तिला कळतं नव्हतं. समीर तिचा नवरा असलातरी प्राजक्ता साठी तो परपुरूषचं ना? आता परपुरूषाला कसं सांगणारं हे… समीर पाठमोरा होऊन सारं ऐकत होता. प्राजूचं त्याची नजरा नजर ही झाली एक दोनदा. सावर सारं.त्यानं हासून तिला सीग्नलं ही ‍ दिला होता. समीरचं हासणं कीती लोभसं आसलं तरी तिला ते आवडलं नाही.प्राजक्ताची मात्र धमछाक झाली होती. मनातलं सारं सारं जिच्या जवळ ती उलघडून दाखवायची. तीच्या पासून ती काहीच लपवत नव्हती. अगदी दहावीत असतानी मॅथ्सच्या सावे सरांनी केलेली लगड तिनं मममीला सांगीतलं नव्हतं ते शामल सांगीतलं होत.आज ती शामल सांगू शकत नव्हती. ती घटना कुणालाच सांगू शकत नव्हती.एवढचं काय ? तिला काहीच बोलायचं सुचत नव्हतं.

शामल,पाणी आहे का बॉटलमध्ये? मला फारचं थकल्यासारखं वाटतं.

“तू ठीकेस ना? समीर या बॅग्ज घे बघू.” शामलनं तिच्या खांदयावर हात ठेवला.

“शामल,प्लीज समीरला हे …. “ ती फारचं इमोशनल झाली होती.ती खरं तर फारचं घाबरली होती.

“बरं नाही सांगत. तू पहीली रिलॅक्स हो. तिच्या पाठीवर हात ठेवत त्या चालू लागल्या. समीरचं दोन्ही हात बॅगा संभाळण्यात गुंतले होते. आता त्यानं ही गप्प्‍ बसणं योग्य नव्हतं. त्याला बोलणं भाग पडलं.

“काय प्राजूला बरं नाही का?” समीरनं अगोदर शामलच्या डोळयात पाहीलं.नंतर प्राजक्ताच्या…

“काही नाही रे. गर्दीमुळे गुदमरल्यासारखं झालं थोडसं.”

“अरे, थोडसं नाही. बघ कशी घाबरलीय ती. तू कुठं होतास?”

“घाबरली ? छे.ती तर काहीच बोलली नाही.”

“हे बावळटं, तुला कशी सांगेल ती?”

“ तसं नाही. सांगीतल्या शिवाय कसं कळेल?

“ बस्सं गप. तुझं लक्षचं नसतं.सारे पुरूष मेले सारखेच. नुसता दुस-याच्या बायाची थोबाडं पहात बसतात.

“शामलं,काही तरीच काय ग? समीर तसा नाही.” समीरची प्राजक्तानं पाठराखण केली. त्याचं वेळेचे समीरचे भाव काय असतील हे पण ओझरंत पाहीलं.

“उग म्हणलं ग. थोडी गम्मतं.तसं नाही माझं पिल्लू.फार सज्जनं.तिघे ही हासले. अगदी खळखळून हासले. मनातला स्ट्रेस कमी करायाला हे पुरेसं होत. प्राजक्ता समोर असताना समीर्‍ आणि शामलं असं एवढं तेवढं रोंमाटिक व्हायचे.चहा घेतल्यानंतर ते थेट घरी आले. गाडीत फारसं कुणी बोललं नाही. प्राजक्ताला तिच्या घरी ड्राप केल. गाडीतून उतरतानी एका हातात बॅग पेलतं बाय केलं. चेह-यावर हासू उमटवीलं.समीर व शामल दोघं ही गेले असले तरी शामलला आपलाव समीरचा काही डाऊट तर आला नसेल ना?

समीर परपुरूषच ना? शामलशी प्रतीतारणा? कीती विश्वास तिचा आपल्यावर.श्री गेल्यानंतर जीवनात एक कायमचीच पोकळी निर्माण झाली. एककीपण वाटयाला आलं. !नवरा नसलेली स्त्री अशी म्हणून अनेक अवेलना झाली. शामलंन कायम सोबत राहीली.तिचा नव-यासह ती आपल्याला मदत करत राहीली. समीरला आपल्यापासून दूर ठेवलं नाही. तसा कधी प्रयत्न ही केला नाही.आपण अश्या वागलो.तिचा नवराचं आपणं….आपलं थोबाडं सणासणा सडकून घ्यावं असं वाटलं तिला पण तसं नाही केलं तिनं. खेदाची कात्री तीचं मन कातरू लागलं. ती रात्र भर तळमळत राहीली

सा-या आठवणी झटकल्या. दारं उघडून ती बाहेर आली.फुलून आलेल्या अकाशाकडं ती हल्ली पहात नाही.श्री गेल्या पासून तर मुळीचं नाही.माणूस मेलं की वर अकाशात जाऊन तारा बनतं. अशी आजीनं सगितलेली गोष्टं उगचं तिला आठवते.अकाशातून श्री पहात तर नसेल ना? असं तिला वाटतं. कधी कधी तसा भासचं होतो.तिन आता ही हळूचं वर पाहीलं.ती जरा संकोचली.तिला वाटलं श्री नक्की वरून आपल्याला पहात असेल. अकाशात लुकलुकणा-या ता-यात नक्की कोणता तारा श्री असेल? तिनं अंदाज काढण्याचा प्रयत्नं केला.त्याला कळलं असेल का? आजं आपण समीरच्या… पुन्हा एकदा तीनं ओठावरून जीभ फीरवली. आपलं ओठं.. आपल शरीर बाटल्याचं तिला फीलींग झालं होतं. आता कसं स्वत:ला स्वच्छं करायचं? ती पुन्हा पुन्हा अंग झटकू लागली. तो घाणरेडा स्पर्श तिला आता झटकून टाकयचा.ओठावर पुन्हा पुन्हा जीभ फिरू लागली.पगली कुठली? स्पर्श शरीरावर नाहीतर मनात खोल रूतून बसलेले असतात.ते कसं झटकणारं? स्पर्श असे आत खोल खोल रूतत नसतं गेले तर श्रीच्या सपर्शाची नी समीरच्या स्पर्शची तिला तुलना कशी करता आली असती.लिप्टंमध्ये अंगाला खेटलेल्या त्या टकल्याचा स्पर्श. बाबाच्या मांडीवर खेळतानी होणरा स्पर्श.. सावे सरांचा तो घाणरेडा ..स्पर्श.. श्री सोबतचा हिल्या रात्रीचा स्पर्श… आजचा समीरचं सर्प्श.. सारेच पुरुषी सपर्श तिला आठवू लागले.त्यांची ती तुलना करू लागली. आठवांच्या झोळीत ती नुसती झ्लत राहीली.

तिच्या हातातला मोबाईल व्हॅयब्रेट झाला. तो सांयलेटमोडवर ठेवला होता. तब्ब्लं पाच मीसडं कॉल. सारेच समीरचे होते. इतक्या रात्री.तो फोन रीसीव्हं करावं का नाही. ती नुसती पहात राहीली. पहाटेच्या तीन वाज होत्या.इरादा तर नक्कीच चांगला असू शकत नव्हता. पुन्हा कॉल आला.तिनं छातीवर दगड ठेऊन तो कॉल रीस्व्हं केला.

“हॅलो,”

“प्राजू,झोप मोडली?”

“नाही. जागीच होते.डोळयाला डोळा नाही.आता तीन वाजताहेत.”

“आता तीन वाजताहेत.नी मी एक वाजल्या पासून ट्राय करतो.”

“तू का फोन करतोस सारखे सारखे?”

“तू रिसीव्हंच नाही केलेस.”

“अरे,तुला कळत कसं नाही? रात्रीचा एक ही का फोन करायची वेळ का?”

“प्राजू ,तुझा फोन आला होता.”

“नाही मी फक्त ट्राय केला होता.”

“एवढया रात्री ट्राय. पण का?”

“समीर, शामल कुठं ?”

“झोपलीय ती.मी गॅलरीत.”

“कशी ती? तिला कळलं तर नाही ना?”

“सोडं यारं. त्याचं काय एवढं टेन्शनं घेतेस?”

“पण चुकलोच कारे आपण.”

“झालं ते झालं. आता काय करणार?”

“पण मी तसली नाही रे.”

“प्राजू, काय बोलतेस हे. तुला कोण म्हणलं तसं.”

“पण समीर काय करायचं आता?”

“कशाचं?”

“शामलला हे कळलं तरं ?”

“नाही कळतं तिला. तू स्वत:ला सावरं.”

“कसं सावरू. फार भीती वाटतेय रे मला.असं स्वत:ला गिल्टी करुन घेऊ नकोस. अपराधी समजू नकोस. खरचं माझं प्रेम तुझ्यावर.”

“तुझं प्रेम माझ्यावर ? प्लीज समीर तू असं काही करणार नाहीस.”

“वेडीस का तू ? आपणं एकत्र आलो ते काय होतं?”

“ती आपली चूक होती. फक्त चूक होती.”

“ती चूक असेल ही पण माझ्या विषयी तुला जे वाटतं ते काय?”

“कुठं काय वाटतयं?”

“आपण ते जगासमोर लपवू शकतो.ते खूडून नाही टाकता येत?प्राजू नाही पुसता येतं. अशी आपणचं आपली प्र्‍तीतारण का करायची?”

“समीर कसं सांगू तुला. प्लीज.जे झालं ते ‍ विसरं सारं.मी नाही माझं मलाच माफ करू शकत.प्लीज तू फोन ठेव आता.”

ती गहीवरून आली होती रडत होती. डोळयातल्या आसवांना तीनंवाट मोकळी केली. हुदंका आवरला.

समीर नुसता प्राजू.. प्राजू करत राहीला. तीनं फोन कट केला होता.

समीर पुन्हा पुन्हा कॉल करत राहीला. ती री सीव्हं करणारं नव्हती. तिला पुन्हा तो प्रसंग आठवला. श्वासात श्वासात सिळताना समीर सारखं आय लव्हं यू प्राजू. प्राजू… म्हणत होता. त्यानं अस एकेरी बोलेलं आवडतं का आपल्याला श्री म्हणायचा. शामल म्हणायची. शामलंम्हणता म्हणता समीर म्हणायाला लागला. त्यानं तसं म्हणवं असं आपल्याला ही वाटायाला लागलं. आपण समीर सोबत लि प्टं मध्ये एकत्र आलो ती वासना होती का प्रेम. समीर समीर.. म्हणतं त्याच्या ओठात ओठ आपण दिले.त्याला रोखू शकलो नाहीत. समीर नंतर कुणी पुरूष आपल्याला आवडतो का? तीनं स्वत:चा मनाचं तळं ढवळून बधीतला.वासनेला कुणी पुरूषी शरीर चाललं आसतं. ते आवडायला लागलं आसतं. समीरच आवडू लागलाय. त्या आवडण्याला प्रेम कसं म्हणायचं.शामलचं अतोनात प्रेम समीरवर चिं काय?तिचा नवरा आपण बळकायचा की काय? श्री आज आपल्याला आवडतोच की. त्याच्या आठवणी पुसून कश्या आकायच्या. समीरच शामलवर प्रेम नसेल काय? शामलवर त्याचं प्रेम आहेत तर तो आपल्यावर कसं प्रेम करू शकतो? मनात असंख्य प्रश्नांची बुडबुडे उठू लागले.ते नष्टं होत.तेवढयात फोन वाजला. तो मॅसेज होता.

Come fast for morning walk.

समोर पहाती तर तो समोरच उभा होता.तिच्या अंगाचा थरकाप झाला.ती अगोदर घरात पळाली.ती लाजली नव्हती. घाबरली होती. असं रात्रीच पर पुरूषा बरोबर कसं जायचं? नाही गेले तर?

समोर पहाती तर समीर उभाच होता.तिच्या अंगाचा थरकाप उडाला.ती अगोदर घरात पळाली.ती लाजली नव्हती.ती प्रचंड घाबरली होती.असं रात्रीच परपुरूषा बरोबर कसं जायचं? नाही गेले तर? तो गाडीचा हॉर्न वाजवील.किंवा तडकं पाय-या चढून ही वर येईल. आज त्याला नककी माहीत आपण एकटयाचं घरात अहोत. कुणी त्याला येताना पाहीलं तर? उग बोभाटा व्हायचा. पहाटं बरीचसंच माणसं जागी झालेली असतात. असं दारात त्याला कुणी पाहीलं तर ? आपली चूक झाली. पुरूष वेडे होतात स्त्रीयासांठी ते खोटं थोडचं असतं?
समीरनं इतकं वेडं व्हावं असं काय आपल्यात?त्याची पत्नी शामलं तर फारचं सुंदर की? आपण खरचं फार सुंदर असू का? असं थोडचं असतं की पुरूषांना फक्त सुंदरच स्त्रीया आवडतात. त्यांना हवं असतं एक फक्तं स्त्रीच शरीर. मादकता ही स्फोटक असेल का? पुरूषोत्वाच्या बॉम्बला पेटवणारी. स्त्रीया सुंदर का प्रंयत्नं करतात का सेक्सी दिसण्यासाठी?मोकळे केस तसेच राहू दिले पदर खुशाल खाली पडून दिला. आसशसमोर उभी राहीली.तिला आपण सुंदर दिसतो की सेक्सी हे ठरवायचं होतं?
त्याचा कॉल पुन्हा आला.आता त्याला स्पष्टचं बोलावं.तो सोकला तर चैन नाही पडू देणारं. आता फोन वर ही बोलणं ही योग्य नव्हत. माणसं जागी झाली होती .तिनं फोन उचलला.
“कितीवेळ ? येतेस ना?”
“तू का आलास इथं? मी काय तुला अठरा वर्षाची तरूणी वाटले का? तुझ्या हातात हात घालून फिरायाला यायला.”
“आता नाही बाहेर आलीस तर घरात काय करणारेस तू.झोपू शकशील?”
“झोप तर येत नाही रे.डोकं नुसतं हँग झालं.”
“बाहेर यायची भीती वाटतेय का?.”
“तुझ्या सोबत कशी बाहेर येऊ. आपण का नवरा बायको अहोत का?”
“आता बाहेर यायला नवरा बायकोचं असावं लागत का? श्री नि तुम्ही कधी बाहेर गेला होतात पहाटे पहाटे?”
“अनेकदा.पहाटेच चांदणं वीक पाँईट होता श्रीचा. फिरायचो आम्ही. भटकायचो पण श्री नवरा होता माझा.”
“तुला झोप नाही. मला झोप नाही.तू एकटीचं घरात. शामलं पण भांडली रात्री?
“क्का…य शामलं भांडली?” तिचं ते काय पाचं सेंकदाचं तरी असेल.
“पण का? मगा बोलतानी तिनं ऐकलं का?”
“नाही ग.ती कसलं ऐकती?”
“मग का भांडणं झालं तुमचं?”
“असचं. तू आणि श्री कधी भांडला नाहीत?”
“नवरा बायकोच भांडणं होतातच.भांडयचो आम्ही पण तू असं का विचारतो?”
“रात्रीचं पण भांडायचात?”
“कधी कधी. पण आमच्या भांडणाचा नि तुमच्या भांडणाचा काय संबध?”
“संगध नाही ग पण का भांडायचात?”
“असं का बोलतोस तू? त्याचं काय एक कारणं असतं का? शामलं का भांडली. तू सांगत नाहीस पण तिला हे आपलं कळालं असणारं”
“सांगतो,बाहेर येतेस ना? म्हातारे हटकायाला लागलीत मला. एवढं पहाटं हा कोण आपल्या कॉलनीत? चोर समजून देतील चोप मला.”
“कशाला फोनवर बोलतोस रस्त्याला उभा राहून?”
“मग घरात येऊ?”
“नको नको…. मी येते बाहेर.लवकर परत यायचं हं. उजेड पडायच्या आत.”असं म्हणाली खर पण तिला बाहेर जाऊ नव्हतं वाटतं. पुन्हा आपण भंयकर चूक करत अहोत असं वाटतं होतं.चर्चाच चर्चा होईल.शेजाराचा देसाई काकूचा रितेश लवकरचं उठतो.पहाटं पहाटचं गच्चीवर असतो. चांगलं ऊन्ह पडतोस्वर गच्चीवरच असतो.तो सारखा टक लावून पहात असतो. सकाळ सकाळ अवघडल्यासारखं होतं. ते कुणाला सांगता येत नाही. त्याचं असं लईनं मारणं मामांजीला पण लक्षात येत नाही. ते खुशाल त्याच्या सोबत गप्पा मारत बसतात.त्याला तर तेवढंच पाहीजे. त्याला ही माहीत आज मामाजी इथं नाहीत.त्यानं जर समीरला पाहिल तर? तो सा-या कॉलनीत करणार.समीर सोबत बाहेर जायचं?त्यानं पुन्हा मर्यादा सोडली तर? तो पुरूषचं! नाही,आपण स्वत:ला आवरायचं. खरंच समीरच आपलं असं कोणतं नातं? एकदमच झुगारून का नाही देऊ शकत आपण त्याला ?तिला पुन्हा तो प्रसंग आठवला. संवेदनाच्या गोड लहरी अंग भर पांगत गेल्या.मनाला पापुद्रे येत असतील काय? मनात आत खोल काही तरी झुळंझुळतं होतं. समीरचं सारचं वागणं तिला आवडत होतं. त्याला नाकारावं असं खरचं वाटतं नव्हतं.त्यावर मात्र भीतीचा पापुद्रा आला असावा.
ती उठली.तिनं आरश्यात पाहीलं स्वत:ला.गर्द जांभळया रंगाची साडी. थोडसं पांढरंट निळसर ब्लॉऊज.मोकळं सोडलले केस.आता मात्र तिची खात्री झाली होती की आपण फक्तं सुंदरच नाहीतर सेक्सी पण दिसतं असू. स्त्रीची मोहकता पुरूषांना आकर्षक करत असेल व मादकता पागल करत असेल? समीर आपल्यामुळे पागल तर होणार नाही ना? पागलं झाला की राहिला.तो चक्क घरासमोर आलाय आज.उदया डायरेक्टं…? शामल पेक्षा ही आपण समीरला आवडत असूत काय? ती काय कमी सुंदर? अनेक पोर पागल झाली होती तिच्यासठी. आपल्यासाठी..? शरयु,निखील,सावे सर,टपरीवाला बंटी,तोविकास पाटील… भली माठी यादीचंतिला आठवायाला लागली पण पुन्हा समीरचा मिस कॉल आला. भूतकाळाच्या झुलत्या फांदीवरून खाली पडली.तो इशारा होता. तिनं लवकर येण्याचा.
तिनं हळूचं गेट बंद केल. वर अकाशाकडं पाहीलं. श्रीचा तारा आपल्याकडं तर बघत नसेल ना? तिच मन संकोचल्यासारखं झालं.खेदाची बारीक सई खोल काळजात बोचली. ती रस्त्याला लागली. एक अनोखी ओढ ही मनांत निर्माण झाली होती.मनाच्या एका पृष्ठभावर भीतीच्या ही लाटा उसळत होत्या.रस्त्याच्या कडेचा प्राजक्त जागजागी सांडला होता.त्याचा मंदसा गंध मन मोहून टाकत होता. वारं? पहाटेचं वारं होतं ते. ते अधिक आल्हादायक वाटतं होतं. आपण घराच्या बाहेर पडलेलो कुणी पहात तर नाही ना?तिची भिरभीरती नजर त्याचा अंदाज घेत होती. एक चांगलं झालं. डायरेक्टं कुणी तिच्या पुढयात मात्र नाही आलं.तिला फार चालावस लागलं नाही.समीर गाडी वळून उभाचं होता.
ती गाडीत बसली.पदर नीट केला.गाडी सुरू झाली.फक्तं दोन तीन वेळा नजरा नजर.त्यां नंतर ही भीषण शांतता. अश्या वेळी शांतता सहन होत नाही. दोंघाची घालमेल सुरू झाली.तिनं काच खाली केली. ते अल्हाददायक वारं अंगावर घेऊ लागली. वारं तिचं मोकळे केसं उडू लागले.ती सावरू लागली. समीरला तिची निशब्दता सहन होत नव्हती परंतु तो पाहू शकत होता तिला. त्याची नजर तिच्यावरून हालत नव्हती.जाभळी गर्द साडी, गोर अंग.काळे भोर केस स्त्रीच्या दिसण्यात रंगसंगतीला काही महत्त्व असेल काय? प्राजक्ता गोरी.. पांढरी. त्यामुळे ती या साडी अकि सुंदरदिसतं असेल का? या साडीत शामलं कशी दिसेल? नटलेल्या, सजलेल्या शामलंच चित्रच त्याच्या डोळयासमोर उभं राहीलं. काही क्षणचं. त्याला प्राजक्ताला पाहयचं होतं. तो हे गाडीच्या आरश्यातून ही करू शकत होता. प्राजक्ताचे नितळं टपोर डोळे. सुडौलं बांधा.किती रेखीव आणि आखीव दिसतं होती ती. छातीचे उभार.हे अस्सलं लावण्यं आपल्या हाती आलं. हे समाधानाचा रस त्याच्या कणाकणात पसरतं चालला होता.
“ असं का पहातोस?” तों वेधाळला नि तिनं गालाचा चंबू केला.कपाळावर छान आटया पाडल्या.एवढं केल्यामुळे तिच्या गालावर छानशी खळी पडली होती.
“छान दिसतेयस या साडीत.”
“छान की सेक्सी?” तिचा हा प्रश्नं त्याला अनपेक्षीतचं होता. आता काय बोलणारं? त्याला ही नक्की ठरवता नव्हतं आलं की ती सुंदर की सेक्सी?
“ते नाही माहीत पण आज जबरदस्त दिसतेस. एकदम हटके.” तिनं फक्तं ‘हूँ’ केलं. लटकाचं राग तिच्या चेह-यावर पांगला.
“ काही बोलणारं नाहीसं का?”
“ काय बोलू? मला नाही हे आवडलं.”
“काय?”
“असं रात्रीचं डायरेक्टं घरी येणं.”
“सॉरी. पण तू नाही म्हणायचस ना ?”
“ कसं नाही म्हणारं? तू डायरेक्टं घरीचं आला असताच तर ? तुला माहीत नाही आमच्या कॉलनीत कसले विचित्र लोक राहतात.”
“काय करतील? अशी काय चूक करतेस तू?”
“ चर्चा.”
“ बोंबलू दे.त्यानं काय फरक पडणारं?”
“ समीर, मी एक विधवा.”
“काय लावलं तू. मी विधवा विधवा.. . विधवा का माणसं नसतात?”
“पण तू का करतोस असं? हे बध काल जे झालं ते झालं. आता हे सारं मला नाही पेलवाणारं.”
“असं इमोशनल नक्कू होऊस. खरचं काल जे आपल्या दोघांत झालं. खरचं ते चांगलं नव्हतं.शपथ माझा तसा काही प्लॅनं नव्हता. अजीबात मी काही ठरवल न्वहतं.”
“आता पुन्हा ती चूक नाही करायची मला.” दोघांतलं वातावरण गरम झालं होतं. गारं वारं वाहत असलं तरी त्यांना गुदमरल्यासारखं वाटतं होतं. गाडी लावलीनं ते चालत गेले. ते इतके लांबं गेले होते. जवळ जवळ कुणी माणसं त्यांना भेटत नव्हती. ते चालत होत पण दोघांत सुरक्षीत अंतर होतं. समीर तर फारचं सावध बोलत होता. प्राजक्तात नि त्याच्या तयार झालेले नातं त्याला संपावयचं नव्हतं. ते अधिक गठठ करायचं होतं. प्राजक्ता अधिक जवळ गेली.
“ शामलचं तुझं का भांडण झालयं.”
“ ती जरा हेकेखोरचं. अश्यात तिचा तोरा जरा वाढलाय.”
“ कसा?”
“ बारीक बारीक गोष्टीवरून भांडतेय ती माझ्याशी”
“ काय समीर, ती संशय तर घेत नाही ना आपल्यावर?
“असं का वाटतं तुला? तिनं संशय घ्यावा असं काय केलं आपणं?”
“ तेच कालचा तो प्रसंग.हे आजचं असं येणं.” तेवढयात प्राजक्ताच फोन वाजला. पाहते तर शामलचाच फोन होता. ती प्रंचड घाबरली. कशी घेणार होती फोन. आता तिला काय सांगणार?
“समीर,शामलचा फोन.”ती अधिक त्याच्या जवळ गेली. तिनं समीरकडं पाहीलं. समीरनं तिला फोन घ्यायचा इशारा केला. ती नुसती त्याच्या डोळयात पहात राहीली . समीरला ती फारचं लहान मुलीसारखी वाटली.त्या निमत्ताने तिच्या पाठीवर हात ठेवला.प्राजक्तानं तो फोन रीसीव्हे केला.
“ हॅलो,गुडमर्निंग,शामलं.” समीरने तिच्या भोवती हाताचा विळखा अधिकचं घटटं केला.शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

चाफयाचं फूलं


सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर.हार घातलेला.शायनासरीत.आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की  नुसता  पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?
                  काल तेरावा झाला.आज गंगापूजन.त्या फोटूच्या पुढंचं बारकाली पोर जेवत होती. वश्या ही त्यातचं होता.त्याला काहीचं कळत नव्हतं.अजून साळात त्याचं नावच नव्हतं टाकलं.आवदासाल टाकायचं ही नव्हतं.चुलतीची बारकी पोरगीसीती..! लयं गांधनमाशी. आगीचं घरचं ती.तिच्याच हा वाट जायचं उगच तिला हात लावायचा.ती हात लावला  की किरकास आरडायची.ती आराडली की हयो नुसता पळायचा.बाकीची गाबडी मग नुसती हासायची.कुणी त्याला इचारलं की दादा कुठं गेलेत रं तुझं. तर तेव्हं म्हणयचा….. देवाच्या घरी खाऊ आणायला. असं तेव्हं बोलला की आय नुसती रडायची.आता त्याला काहीच कळत नव्हतं. लहान आसलेलं बरचं म्हणायचं. त्याचा काळजाचा असा डोंभ  तरी होत नसलं ना ?
 सारं आवरून आम्ही बाहेर आलोत. मामा,आई,मी व वश्या रस्त्याला लागलोत. मला काळेगावाला बोर्डींग सोडायला मामा नी आई निघाले होतं.मोठाई पार शिवणीच्या पटटीत होती. ती आता पार थली.तिला चालवत नाही. आता दादा गेला नी ती गप्पच झाली.म्हतारपणाला देवानं लयं दु:ख दिलं.नवरा गेला इज पडून.आता कर्ता धर्ता पोरगा गेला. पोटचा गोळा सा-या लोकांनी तिच्या समोर जाळून टाकला.ती नुसती आरडत राहीली.‍तिची दातखिळी बसं. लोकाला वाटायचं गपकून तिचा श्वास निघून जाईल.तिचा श्वास सुटला नाही. उलट ती तडफडत राहीली.मरणं मागून थोडचं ‍मिळत?
          एक लेक गेला हे जग सोडून…. आता सांज्च्याला दुसरा जाणार कारखान्याला पाठीवर बि-हाडं टाकून. आयीनं अर्धा कोयता केला होता.दादाचं कर्ज फेडायासाठी मुकादमाचा नुसता तगा होता .आईचं टॅक्टरं उया येणारं होतं.मोठाई एकटीचं राहणारं घरी. गावाल्या आमच्या घरी.पडकं. चारं पत्रयाचं.तिथचं ती राहती.दादान फाशी घेतली तवा तिला इथं वस्तीवरल्या घरी तिला आणलं होतं. नाहीतर एकटीचं राहती त्या वाडयात भूतावाणी
                   आज सारेच पांगणारं होतोत आम्ही.तिला ही गावातल्या घरी जायचं होंत. त्या घराचं एक खीळपाटं पडलं होंतं. तेवढं रचून दे जातानी असं ती नानाला  लयं बा-या म्हणाली.त्यांनी नाही लक्ष दिलं. त्यांच्या माग ही लयं काम होती. दादाचं सारं त्यानाचं करावं लागलं होतं.चुलती एकादा चांगलीच वसाकली.” रहा की गप तिथं. कोण खातं तुम्हाला?
“मला कशाला कोण खाईल? राहते तशीचं. माणं काय आता सोनं व्हायचं?” ती पुनहा कुणला म्हणली नाही. गप झाली.ति चं ऐकलं असं कोण होतं तिचं आता.
          जिथं दादाला जाळलं होतं तिथचं.त्या दगडाच्या ‍खिळयावर दगडं टकीत होती.तिनं तिथचं एक आळ केलं होतं. त्यात मोठी चाफयाच्या झाडाची फांदी लावली होती.त्या झाडाच्या  जवळचं तुळसं पण लावली होती.माझ्या दादाची समाधी बांधावी अशी इच्छा होती मोठाईची .पण आयनी नाय बांधली.आय तरी कुठून बांधीनं ? दाव्यला  ना दिवसालाच मुकादमानं पैसं दिलं होतं. कारखान्याला न्यायाला बाजरी नव्हती. पाच पायल्या बाजरी मामानी त्याच्या बागायदाराकडून आणली होती.समाधीचं कुठं घोडं धामटीनं?
       आम्ही आलोत की काठी टेकीत टेकीतपार बांध चढून वर वाटला आडं आली. मामा सहज म्हणाला.”मामी कशाला उन्हात तडफडताहेत आता?”
कशाला तडफडू आता….काय उरलं माझं ? बसल्या जाग्यावर दम नाय निघत.नुसतं पोटात कालीत बघा. सारं पोटातलं खंवधळत .नुसतं चित्र पुढं येतेत त्याचं.नुसतं आग आग व्हती जीवाची.”
आता त्याला काय इलाज.मराणं काय कुणाला चूकलं ? इसरायचं हळूहळू…”
आता कशाचं इसरतं? हयो दु;खचा जाळ महया संगच येणारं….”
आता आपण काय जीव दिला तरी ते काय परत येणरेत का?”
म्हतारं पणाला काय हयो दिवस आणलं त्या दुश्मानं म्हयावर….त्याच्या अगोदर मला न्यायचं व्हतं त्यानं.तिचं डोळ पुन्हा दाटून आलं. देवाला मोठाई सारख्या शि व्या देती.म्हतारी  मात्र देवाला भेत नाही. ती म्हणायची देवाची माझी दुश्मनी.त्याच्या कमून आरत्या करू? चेह-यावरल्या सुरकुत्याच्या रेषातून घळाघळा पाणी ओघळू लागलं.पदर डोळयाला लावला. पदूर पार ओला झाला.
आता माझी ही लेकरं वनासी झाली.उघडी झाली.” माझ्या चेह-यावरून तिनं हात फिरवला. तेव्हं खरबूड हात मला टोचला.त्या टोचण्यात उगचं मला दादाचा स्पर्श वाटला. आजीनं माझी लाडानं पप्पी घेतली.माझ्या चेह-यावरून हात फिरवून बोटं मोडली.माझं डोळं पुन्हा भरून आलं.तिनं  कबंराची पिसी काढली. त्यातून चापून चापून  एक पाच रूपायाचा ठोकळा काढला.त्यात तेवढाचं एक असेल! माझ्या हातावर मांडला.पुन्हा माझा चेहरा कुरवाळला.
चांगलं शिक बाई. त्याची लयं इच्छा होती तुला शिकवायची.मोठं सायबीनं करायचं व्हतं तुला.तिचं ते गहीवरले शब्दं माझं काळीजं पघळून गेले.मी तिच्या पाया पडायाला खाली वाकले.
आई,खरचं मी लयं अभ्यासं करीन. मी मोठी होईन. दादा म्हणायचं आंजे,तू इन्स्पेक्टरं हू गडया.”
“ पाव्हणं तसलं काही मनातआणू नका. हे आमचं खानदानी रक्त हाय. हे नाय नासायचं. हिचा पाय नाय वाकडा पडायचा तिनं पुन्हा मला कुरवाळलं.माझं डोळं डबडबून आलं. आईच्या डोळयातून पाणी ओघळलं होतं.ती गपगप उभी होती.
“ शिकवायचं तिला.बोर्डगीत नाव घातलं तिचं.” मला पैसं दिलेले वश्यानं पगीतलं. त्यानं तिथचं खळ धरलं. मला पण पायजेत.जाग्यावरचं पायानं माती उकरू लागला.थयाथया नाचू लागला.आजीनं पुन्हा पीसीत चापल्यावाणी केलं.
नाय तर राजा, तेवढचं होतं.” आता आजीचं बोलणं वश्याला कुठं कळतं सतं?त्यानं मग तर पिपाणीचं सुरू केली. आईनं धमकून पाहीलं. ते गप बसत आसतोस व्हयं कुठं?म्याचं मझ्याकडलं पैसं त्याला दिलं. तव्हा तेव्हं गप झाला.
आता जा घरी. आता परत येते हीला सोडून.मग सकाळ सकाळ गावात सोडीन.”
“ आग आक्के ,म्हतारी एकटीच कशी राहील?अंधार कीडं पडणं आता.” मामाला मोठाईची काळजी वाटली.
ये, मला कोण खातयं? माजं दोन वाघं इथं.”दादाच्या व आण्णंच्या दगडाकडं हातं करत मोठाई म्हणाली.
चाफयाच्या झाडाला थोडं आळं करते. हे एवढं शॅण टाकते.हे झाडं मोठं झालं तर तेवढीचं सावली पडलं माझ्या राज्याच्या अंगावर…. आलचं झाडं तर फुलं पडतेल अंगावर.”शेणाची पवटी उचलायला खाली वाकली. एका हातात काठी. एका हातान शॅण घेऊन चालू लागली. मामा , आय, मी नुसतं तिच्या कडं पगत बसलोत.चालताना ती तिरघड होती.
आक्के ,म्हतारी, कशी राहीलं एकटी.आता श्रीरपा दाजी आज हालत्यालं सांजंच्याला.तू उदया. आयला माणसाचा जल्मच लय आवघडं. काय भोग आलेत तिच्या वाटयाला.तिचं डोळं झाकायचं ते लेकाच्या थडग्यावर पाणी घालायचा टायम आला तिच्यावर.लय दिवस नाय टिकायची ती आता. पार गागाडली.”
“मी तरी काय करू? कारखन्याला नसतं गेलं तर संभाळलं आसतं. महया माग हयो कहार..लयं बुचका करून ठेवलाय त्यांनी रीनाचा.आता हयो लेक हायतं. म्हतारीचा इचारचं करत नाय.”
त्याच्या भी मागं लयं व्यापं.त्याला तरी काय बेलापूराला गेल्याशी भागतं का? हयो कुणबाटयाचा जल्मचं लयं वाईट.”
पुढच्या वर्षी नाही जाणारं. पोरीची सोय भी लागलं.म्हतारी भी राहील माझ्या पाशीच.” आयी म्हणाली.आता आय तरी काय करणार होती. दादा व्हता तव्हा ही ते म्हतारीला संभाळू शकले नाहीत. आता आय काय करील ?तिला तर जाणचं आल.त्या मुकादमाचं सारखा तगादा माग.
 म्हतारी कसं करीत आसलं. कसं खात आसलं ?” मामाला प्रश्नच पडला. मामाला कुणाची भी लय दया येती.त्याचं काळीजच लयं हालकं.
खाती. कसं भी. सकाळ दुपार करती थोडी काही खयाला मंगळवारी, शुक्रवारी ,पुनवेला बस्ती  भोन्याच्या देवळात…. कधी कधी जोगवा मागती.” हातावर परडी आली म्हणून मोठाई अराधीण झाली. चार घर मागून तरी खाती. मोठाई जोगवा मागती पण पोरं पोरी लयं चिडीत्यात तिला.तिची राडोळी करत्यात. दादा नव्हता मागून देत तिला जोगवा. जोगव्याला मोठयाई निघाली की दादा खवळयाचा.
आरं, हे देवीचं ताटं….तसं नक्कू करू….उग चार घर मागते.” असं मोठयाई म्हणायची खरं पण सा-या गावात ती जोगवा मागायची.पोतावर घालायला तॅल मागायची. चांगलं बूटकूलं भरून तॅल आणायची. आता तर जोगावा मागूनच खाती. आरं,ती आमच्या सा-याची पोंटं भरीत होती.तिला एकटीचं पोटं भरणं काय अवघडं.”
आम्ही पुन्हा सारंच माग वळून पाहत होतो. तेव्हा मोठाई कळशी घेऊन पाण्याला चालली होती.तिला त्या आळयात पाणी ओतून चाफा फुलवायचं होता. मोठाई साधी म्हतारी नव्हती. देवासंगच तिची दुश्मनी होती.
                                              परशुराम सोंडगे,पाटोदा
                                                 9527460358               
      अजून कथा वाचण्यासाठी भेट दया व मला फालो करा
           Blog:-prshuramsondge.blogspot.com


गुरुवार, १७ मे, २०१८

लोकशाहीवर बोलू काही…


लोकशाहीवर बोलू काही…
कर्नाटक विधानसभेचे निकाल लागले. लोकांनी सपष्टं कौल कुणालाच दिला नाही.त्यामुळे पेच निर्माण झाला.सरकार स्थापनेचे दावे प्रतीदावे झाले. नेहमी प्रमाणेच न्यूज चॅनलवर चर्चेचे एरडांची गु-हाळ रंगली.अनेक तज्ञ.विद्रवान लोक आपली मत मांडु लागली.विधानसभा कर्नाटकची निवडणूक नसून ती मोदी विरूध राहूल अशी आहे. असं भासवण्यात आलं.काँगेस व भजपा अशी ही निवडणूक झाली असं म्हणायला कुणी तयार नाही.दोन व्यक्तीची तुलना करण्यात आली. संसदीय लोकशाहीमध्ये व्यक्तीपेक्षा पक्षला महत्त्व आहे. बहूपक्षीय संसदीय लोकशाही आपण स्वीकारली आहे.त्यात या दोन राष्ट्रीय पक्षांच्या व्यक्तीमत्वाची तुलना का करावी? या निवडणूकीचं ‍विश्लेषण व्यक्तीकेंद्रीत का करावं? तशी अपरीहार्यता तरी आहे का?  आपण  सांसदीय व बहूपक्षीय लोकशाहीच्या चौकटीतच राहून आपल्याला विश्लेषण करता नाही येणारं का?
              विरोधी पक्षाची भूमीका घ्यायला तयार नाही.पक्षांना व त्या पक्षांच्या समर्थकांना आपल्या पक्षाकडेच सत्ता का हवी आसते? सत्ता हे कोणत्याचं पक्षाचं साध्य असू नाही पण दुदैवानं सा-याचं पक्षाचं साध्य सत्ता झाली आहे.हारणं व जिंकणं हे शब्द प्रयोग करणं ही उचीत नाही.सर्व मतदारांचा कौलाचा आदर केला पाहीजे. सत्तेतचा कौल दीलेल्या पक्षाच्या मतदारांचा व विरोधी पक्षाची भूमीका ही स्वीकारणा-या पक्षाच्या मतदाराचा ही आदरच व्हायला हवा.राजकरणातील लोक समाज,देश व  लोकशाही मूल्याचं जतन करत नसतील तर त्यांना नाकारलं पाहीजे. त्यांच्या चुकावर पांधरूण्‍ घातलं तरी चालत पण त्या चुकांच उदात्तीकरण करण हे भंयकार आहे.गददारी,लबाडी,जात्यांधता हे राजकरणातले कौशल्यं नाही होऊ शकत. लोकशाही मूल्यं कुठं कोण पाळत म्हणून कुणी त्याचा आग्रहच धरायचा नाही.तश्या चर्चा ही करयाच्या नाहीत. लोकशाही फकत राज्याशास्त्राच्य पुस्तकातच वाचायची का? आपण फार द्रिवान अहोत असं म्हणंत लोकशही मूल्याचीपायमल्ली होत असताना आपली छाती फुगून घेत बसायचं.
                  सत्तेसाठी काही ही तडजाडी करणा-या राजकीय पक्षाचं समर्थन लोक का करत असतील?  असं समर्थानाचे संदर्भ तपासायला हवेत.ते नक्कीच देशि समाज हीत जोपासणारे नसतील मला कोणत्याचं राजकीय पक्षाची बाजू घेयायची नाही. संसदीय,बहूपक्षीय लोकशाहीच्या चौकटीत काम करणारा पक्ष आपल्या देशात तरी नाही असं माझं वैयक्तीक मत आहे.सत्ता हस्तगत करण्यासाठी टोळया तयार झाल्या आहेत.त्या टोळयांच सदस्य व्हायचं की लोकशाहीसाठी, देशासाठी सदृढ लोकशाहीचा आग्रह धरायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.अनेक महत्त्वाच्या लोकाकडून नीवडणूकांच वीश्लषण करताना राजकीय डावपेचांना महत्त्व देउन डावपेचा उदात्तीकरण केल जातय.त्यातुळेच अभ्रद युत्या, कमालीच्या तउजोडी करण्यासाठी राजकीय लोकात स्पर्धा लागली आहे. गददारी हा सुवीचार नाही होउ शकत. तुम्ही कोणत्याच पक्षाच समर्थक नसाल.लोकशाही साठी काही आग्रह धरा आज ते कीती अव्यवहार्य असले तरी….. अशावादी राहू.

मंगळवार, १५ मे, २०१८

जत्रातील प्रेमाची गाेष्टपाराकं आरगन वाजल.बॅन्डवाल आलं.ते आलं की सलामी देत्यात. आरगनाचा मोठा आवाज सा-या गावात घूमू लागला. तशी बारकाली पोरं...पोरी चींगाट पाराकं पळाली. मोठाली बरीचं माणसं तिथचं होती. कुणी रावश्याच्या दुकानाच्या दारात.. कुणीबुणी चावडीच्या दगडाला बूड टेकून बसलेलीआज गावची जत्रा.शेताभीतात कुठं जाता येतं?  तिथचं टायमपास करीत बसलेली.चार पाच टोळभैरी पोरं भी व्हती.सांवताच्या घराला पाठ देउन बसलेली. पोरं कुठं नुसते गप बसत आसतेत व्हयं? मोबाईल चिवडीत होती.बँन्डवाल्यानं सलामी दिली.आगोदर.. गणपतीची आरती.मग एक मस्तं गाणं.. वाजवल.त्यांच्या भोवती गर्दी जमा झाली आणि ते थांबले.सलामी झाली की ते पारावर टेकलं. आरगानाची गाडी तिथचं पारा म्होंरं सोडली होती.त्या गाडीभोवती पोरानी गराडा टाकला.तेवढयात आशुक्या व इलाश्या आलं.कुठं होतं नि कुठं नाय. गापकुणी बोळीतून आलं.डायरेक्ट बॅन्डवाल्या पाशीचं हजर झालं. दोन्ही हात वर करून लगेच आशुक्या म्हणाला,”बजावं…. बजावदोघ ही पंगाट झालेले.
आताच सलामी झालीय मालक.” बँन्डवाल्या आत्म्यानं जरा आदबीनं त्यांना सांगितलं. जत्राच्या कारभरात सारचं मालक आसत्यात. उगच कशाला कुणाला अंगावर घ्या. बँन्डवालं तसल्या कामाला लय चाप्टरं आसत्यात. पेताडाच्या कशाला नादी लागत्यालं.
काय सलामी झाली?कुणाला इचारून झाली? ते बाकी काय माहीत नाय.गाणं बजाव.झींग झींग झींगाट…” त्यानं त्वांडानचं गाणं सुरू केलं.हातानमांडीवर वाजवायला सुरू केलं.त्वांडानं आवाज काढी. झींग झंग.. झींगाटसारं पोरं भोवताली जमा झालेले.यांना रंग चढलेलागाणं म्हणता म्हणता नाचाया भी लागली.आता आरगाना भोवती चीगुरखाना गोळा झालाच होता.ते गाणं म्हणायला लागली की पोरं भी त्वांडनचं गाणं वाजाया लागली.असाच त्वांडातून बँन्डंबाजा सुरू झाल्यावर सारी लोकचं  बघया लागली.सूभना नानाचं पीत खवळलं.त्याचं नाय कुणाचं भी पीत खवळणचं ना? उग चाराण्याची प्यायची अन बारा आण्याची नशा आणायची.गावच्या जत्रात असा बीन पैशाचा तमाशा उभा केलेला बरा नव्हता.
आर,आशुक्याकाय लावलं रं ये.”
दिसतं नाय काय? आरं,बजाव.. बजाव…” त्याला बोललल्यावर ते जास्तचं चेकाळला.मग तर गडयानी ढोल हातात घेतल्यावाणी ॲक्शनचं घेतली.तसा साराचं चिगुरखाना चेकाळला.सुभानाला जास्तचं राग आला.सुभानाना उठूनचं त्यांच्या अंगावर गेला. त्याला सारे ते खिदाडून लावायचे होते.”मरा तिकडं देवापुढं काय लावलयं हे.”सुभानना त्यांच्याजवळ आला की सा-यांनीच गराडा टाकला.त्याच्या भोवती फेर धरून नाचायला लागली. लेकरं भोवती नाचाया लागली. तेव्हं जसा अंगावर धावून यायचातशी पोर माग पळायचीरागीट गडी पण पार विरघळला.”आयला हे नाय सुधरायचं.” बँन्डंवाल्याची भी पंचायत झाली. नाय वाजवावा तर आशुक्या चांगलाच फास्ट सुटला होता.पंग झालेलेसरपंचाला  भी काहीबाही म्हणयाचं.पाटला भीकाही बाही म्हणायचा. काहीबाहीम्हणजी आया माहीचं उजगारायला लागला.उगच जास्त काही पेटायचं.त्यापेक्षा एक दोन गाणी वाजू.असं बँन्डवाल्यानचं ठरवीलं. बँन्डंवाला आत्म्या म्हणला,”पोरावं फुका रे. झींगाट….!”
                                  आरगानावर गाण सुरू झालं. गाणं सुरू झालं की ते बेवडे आत मध्ये शिरले.एक एक म्हणता सारीचं पोरं आत रिंगणात शिरली.सारेच झीगाट झाले. सारीच पोरं सुरू झाली.पोरं चांगली रंगात ली.एका चढ एक गाणी सुरू झाली.पेताडं बँन्डवाल्याला पैसं सोडायला लागली.पैसं दिसल्यावर त्यांना भी चांगलाच चेव आला.गाण्यावर गाणी वाजू लागली.आता नुसती गाणीच वाजत नव्हती तर डान्सं ही सुरू झाला. असा भारी डान्सं सुरू झाल्यावर त्यांना गराडाचं पडला. कुणी पैसंच काय उधाळीत…. कुणी उपारणीच काय वर फकीतहे दोघचं.. शहाणे बाकी सारेचीगुरखनाच. नाचायलाचं लागलेत म्हणल्यावर पोरीसोरी भी भीताडाच्या आड दडून बघाया लागल्या.देवाला नीवद घे चालल्या आयाबाया थांबून पहाया लागल्या. काही बेणी.त्याची भी शुटींग करायला लागली.आता आपली शुटींग करायला लागलेत म्हणल्यावर त्यांना भी चेव आला.जास्तचं आंग हलायला लागली.काही नाचता नाचता पडायला लागली. फुपाटारेंदा काहीचं कळतं नव्हता. कुणाला सुध्दीचं राहिल्या व्हत्या.
                           पाराकं लय्य्च मज्जा सुरू झाली हे काय झाकतय व्हयं? संत्याचा तर जीवाची उलाघाल व्हायला लागली. या वर्षी….साळाच्या गॅदरींगमध्ये त्यानं लय भारी डान्सं केला होता.टॉपचएकचं नंबरपैसं भी लयं भेटलं होतं त्याला. आता सारं पोरं त्याला डान्सरच म्हणायची. त्याच्या बरूबरसातवीची सीमी नाचली होती. पोरं तिला तर आर्चीच म्हणायला लागले होते. सीमी तर घराच्या बाहेरच निघत नव्हती. कशी निणं. बाहेर आली कीच पोरं.. आर्ची आली.. आर्ची आली.. म्हणून चिडवायचे. संत्यानं शेळया तश्याच ठेवल्या.चावी काळयाच्या म्हतारीकं ठेवली नि गडी चिंगाट पळाला.ते नुसतं कशाचं पळतं. अंग हालवीतचं पळायचं. लोकाला वाटायचं हे नाचतचं चाललं की काय. संत्या डावापाशी आला. त्याचा पार हीरमुडचं झाला. त्याचा बाप आशुक्या डावातच होता. त्याचा तर आता नागीन डान्सचं सुरू झाला होता. पडला की त्याला उठताचं येत नव्हतं.ल्या जाग्यावरचं गडी नाचायचा.संत्याचा हीरमुड तर झालाच पण त्याला राग ही लयं आला. आपल्या बापाचा असा अवतार पाहून कुणाला बरं वाटणं.सारी पॅन्टं रेध्यांन भरलेली…. सारं शर्ट भरलेल..भरकं उपारणं….तसचं वर उडवी. सारी पोरं हासतं. सुताराचा दीप्या त्याच्याकडं पाहून म्हणाला,”संत्या, तुझा बापाचा लय्य्चं भारी डान्सं गडया.लय्य्चं झीगाट नाचतोय.” त्याला लयचं राग आला.दोनचार त्याच्या थोबाडात माराव्यात असं वाटलं पण ते सोप नव्हतं. ते सुताराचे दोनचार जण होतं. चांगलचं पिसलं आसतं त्याला. तिथून पळून जावसं वाटलं पण त्याचं ही आंग हालतं होतं.कवा डावात शिरतो कवा नाय आसं त्याला झालं होतं. आत डावात ही शिरता येत नव्हतं. तिथून जाऊ ही वाटतं नव्हतं.
                                  बराचं वेळाने आशुक्या पडला. संत्या पुढं आला. त्याला बाजूला ओढलं.पाराच्या बाजूला बसवीला.त्यानं बसवीला पण तेव्हं चक्क झोपला.पार गळाटला होता.सुध्द नव्हती उरली.सकाळपासून नुसता पेतचं सुटला होता. पोटात अन्नचा कण नाय. नुसतचं दारू प्याल्यावर ती आतडयाला तटातटा तोडीत आसल ना? त्याच्याकडं एकदा पाहील.डावाच्या कोप-यात येऊन उभा राहिला.त्याच्या बाजूची पोरं त्याला डावात ढकलीत.त्याचं मात्र सारं लक्ष बापाकडंच होतं.पोरायचं काय चुकत नव्हतं.गाणं लागलं कीच गडी जाग्यावरचं हालायचा.पोचं ती कसली दम खात्यात. दोनचार जणानी आत ढकलला. बाकीचं पोरं मोठयानं ओराडली,”आरं आलाआला.. हीरो आला.
संत्या सुरूच झाला. सुरूवातीला एक दोनदात्यानं बापाकडं पाहीलं. ते गप होता. संत्याच्या अंग अंग हालू लागलं. गडी चांगलाच रंगात आला. नाचणरा चांगला आसला की वाजवणराला भी चेव येतो.वाजवाणरं चांगलं आसलं की नाचणारचं भान हरपत.अजून दोन चार पेताड जमा झाली. संत्याच्या अंगावरून नोटा फेकाया लागली. पोरं चेकाळली. गाणं वाजतं होतं. जे पैसं दयायचं बँन्डवाल्याला दयायाचं ते संत्यालाच दयायाला लागले. पैसं बँन्डवाल्यावर ओवाळायचे.शेवटी संत्यालाच दयाला लागले.असा इन्सल्ट बँन्डवाल्याला भी सहन होत नव्हता.संत्या ते त्वांडात धरून नाचाया लागला.बँन्डवाल्याचा गाणं वाजवण्यातला इंटरेस्ट कमी झाला.ते बंद पडले की पोरं नुसत ओरडायची. चार पाच पेताङ तर पारच अंगावर जायची.
उग तीरीमीरी होऊ लागली. दोनचार गाण्यावर नाचल्यावर संत्या भी जरा गळाटलाचं होता. पैसं पाहीलं की पुन्हा त्याला हुरूप यायचा.
              तेवढयात एक जीपड आलं.सारीचं त्या जीपडयाकं पळाली.. नाचणारे पळालेबघणारे तर सारेच पुढं पळाले. जीपडयाला गराडाचं पडला.  थोडा अंधार पडला होता. जीप मधून एक नाय. दोन नाय.. तब्बलं चार बाया उतरल्या... त्या पण हासतं हासतं….सा-यानी केसं मोकळे सोललेपदर खांदयावरचंदोन तीनं माणसं भी उतारली.त्यांच्या पिश्या वागायला आसतेल ते. बाया उतरल्या की त्यांच्या अत्तराचा वास.सारीकडचे पसरला.तेव्हं सेंट भी लय भरी होता. पलीकडं पारावर बसलेले टोळक लगीच इकडं आलं.बाया उतरल्या -या पण त्यांना कुठं बसवायचं? हा प्रश्न सच्याला पडला.सच्या गेला होता सुपारी दयायला.त्या कुठं भी उभाराहिल्या की उग पाच पन्नासं पोरंग जमा व्हायचं. त्यात शेंबडी भी पोरं आसायची.चांगली तरणीताठी,म्हतारी-कोतारी भी असायची.त्या चार बायात.. एक पोरगी  होती. ती ड्रेसवर होती.साळातचं जात आसलं. निळा ड्रेसतसलीच ओढणी अंगावर टाकलेलीतीचं भी केस मोकळचं सोडलेले. पिक्चरमध्यल्या हिरोनीवाणी…. बाकीच्या साडीत होत्या
आयला, ॲटम भारी आणेत लका.”
मग सच्च्याची चॉईस….” कुणी तरी उगचं कालर टाईट करत म्हटलं.
आयला ते बारकुसं घूंगरू कशाला आणलं कायनु.”
आता हयो.. चीगुरखना नाय का. त्यांनी भी टायेम पास पायजे. त्यांची नाय काय जत्रा.”एक चावट म्हतारं म्हणालं.तशी पुढची सारीचं बारकाली पोरं लाजली. लाजली पण चांगलीचं चेकाळली.आता त्यांना कुणाच्या घरी थोडचं नेता येतं? चावडी पुढचं टेकल्या. त्या टेकल्या तरी सारा गराडाच पडला त्यांच्या भोवती.
आर, नुसतं बघत काय बसता. पाणी बीणी तर पाजा.” नंदी म्हणाली.त्यातली सा-यात मोठी नाची होतीतिचं नाव नंदी होतं.
या गावचं पाणी लागलं काय ग्वाड.” मोठं धाडसं करून मिचमिच डोळयाचा शिव्यानं इचारलं.
या गावचं काय…. बारा गावचं पाणी पीतो आम्ही.आणतोय का पाणी चीकण्या…”नंदी म्हणाली.तेव्हं होता कोठूळयाचा नील्या. चिकण्या म्हणलं की जाग्यावरचं लाजून लाजून चूर झाला.त्याला पुढं काय बोलावं तेच कळेना.ते मागचं ळालं.सारी पोरं….लाजलं लाजलं.. म्हणून आरडायला लागली.सारा चिगुरखना.. मोठाली टोंगळी पोरं ही होती तिथ पण पाण्याला कुठं कोण जात.सा-यानाचं मज्जा घ्यायची.कुणाचा पाय तिथून हालत नव्हता.
तेवढयात गावचा कोतवाल. धाम्यागेला नी चरवी भरून आणली. बायाच्या पुढं ठेवली.त्या बायांनी नुसतं त्या पाण्याकउं पाहीलं.
आसलं पाणी नाय पीत आम्ही.बिसलरीचं आणा.” कुरूळया केसाची संगी म्हणाली.
पुन्हा सारी गप झाले.कोण पैसं खर्चीत.कोतवाल बिसलरी कुठून आणीन?
                  तेवढयात तुषार भैय्या….आला. तुषारं भैय्याच्या माग त्याचं पोरं होतीच.तुषार भैय्या म्हणजी संरपचाचा नातूटार्च केलेलेकापडंनुकतचं मीसरूड फुटलेलेगळयात सोन्याचा साखळी.हातात मोबाईल.त्वंडात मावा.चांगलच त्वांड फुगलेले होते.केसात गॉगल लावलेलाभारी स्टायलेश गडी.तुषार भैय्या आला की सारीचं पोरं माग सरली.त्याला सरळ वाट करून दिली. तुषार भैय्याच्या काही बाया ओळखीच्या आसत्याल. कलाकेंद्रावर. कधीबधी जात आसलं. असा काहीनी अंदाज काढला.अंधार झालेला होता.बायाची तोंड पहता यावेत म्हणून त्यांन डायरेक्ट तोंडावरचं बॅटरीक चमकीली.”मीना आत्या काय? सोनी दिसती नि स्वीटी?”
स्वीटी नाय आली. लयच याद येती काय तिची?” नंदी म्हणाली. याद येती काय म्हणलं की सारा चिगुरखाना मोठयानं ओरडला,”आयला लय भारी बोलती लका….तेरी याद आती है.” दोन चार जणानं तर गाणचं सुरू केलं.स्वीटी…. भी पोरीच नाव आसतं. हे त्यांना पहिल्यांदाच कळालं. त्यातलचं एक बेणं म्हणतयं, स्वीटी का सीटी….. असं म्हण-या पो-याकडं तुषार भैय्यानं रागानं पाहीलं.त्याच्या बरूबरचं पोरं पार त्याला हाणायालच धावले. ते चींगाट मागं पळालं.नाचायला आणलेल्या बाया आहेत तरी कश्या हेच पाहायला लोक गर्दी करीत. त्या म्हतारी कोतारी माणसं भी आसतं. संदीप बावण्याच्या म्हणयाप्रमाणे म्हता-यालाच लयं कंड आसतो. माणसं सारेच खूष होत होते..बाया भी चांगल्या होत्या.दोन वयस्कर वाटत आसल्यातरी भारी वाटतं होत्या.भारी म्हणजी चिकण्या होत्या.बारकी पोरगी मध्येच बसली होती. सारी माणसं तिथचं डोकायची.संत्या पुढं आला. संत्याचा भी आज वठच होता. मघाच्या डान्सातचं त्याला जवळ जवळ चारपाचशे रूपये भेटले होते.केसं मागे वर केलेले. वन साईड कट मारलेलात्याच्यावर रूमाल गुंडाळलेलायाडयानं अंधार पडला तरी गॉगलं डोळयाला लावला होता.ती त्याची स्टाईलच होती.कुणी तरी त्याची ओळख करून दिली.”हयो संत्या….. आमचा गावच डान्सरं.”
डान्सर…!!” त्याच्याकडं सा-याचं बायानं पाहीलं.पायापासून डोक्यापर्यंत.संत्या गेला इरमाटून.तेव्हं लाजला की बाया मुद्रदामचं त्याला लागल्या खिजवायला.नाच्याच त्या त्यांना कसल्या आल्यात लाजा.
काय रे छटाक्या? नाचतो काय माझ्या बरूबर.” छटाक्या… म्हणल्या बरूबर सारीचं पोर हासली. आता त्या नाच्या म्हणल्यावर एवढं तेवढं चावट बोलणारचं ना नवीत शिकत आसलेलं पोंरग ते.तिच्या बरूबर कस नाचणार? ती तर त्याच्या आयीवाणी होती.”नग बाबाम्या कशाचं डान्सरं?” संत्या….माग सरकला पण सारी गर्दीचं त्याला पुढं रेटी.आता त्याला काय पळून जाता येतं का ?
नग…” म्हणंन नी हातानी त्वांड झाकी. नुसतं हासं.
आर, या आमच्या रिंकी की बरूबर नाचतोस का?” त्या बारकुश्या पोरीकडं हात करत ती नाची म्हणल्या बरूबर सारीच पोर मोठयानं ओराडली,”लय्यी भारी जोडी गडया… आर्चीनं परश्या….” काही बारकाले पोर तर तिथचं जाग्यावरच नाचायला लागले.तसल्या बारकाल्यानां कशाचं सुंभार राहतं. सच्या तिथं आला.त्यानं सा-यालाच माग सरकी.
चला,पळा त्यांना जरा म्याकअप करू दया.” जी पोरं माग सरत नव्हती.त्यांना सरळ त्यांनी टोल दयाला सुरू केलं. मोठाली पोरं साईडला राकली.त्यांचा काय तिथून हालायचा इचार नव्हता.सच्या त्यांना कशाला काय बोलतोय. सा-याचं बाया चावडीत कोंबल्या. दाराला कडी लावून सच्च्या दारात बसला.पोंर लयी हुश्यारं… खिडकीतनं डोकायाला लागली.मगमात्र त्याचा पारा चांगलाच वर चढला.”बायाश्यनी कापड भी बदलून नाय दयायचं म्हणल्यावर काय करायचं. त्या तसल्या बायात का ? लोककलावंतत्या.कलाकाराची भी कदर कराया पायजे.” सच्च्यावर उगचं लेक्चर दयाची पाळी आली. सच्याची मोठी सर्कस उभी राहिली.बारकाल्याचं ठीक हो पण त्यांना दोन टोल तरी हाणता येतेत.आता दोन दोन लेकराचं बाप ही खिडकीतून डोकाया लागल्यावर काय करायचं.
                                    सारं गाव गोळा झालं. पाटलानं देवाला नैवैदय दावला. चावडीतून म्याकअप करून बाया बाहेर आल्या.पायात चाळ बांधल होतं.त्या चालायला लागल्या की ते वाजयचं.त्या बारकुश्य पोरीनं साडी नाय.पँन्टं शर्टच घातलं होतं.आता तर लयीचं भरी दीसत होती.साडीवर तीला नाचताच येत नसलं.कुणी म्हणालं तीला साडीचं नेसता येत नसलं.सा-याच्या नजरा त्यांच्यकडंच होत्या. गावातल्या बायानी भी गर्दी केली होती.पोरी सोरी  भी कडाकडान बसल्या होत्या. तेवढयात संत्या व विकाश्या पाण्याची बाटलीचं घेऊन आले.ते बाया जीथं उभा होत्या तीथचं गेले. आज संत्याकडं काय पैशाला कमी नव्हतं.त्यांच्या बाजूला बसल्याली पोर लगीचं म्हणाली,”आणलं गडया हिरोनं पाणी तुम्हाला.” संत्यानं भी त्यांच्या हातात बॉटलं दिली.त्या पाणी प्याल्या.संत्या त्या बारक्या नाचीकडं पाहतचं होता. आता नजरा नजर होणारचं.
, हीरो तुझं पाणी लयं ग्वाङ रिंकी तसं म्हणाली की पोरं नुसती मोठयानं आराडली.
संत्या….संत्यालयचं मज्ज लका तुझी…” तसं ते लाजून लाजून चूर झालं.
, हीरो नाचणार ना मझ्या बरूबर..” आता त्या रोज नाचणा-याच पोरी. एवढं तेवढं चावट बोलणारच.तसल्या अंधारात तिनं त्याला डोळा मारला.डोळाचं मारती म्हणल्यावर हे झालं पागलं.लहान आसलं म्हणून काय झालं.त्याला भी सारचं कळत होतच की.
                        आरगान वाजायाल लागलं.एक दोन गाणी झाले.लोकांना कशाचं दम.लागले पैसं सोडायला.कुणी कुणाच्या डोक्यावर नोट धरायचं.त्याला चापट मारायला लावायचं.त्या नाचीनं चापट मारली की बाकी नुसती खो खो हसायचे. जयाला मारायाचे त्याचे आय, बायको तिथचं असायचे.बाप असायचा.सारीचं मज्जा घ्यायचं. पुन्हा चिडून जाऊन दुसरा पैसं सोडायचा.चांगलाच रंग चढत गेला.गावातल्या पोरानं संत्या मध्येच ढकलीला.डान्सं सुरू झाला.संत्याचा डान्स एक नंबरच होता. तेव्ह नाचायचा.लोक पैसं दयायचे.कुणी रिंकीवर ओवाळून दयायचे. कुणी संत्याच्या त्वांडातले पैसं तिला तोंडानं घ्यायला लावायचं. बाकीच्या नाच्याच खाली बसल्या.रिंकीनं संत्याचं नाचायला लागले.
                    पँन्ट आणि शर्टवर ती नाचायची. पोरांना ते पिक्चर मधल्यासारखंच वाटाया लागलं. नटया नाय का पँन्टवरच नाचत. पोर चेकाळली.पोरच काय सारीचं माणसं चेकाळली होती. पोरं मात्र ओरडत होती.माणसांना आरडता येत नव्हतं. त्यात भी एखादं बेवडं आरडायचं.मध्ये जान नाचायला बघायाचं.दोघावर पैशाचा पाउस पडू लागला. त्यांचा तोल सुटतं चालला. ते दोघी भी हातात हात घेऊन नाचाया लागले. पिक्चर मध्यल्यावाणी ॲक्शन कराया लागले. सारं गावं ते रोमान्सं पहाण्यात यडं झालं होतं.त्यात संत्याची आय भी होती.तिला मात्र पोराचं हे कौतुक पाहुशी वाटतं नव्हतं.नाची बरं पोरग नाचत. ते पण भरल्या गावात. जत्राला शंभर गावचं माणसं आलेलें आसत्यात. गावगावचं पाव्हणं रावळं आलेलं आसत्यात.त्यात पोरांचा हा तमाशा. बापाच्या पुढं एक कांड पोर निघालं असं तिला वाटलं.इतक्या लहानपणी आसली थेरं कशाला? तिचा जीव उदास झाला. आसल्या पोरा पेक्षा मी वांझं का राहीली नाही.त्या पोरीनंच आपलं पोरग फितवील असं तिला वाटलं. तीला काही वाटलं तरी कायच उपेग नव्हता. ते बेणं बेभान होउन नाचत होतं.तिच्या तळपायची आग मस्तकाला गेली. बाप पिऊनचं उडया मारायचा.त्या रांडापुढं हिजाडयासारखा नाचायचा.पोरंग तसचं कराया लागलं.जत्रा गावची.दोघं बापलेकाचीच चर्चारोज लोकाच्या इथं कामाला जायचं. एक दिवस दम नाय तिच्या हाताला. बापलेकाचं असली थेरं…. पोराची तर पारचं सुध्द गेली होती.त्याला कशाचं काय कळतं होतं.ती उठली. तडा तडा माणसात शिरली.कंबरेला पदर खोचला.
                 सा-याचं लोंकानी पाहीलं.आता पुढं काय होईल याचा अंदाज कुणालाच नव्हता तिनं दात ओठं करा करा खाल्ले.संत्याला व त्या पोरीला त्याचं भान नव्हत. ती गेली आसचं. सणासणादोनचार त्याच्या कानफाटात मारल्या.संत्याला काय करावं हेच कळेना.आता डान्सं करतानीपोरी समोर आपल्याला कानफाटयालं त्याला सहन झालं नाही.आपमान सहन करत माणूस पण असं पोरी देखत…. सा-या गावासमोर…. हाणायचं म्हणजे? हीला डान्समधलं काय कळतं.तेव्हं भी टसलीलाच पेटला.
मार मलामार मला…^ तिच्या अंगावरच हा धावून जाऊ लागला. बँन्डवालं तसली बेणं. ते भी लवकर बंद करिनात.तिला कुणाला धरायला भी यायना. कारभारी आंनदराव उठला. त्यानं शेलक्या दोनचार शिव्या हासाडल्या.मग बँन्ड वाजायचं बंद झालं. रिंकी धरायला गेली.” काकू,मारू नका….”ती होती रागात.दिलं तिला ढकलून.”गप ऐ इवश्ये…. माझ्या पोराला नादी लावती काय?” रिंकी जोरात खाली पडली.तशा सा-याचं नाचणा-या बाया पुढं झाल्या. संत्याच्या आयीच्या अंगावर धावून गेल्या.एकीनं तर तिची झिपरीच धरली. त्या भेत्यात व्हयं ?गावची पुढारी पुढं आलं.सा-यानी सोडवल. राधाअक्कानं ढकलीतचं संत्याच्या आयीला बाहेर काढलं.संत्याला एकजणानं ढकलीतचं बाहेर आणला.जत्राच्या कार्यक्रमात आसला चका नाय करायला पायजे.पुन्हा गाणं सुरू झालं. संत्याची आय तणा तणा करीत घरी गेली.
                 दोन तीन गाणी झाली की मुरली नानानी संत्याचं बाप. शूक्याचं पंग करून मध्ये आणून सोडला.संरपंचाच्या इरोधतल्या गडी.उग आठमुठा.एकदमचं संरपंचच्या क्रास मधला गडी.आता हे मुददामचं गावच्या जत्रेचा इचका करायला लागलेत. हे सरपंचानी ओळखलं.बरं आशुक्याला नीट उभा भी राहता येतं नव्हतं.तेव्ह जाग्यावरचं नागीन डान्सं करायला लागला.लोक पुन्हा चेकाळली. असं ओरीजनलं आयटम सांग पाहयला कुणाला आवडायचं नाय.तेव्हं उठायला गेला की आपटं. सारी माणसं हासतं.संरपंच, पाटील उठून गेले.गावातलं बरीचशीच मोठाली माणसं हळू हळू पांगाया लागली.रात भी बरीच झाली होती. तरूण पोंर पुढं सराकली.
       आता तुषार भैय्याची.गँगच तिथ आली. ते येऊन बसल्यावर लगेच आशुक्याला बाहेर काढलं. मोठाले दोनं पाचशेच्या नोटाचे बंडलं त्यांन बाहेर काढले. असं पुढं मांडले.एका एका गाण्याची फरमाइश करायला लागले.ते पैसं दाखवीत.नाचायला लावीत. ते सारं रिंकीलाचं बोलीत.कुणाच्या डोक्यात मारायला लावीत. ती पैसं न्याला आली की तिचा हात धरीत.रिंकीला त्यांनी ओढलं की संत्याची नुसती उलाघाल व्हायला लागली.संत्याचा जीव इकडं तीळ तीळ तुटं. त्यांचा नी तिचा काय संबंध होता पण उगचं याचा जीव तिच्यात गुंतला.संत्या जवळ जाई. तिला खुणी. जाऊ नकू म्हणं पण ती कुठं ऐकत आसती व्हयं.तिला तरी कसं ऐकून जमणं.पोटासाठीचं तर ती पण नाचत होती.ती त्याला खूणानच म्हणं नोटा सोङ.याचाकडं कशाचा नोटा आल्यात ? नाचून नाचून गोळा झालेले चारपाचशे रूपये होते.त्याला दमचं निघाना….बसला कोप-यात एका. लागला पेसं सोडायला.पैसं दावीलं की रींकी येई.यांनी बोलावलंकी तुषार भैय्या भी बोली. दोघाची मोठी टसलं लागली.
                         सा-या गावाला प्रश्न पडला. संत्याकडं कशाचं पैसं आलेत.ते कसं काय पैसं सोडीत.तुषार भैय्यला भी राग आला. एक मागसवर्गाचं पोरगं आपल्या बरूबर टसलं करतं.सार गाव संत्याच्या नोटा संपायच वाट पाहत होत पण त्याच्या नोटा काय संपत नव्हत्या.तुषार भैय्यानं नोट दाखवली की संत्या दाखवायचा.दोघांची चांगलीच जुंपली.गाण्यापेक्षा या दोघाची जुगलंबंदी चांगली रंगली होती.
तेवढयात मुरलीनाना म्हणाला,संत्या होऊ दे डान्सं.. आता मुरली नानी फर्मइश केल्यावर संत्याला चांगलाच चेव आला.गाणं लावलं  की संत्या बेभान होउन पुन्हा आत मध्ये शिरला. पुन्हा नाचायला लागला.लोक चेकाळली. पुन्हा पैशाचा पाउस पडू लागला. तुषार भैय्या इकडं दात ओठ खातचं होता.संत्या त्याच्याकडं पाहून नाचायचा.रींकीला मीठीत घ्यायचा….
तुषार भैय्यासमोर आसले थेरं केल्यामुळे त्याचा पारा चढला.  चार पाच पोर आतमध्ये घुसले आणी संत्याचं धरला. नुसत्या लाथा बुक्क्यांचा मारा केला.संत्या मोठयानं ओरडं पण त्याला कोण सोडीत.सारी माणसं पांगली. बाया ही घाबरून गेल्या. रींकी त्यांना धरायला गेली पण नंदीन मागं ओढली. सा-या बाया घाबरून गेलया.ते चार जण त्याला नुसते बदडत होते. चार दोन म्हतारे सोउयला गेले तर तुषार भ्सैय्यानं सा-यालाच दम टाकला. मध्ये कुणी पडायचं नाय.
टोला टाकला की संत्या मोठयानं आरडायचा. “आयी ग मेलो ग….” त्याची आय तर कधीच घरी गेली होती. बाप तिथचं पिउन पडला होता.
त्याच्या उलटया पायावरच दोनचार ठोके ठेऊन दिले.संत्या मोठयानं बेकला.त्याचा पायचं मोडून काढला.?“आय घाल्या लयचं डान्सं करतोय काय ?” शेवटची लाथ मारली.त्याच्या अंगावर थूंकला. गाडी चालू करून निघून गेला.आरगानं बंद झालं होतं.बायाची जीप चालू झाली.सच्या गप गाडीत बसला.संत्या मात्र पाणी.. पाणी करत होता. जत्रा पांगली. अंधारात जीप धावू लागली.रिंकी फक्त त्याला पाहू शकली. ती थांबू शकली नाही.ना काही बोलू शकली.संत्या मात्र ढणाढणा जळणा-या बल्बच्या उजेडात बेकत पडला होता. 
                                             परशुराम सोंडगे,पाटोदा
                                                                                                                                 9527463058
                                                             prshuramsondge.blogspot.com
sahitygandha.blogspot.com  


बापू..!!! तू काही मरत नाहीस.

  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्या...